नाशिक क्राईम

नाशिक जिल्ह्यात ते दोन आरोपी बसले होते लपून


वेगवान नाशिक / रविंद्र पाटील 

नाशिक,ता. 18 एप्रिल 2024 – गुजरात मधील दोन आरोपी मालेगाव शहरांमध्ये लपून बसले होते, मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून या दोन आरोपींना पकडून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे.Those two accused were hiding in Nashik district

याबाबत सविस्तर माहिती अशी,  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावरती राज्यांमध्ये पोलीस ठाणे निहाय गुन्हा दाखल झालेला होता आणि या गुन्हे मध्ये गुजरात मधून दोन आरोपी  पळून येऊन ते मालेगाव शहरात राहत होते.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

फरार आरोपींचे  नाव हबीब शब्बीर शेख उर्फ हबीब गांजावाला राहणार मालदा शिवार गल्ली नंबर 9 पवारवाडी मालेगाव आणि दुसरा आरोपी जो आहे त्याचं नाव जमाल उर्फ जमाल बिल्डर अहमद राहणार अक्षा कॉलनी कुबा मंजिल मालेगाव.

या दोन आरोपी गुजरात मधून फरार होते त्यानुसार नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे .लोकसभा सर्वत्र निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या अभिलेखा वरील पाहिजेत व फरार आरोपी ची माहिती घेऊन त्यांना संबंधित पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!