खेळ

IPL मुंबई इंडियमध्ये दोन गटः आमने सामने

Mumbai Indian


वेगवान मराठी

मुंबई ः22 मार्च 2024 IPL  22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज Chennai Super Kings आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २३ मार्चला होणार आहे. हार्दिक पांड्या Hardik Pandya यंदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. पहिल्या सामन्यात तो आपल्या माजी संघ गुजरात टायटन्सविरुद्ध Gujarat Titans खेळेल. या 17व्या हंगामापूर्वी मुंबईने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. आता पहिल्या सामन्याआधी मुंबईचे दोन गट भिडले आहेत.

वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आयपीएल 17 व्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यापूर्वी एकमेकांविरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहेत. हा सामना सरावासाठी आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर Wankhede Stadium हा सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सने 3,000 क्रिकेट चाहत्यांना आमंत्रित केल्याचे वृत्त आहे.

मुंबई इंडियन्सकडे 17 व्या हंगामासाठी एकूण 25 खेळाडू आहेत, त्यापैकी 7 खेळाडू परदेशी नागरिक आहेत. बाकीचे भारतीय खेळाडू आहेत. आता या इंट्रा-स्क्वॉड मॅचमुळे प्रत्येक खेळाडूला चांगला सराव मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सूर्यकुमार यादव यांच्यावर तणाव वाढला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून सूर्यकुमार यादव पूर्णपणे सावरलेला नाही. सूर्याची फिटनेस चाचणी १९ मार्च रोजी बंगळुरू येथील एनसीएमध्ये घेण्यात आली. या फिटनेस टेस्टमध्ये सूर्या नापास झाला. आता पुढील परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. या फिटनेस चाचणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सूर्यासाठी ही तंदुरुस्ती चाचणी महत्त्वपूर्ण आहे कारण आयपीएलच्या 17 व्या हंगामाला खूप महत्त्व आहे.

अशी आहे टिम

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडूलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, जेराल्ड कोएट्जे, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमनधीर सिंह, अंशुल कंबोज, शिवालिक शर्मा आणि मोहम्मद नबी.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!