पाण्याने घेतला दोन शाळकरी मुलांचा जीव
Sinner एकलता एक मुलगा गेल्याचे दुख एका बापाच्या पदरी पडलंं. पाण्याने या दोघांचा जीव घेतलायं
वेगवान नाशिक
नाशिकः 18 एप्रिल 2024 – एकलहरे (ता. सिन्नर) येथील वस्तीत पाणी आणण्यासाठी निघालेल्या दोन मुलांचा डीजे वाहनाची व मोटारसायकलची धडक होऊन एका शाळकरी मुलास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला. तर एक जण जागेवर ठार झाल्याची ही दुर्देवी घटना घडली.Water took two Shaalkari Mulancha creatures
किर्तंगाळी येथील दोन शाळकरी मुलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी (साडे आठच्या सुमारास) हा अपघात झाला. एकलहरे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला तो दिवस. किर्तंगली गावातील शाळकरी मुले आगनमळा परिसरातील वस्तीतून पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोटारसायकलने निघाली होती.
अचानक डीजे कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. पार्थ सोमनाथ चव्हाणके (वय 14) याला जागीच जीव गमवावा लागला. आणखी एक गंभीर जखमी अभय नामदेव चव्हाणके (वय 14) याला उपचारासाठी रेफर करण्यात आले. नाशिक येथे उपचारादरम्यान आज अभयचे दुर्दैवी निधन झाले.
दोन्ही शालेय विद्यार्थी वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आठव्या वर्गात शिकत होते. शेतकरी नामदेव चव्हाणके यांचे ते एकुलते एक पुत्र होते. या अपघातात शेतकरी कुटुंबातील दोन कष्टकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी तीन वाजता कीर्तनगल्लीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.