नाशिक शहर

rain update महाराष्ट्रात पावसाची शक्यता तर नाशिक ला एलो अर्लट जारी Maharashtra rain forecast issued for Nashik La Aloe alert

Maharashtra rain forecast issued for Nashik La Aloe alert, 8th to 9th January


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे /wegwan nashik

weather updates नाशिकः 7 जानेवारी 24 Maharashtra rain forecast issued for Nashik La Aloe alertहिवाळ्यात अनपेक्षित पाऊस झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याने राज्यातील विविध भागांत संभाव्य पावसाचा इशारा दिला आहे. पावसाने हजेरी लावली आहे. अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडण्याची भीती आहे.राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Nashik La Aloe alert, 8th to 9th January 2024

 

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

 

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अहमदनगरमध्ये शुक्रवारी अनपेक्षितपणे पाऊस आल्याने लोकांना स्वेटरच्या बदल्यात छत्रीचा वापर करावा लागला.

जळगाव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील पाच दिवस राज्यात अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे.

पुणे, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत शुक्रवार आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील चाकण परिसरात आज रात्री अचानक अवकाळी पाऊस झाला. या अनपेक्षित पावसामुळे वातावरणात दव निर्माण झाले असले तरी कांद्यासारख्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय या अवकाळी पावसामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही वाढू शकतो. अचानक आलेल्या या पावसाने नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे आदी भागात रहिवाशांना हैराण केले. पावसामुळे कांदा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button