Life Styleआर्थिकनाशिक ग्रामीणनाशिक शहरनाशिकचे राजकारण

माता रमाई जयंतीनिमित्त शहरात कार्यक्रमांची रेलचेल


वेगवान नाशिक/Nashik/ अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव –

दि.7 फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

माता रमाई जयंती निमित्त सालाबादाप्रमाणे शहरात चित्ररथ मिरवणुका नियोजित केल्या आहेत. त्यानिमित्ताने हनुमान नगर,डॉ.आंबेडकर नगर, डॉ.आंबेडकर चौक,गौतम नगर, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी,चंदनवाडी,रमाबाई नगर, श्रावस्ती नगर, कॅम्प,आनंदवाडी,शाकुंतल नगर,बेंद्रे चाळ आदी उत्तरे कडील परिसरातील चित्ररथ मिरवणुका नगीना मस्जिद ते नगरपालिका इमारत या मार्गाने तर गायकवाड चौक,52 नंबर,हुडको, बुधलवाडी, आययूडीपी आदी गावठाण भागातील चित्ररथ मिरवणूका गांधी चौक, भाग्यलक्ष्मी बँक ते नगरपालिका इमारत या मार्गाने येतील.माता रमाई जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम एकात्मता चौक येथे संपन्न होईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.संभाव्य गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व रस्त्यांना बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे व पार्किंगची व्यवस्था जयश्री टॉकीज व बस स्टॅन्ड समोरील मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे. अशी माहिती नगरपरिषद मनमाड व पोलीस निरीक्षक, मनमाड पोलीस ठाणे यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button