नाशिकचे राजकारण

भुजबळांचे चरण ! बघु द्या की रावःभुजबळांचे चरण आणि गोडसे


वेगवान नाशिक / wegwan nashik news

नाशिक : ता. 18 एप्रिल 2024  नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राजकीय वारे शिगेला पोहोचली आहे. नाशिकच्या जागेचे दावेदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे हे अगदी जवळचे मानले जातात. 

मात्र राजकारण हा विषय असतो की राजकारण सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात  उभे राहतात, तेंव्हा भुजबळ व गोडसे काय नवलं आहे. दोघे जण सध्या नाशिक मधून लोकसभेचे उमेदवार पदाचे दावेदार आहे. हा सगळा घोळ फोडाफोटी मुळे झाला हे सगळ्यांनाचं माहित आहे. आणि याचं मुळे आज जे घडलं ते असं…

ही घटना नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात श्री रामजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान दुपारच्या सुमारास घडली. नाशिकमध्ये श्री रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामभक्तांसोबतच अनेक नेते, लोकप्रतिनिधीही या ठिकाणी येत असतात. आज रामजन्मोत्सव सोहळा सुरू असताना दुपारी छगन भुजबळ यांचे तेथे आगमन झाले, त्यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेही उपस्थित होते. त्यानंतर गोडसे यांनी त्यांचे स्वागत केले. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी छगन भुजबळ यांना विचारले की, तुमचे तुमच्याशी चांगले संबंध आहेत का?

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दरम्यान, नाशिकच्या जागेसाठी उमेदवारीबाबतच्या निर्णयाबाबत भुजबळांना विचारले असता, त्यांनी काय करावे लागेल, याबाबत वरिष्ठांना कळवले आहे, मात्र निवडणुकीच्या आतच उमेदवार जाहीर करा, असे 20 मेपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु भुजबळ व गोडसे यांची भेट होताचंं गोडसे यांनी थेट भुजबळांच्या चरणाकडे धाव घेतली. याचे कारण असं की, भुजबळ साहेब….मी उभा राहत आहे…तुम्ही जर थांबलं…तर बर होईल बर….ही भावना कदाचित गोडसे यांची असावी…मात्र एका बाजून भुजबळ हे गोडसेंना मोठे आहे. आणि मोठ्यांचे चरण धरणे काही वावगे नाही…असे अर्थ लोक काढत आहे. मात्र या चर्चांना मोठे उत आला आहे.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!