नाशिक ग्रामीण

सुरगाणाः पिकअप दरीत कोसळली


वेगवान नाशिक टीम

सुरगाणा, ता. 8 जानेवारी 24  तालुक्यातील वांगणसुळे घाटात पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने हे वाहन १०० फूट खोल दरीमध्ये काेसळले. मात्र चालकाने उडी मारल्याने तो बचावला.

वापी येथून किराणा घेऊन जाणारी पिकअप (क्र्य जी जे २१ वाय ६३४१) ही बाऱ्हे येथे किराणा पोहोचवून परतत असताना वांगणसुळे घाटात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीत कोसळली. यामुळे गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. ब्रेक फेल होताच चालकाने गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button