महावितरण देवळा उपविभाग सर्वोत्तम कामगिरी – अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे
देवळा, ता. १८ एप्रिल २०२४
आर्थिक वर्ष २०२३-२४ विद्युत थकबाकी वसुली, कार्यक्षमता वाढ व उत्कृष्ट ग्राहक सेवा या बाबतीत महावितरण देवळा उपविभागाने नाशिक परिमंडळात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल देवळा येथे आयोजित कर्मचारी गुणगौरव कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
महावितरण मालेगाव मंडळ अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे यांनी देवळा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सूक्ष्म नियोजन करून मार्च अखेर ३ लाख ५० हजार थकबाकी वसूल केली. तांत्रिक सुधारणा, उत्कृष्ठ ग्राहक सेवा, मालेगाव मंडळ मधील प्रथम नामांकन प्राप्त दहीवड उपकेंद्र व महावितरण चे इतर मापदंड या बाबतीत देवळा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कामगिरी सर्वोत्तम असून सर्व कौतुकास पात्र असल्याचे जगदीश इंगळे यांनी नमूद केले.
कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी आपल्या मनोगतात देवळा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कार्याची स्तुती केली. यावेळी विशेष सहकार्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात विठेवाडी येथील ग्रामसेवक उत्तम बी. खैरनार यांना सन्मानित करण्यात आले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार व नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट राज्य विद्युत नियामक आयोग यांच्या मापदंडानुसार उत्कृष्ठ ग्राहक सेवा देण्यासाठी देवळा उपविभागातील अधिकारी/कर्मचारी सतत प्रयत्नशील राहत असल्यामुळे सर्व वर्गवारी थकबाकी कमी करण्यात यश आल्याचे प्रास्ताविकात सुरवसे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता छगन थैल, उपकार्यकारी अभियंता चव्हाण कळवण विभाग, उपव्यवस्थापक लेखा स्वाती शिंदे-देवरे, अविनाश डमरे, सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे, घनश्याम कुंभार, कैलास शिवदे, कल्याणी भोये-अहिरे, गौरव पगार, सहाय्यक लेखापाल अमित मत्सागर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कंत्राटदार बापू बच्छाव, गिरीश आहेर, दत्तात्रय जाधव, स्वप्नील शिरसाठ उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.