नाशिक क्राईम

Nashik NEWS नाशिकः 44 लाखांची दारु पकडली Nashik NEWS

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले. या ट्रकमधून पोलिसांनी 43 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील  चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर पकडला आहे. 


वेगवान नाशिक / Wegwan Nashik NEWS

Nashik NEWS नाशिक, ता. 6 एप्रिल 2024 –  Nashik: 44 lakh liquor seized  नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले. या ट्रकमधून पोलिसांनी 43 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील  चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर पकडला आहे.

ही विदेशी दारू गोव्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पद्मसिंह कैलास बाजड (३५, रा., मालेगाव, जि. नाशिक ) सध्या रा. अश्विन नगर, सिद्धको, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस आता पुरवठादार व खरेदीदारांचा शोध घेत आहेत.  संशयित बाजड याला न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (5) रात्री चांदवड तालुक्यातील सोग्रास फाटा येथे सापळा रचला.

संशयास्पद ट्रक (एमएच 15 एचएच 6361) आल्यानंतर छापा टाकणाऱ्या पथकाने त्याची झडती घेतली. त्यावेळी ट्रकमध्ये गोव्याहून आणलेली दारू भरलेली होती. याशिवाय ट्रकमध्ये दारूचा साठा लपवण्यासाठी अमोनियम क्लोराईड पावडर असल्याचे आढळून आले.

अशाच पद्धतीने बनावट बिलेही तयार करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी 61  लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा सह मोबाईल व इतर साहित्य जप्त केलं आहे.  ज

 


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!