वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव /wegwan Nashik
येवला ता 19 एप्रिल 2024 Panpoi रस्त्यावर असणाऱ्या पाणपोया लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. खरेतर पाण्या एवढा धर्म नाहीम्हणूनच उन्हाळा आला की, सामाजिक कार्याचे भान राखत काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरु करतात. मात्र अलिकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरु झाल्याने पाणपोईमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे तर याउलट नागरिकांचा बाटलीबंद पाण्याकडे कल वाढला आहे. मात्र असे असले तरीही रस्त्यावर फिरस्ते विक्रेत, वाटसरूंसाठी पाणपोईची सोय उपयुक्त असायची.
अलिकडच्या काळात समाजातील सहृदयता संपली की काय? असा प्रश्न पडत आहे. मात्र आज फक्त बोटावर मोजण्याएवढे व्यक्ती फक्त पाणपोई ठेवत आहेत. दरम्यान, येत्या काही काळात रस्त्यांवरील पाणपोई लुप्त होण्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहे.
भुकेलेल्याला घास, तहानेने व्याकूळ असलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, संघटना समाजभान जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी
तहानलेल्यांना पाणी कोण देणार? रस्त्यांवरील चौकाचौकांतील पाणपोई लुप्त होण्याच्या मार्गांवरउपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक, नाका, चौक, व रस्त्यावरील झाडाखाली अशा वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरु करायचे. यात काही संवेदनशील नागरिकही
स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. विश्रांती घेऊन घोटभर पाणी घशाखाली उतरवायचे व पुढचा मार्ग धरायचे. मात्र आज दुर्दैवाने अशा स्वरूपाचा उपक्रम हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येते. पाणपोई या सामाजिकउपक्रमातून तहानलेल्यांना तहान शमवणे पुण्याईचे काम समजले जाते. मात्र, काळ बदलला आणि लोकांनीपाण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यामुळे जागोजागी आता वॉटर फिल्टर उभारल्याने पाणपोई लुप्त होऊ लागल्या आहेत. शहरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील
नागरिकांची पाणी विकत घेण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात. वास्तविक तहान कमी झालेली नाही, परंतु पाणपोई लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती अशी पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर थांबायची, परंतु समाजातील सेवाभाव संपत चालल्याचे पाणपोईची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे तहानलेल्यांना पाणी द्यायचे असेल पाणपोईची सामाजितकता जीवंत ठेवणे गरजेचे आहे.
रस्त्यावर असणाऱ्या पाणपोया लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. खरेतर पाण्या एवढा धर्म नाहीम्हणूनच उन्हाळा आला की, सामाजिक कार्याचे भान राखत काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरु करतात. मात्र अलिकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरु झाल्याने पाणपोईमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे तर याउलट नागरिकांचा बाटलीबंद पाण्याकडे कल वाढला आहे. मात्र असे असले तरीही रस्त्यावर फिरस्ते विक्रेत, वाटसरूंसाठी पाणपोईची सोय उपयुक्त असायची.
अलिकडच्या काळात समाजातील सहृदयता संपली की काय? असा प्रश्न पडत आहे. मात्र आज फक्त बोटावर मोजण्याएवढे व्यक्ती फक्त पाणपोई ठेवत आहेत. दरम्यान, येत्या काही काळात रस्त्यांवरील पाणपोई लुप्त होण्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहे.भुकेलेल्याला घास, तहानेने व्याकूळ असलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, संघटना समाजभान जपत वाटसरूंना पिण्याचे पाणीतहानलेल्यांना पाणी कोण देणार? रस्त्यांवरील चौकाचौकांतील पाणपोई लुप्त होण्याच्या मार्गांवरउपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक, नाका, चौक, व रस्त्यावरील झाडाखाली अशा वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरु करायचे. यात काही संवेदनशील नागरिकही स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. विश्रांती घेऊन घोटभर पाणी घशाखाली उतरवायचे व पुढचा मार्ग धरायचे. मात्र आज दुर्दैवाने अशा स्वरूपाचा उपक्रम हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येते. पाणपोई या सामाजिक उपक्रमातून तहानलेल्यांना तहान शमवणे पुण्याईचे काम समजले जाते. मात्र, काळ बदलला आणि लोकांनीपाण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यामुळे जागोजागी आता वॉटर फिल्टर उभारल्याने पाणपोई लुप्त होऊ लागल्या आहेत. शहरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील
नागरिकांची पाणी विकत घेण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात. वास्तविक तहान कमी झालेली नाही, परंतु पाणपोई लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती अशी पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर थांबायची, परंतु समाजातील सेवाभाव संपत चालल्याचे पाणपोईची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे तहानलेल्यांना पाणी द्यायचे असेल पाणपोईची सामाजितकता जीवंत ठेवणे गरजेचे आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये