नाशिक क्राईम

Nashik तुमच्या मुली खाजगी क्लास मध्ये जातायं का ? मुलींसोबत शिक्षकांचे तसं कृत्य


वेगवान नाशिक / Wegwan Nashik 

अरुण थोरे

निफाडः 6 एप्रिल 2024 –  लासलगाव येथील एका खासगी क्लासेसच्या दोन शिक्षकांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनींचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन याबाबत लासलगाव पोलीसात संशयीत शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लासलगाव येथील एका खासगी क्लासेस मधे शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना शाळेचे सर्व पेपर दाखवण्याचे अमिष दाखवुन जवळीक साधुन ,लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे,

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दि २६ मार्च  रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास  लासलगाव येथील ग्रामपंचायत हॉल जवळील खाजगी क्लास मध्ये यातील दोन्ही विद्यार्थिनी अल्पवयीन आहे असे माहित असताना देखील संशयित यांनी तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन त्यांच्याशी जवळीक साधुन या दोन्ही मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड व सुमित संजय भडांगे रा.गणेश नगर लासलगाव यांचे विरुद्ध भादवी का. कलम 354,354 (अ), (ड), 34, सह पोक्सो का. कलम 8,12 प्रमाणे  गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत.

लासलगाव पोलीस ठाण्यात वरील गुन्हा दाखल झाला असुन याबाबत इतर पालक व विद्यार्थिनी यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन लासलगाव पोलीस ठाण्याचे स. पो.नि. भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!