येवला शहरासाठी प्रांतधिका-यानी घेतला मोठा निर्णय
येवला शहरासाठी प्रांतधिका-यानी घेतला मोठा निर्णय
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव /wegwan nashik news
येवला, ता. १८ एप्रिल २०२४ – शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या विंचूर रोड चौफुली येथील रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची प्रचंड कोंडी होत असते.या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी तहसील कार्यालय, येवला येथे उपविभागीय अधिकारी, येवला बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभाग,मोटार वाहन निरीक्षक,पोलीस प्रशासन,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महावितरण या विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्राधान्याने विंचूररोड चौफुलीवरील फळे,भाजीपाला व फुले विक्रेते तसेच मालवाहतूकदार वाहनांच्या अतिक्रमणामुळे वाहनांची सातत्याने कोंडी होत असल्याने तात्काळ हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी येवला यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. विंचूर रोड चौफुली येथे नवीन ट्राफिक सिग्नल त्वरित बसवण्यासाठी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कार्यवाही करणेसाठी सूचित केले.
त्याच बरोबर विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका या दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत आणि महामार्गावरील अनावश्यक डिव्हायडर त्वरित बंद करणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. विंचूर रोड चौफुली येथील विद्युत ट्रान्सफार्मरसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणेबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणेबाबत सूचित करणेत आले.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी जुन्या पंचायत समिती समोर तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येवला येथे नवीन अधिकृत बसथांबा करावा, याबाबत आदेश दिले.
उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी सर्व विभाग प्रमुखांना बैठकीतील सर्व विषयानुरूप तात्काळ कार्यवाही करण्याचे व वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
सदर बैठकीसाठी मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक विलास पुजारी,नायब तहसीलदार पंकज मगर, मोटार वाहन निरीक्षक अतुल सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सागर चौधरी, परिवहन विभागाचे आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे, कनिष्ठ अभियंता एच.बी.जागले, कनिष्ठ अभियंता नरेंद्र भोये, नमिता सानप, श्री.रोहित पगार आदी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये