आरोग्यनाशिक क्राईमनाशिक ग्रामीण

शहरात तरुणावर धारदार शस्त्राने वार,गुन्हा दाखल

पोलीस घेताहेत फरार तरुणाचा शोध


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड, नांदगाव-

मनमाड शहरातील मानके कंपाऊंड परिसरात तरुणावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. घटनेतील एक तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

मनमाड शहरातील माणके कंपाऊंड परिसरात 17 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आपसातील मागील भांडणाचे कुरापत काढून तीन तरुणांनी पवन जाधव नावाच्या तरुणावर धारदार हत्याराने  हल्ला केला.यात पवन जाधव गंभीर जखमी झाला असून त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेसंदर्भात चेतन पगारे यांच्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलिसांनी अनुज शिंदे,सचिन भिवसने,चेतन भिवसने यांच्या विरुद्ध भादंवि  कलम 307,324,120 ब नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने दोन जणांना अटक केली आहे.एक जण फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करत आहेत.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!