नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय एकोणीस

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज जीवनचरीत्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी

दि.०५/०१/२०२४

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १९ वा

ओम नमाे नारायणाय लिहुन लखाेटे लिहीले /
महाराजांनी ते सही करुन पाठवीले /
गावाेगावी ते श्रीमंत, शेठ, साहुकारास पावले /
त्यांनी ते लावले मस्तकी आध्ना माणुन //

   सन १८७५ मधे एप्रील महीन्यात महाराज सटाणा येथेच रितसरपणे मामलेदार (तहसीलदार)पदावरुन सेवानिवृत्त (रिटायर) झाले. सेवा निवृत्तीनंतर देखील महाराजांनी सटाणा येथेच स्थायिक हाेऊन बागलाणकरांच्याच सेवेचा ध्यास घेतला. कारण नाेकरी करीत असतांना आपल्या संपुर्ण जिवनात त्यांचे सटाणा ह्या गावावरच विशेष प्रेम जडले हाेते. त्यामुळे उर्वरीत आयुष्य बागलाणकरांच्या सेवेसाठीच खर्च करायचे त्यांनी ठरवले हाेते. महाराजांच्या जागी आता सटाण्यात दुसरा मामलेदार रुजु झालेला हाेता. मात्र सटाण्यातील जनतेने महाराज मामलेदार असतांना जी खुर्ची वापरत त्या खुर्चीच्या ऐवजी दुसरी खुर्ची त्या मामलेदारास दिली व ह्या खुर्चीवर आमच्या महाराजांनी जे कार्य केले आहे त्या कार्याचा आदर म्हणुन आम्ही ही खुर्ची “सिंहासन” म्हणुन आयुष्यभर सांभाळुन ठेवु असा निर्णय घेतला.
( आज देखील ती खुर्ची सटाण्याच्या तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या खुर्चीच्या शेजारीच ठेवलेली असुन महाराजांची मुर्ती त्या खुर्चीवर ठेवलेली आहे. त्यामुळे आज देखील तहसील कार्यालयातील ती खुर्ची व त्यावरील महाराजांची मुर्ती बघुन बागलाणचे तहसीलदार महाराजच आहेत की काय असा भास हाेताे. )

 महाराजांना आता बागलाण तालुक्यातील शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील जे गड किल्ले हाेते ते दुर्लक्षित झालेले असल्याने त्या किल्ल्यांच्या विकासाचा ध्यास लागला. ताहाराबाद जवळील साल्हेर मुल्हेर ते नामपुर जवळील पिसाेळ किल्ला तर सटाण्या जवळील तिळवण किल्ला असे बागलाणातील अनेक किल्ल्यांचा विकास करुन देवमामलेदारांनी शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला. बागलाणातील जनता आता माेठ्या दिमाखात जिवन जगु लागली हाेती. अशातच सन १८७६ साल ऊजाडले. हे साल बागलाण वासीयांसाठी माेठ्या नुकसानीचे साल ठरले. सुरुवातीला पाऊस प्रमाणात हाेता मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासुनच मुसळधार पावसास सुरुवात झाली हाेती. जवळपास आठ ते दहा दिवस संततधार पावसाने धुमाकुळ माजवला हाेता. त्या पावसाने बागलाण परीसरातील गिरणा, आरम व माेसम ह्या नद्यांबराेबरच ईतर सर्व नद्यांना महापुर आला हाेता. पुर ईतका भयानक हाेता की पुराने ऊच्चांकाच्या सर्वच सिमा ओलांडल्या हाेत्या. महापुरामुळे डांगी आणि देशी भागातील नदीकाठची अनेक गावे नष्ट झाली हाेती. हजाराे गायी, म्हशी व ईतर गुरे ढाेरे पुरात वाहुन गेले हाेते. सटाण्यातील मामलेदार कचेरीला दाेन ते तीन दिवस पुराच्या वेढ्याने घेरलेले हाेते. काही दिवसांनी पुर ओसरु लागला पण ताे पर्यंत बागलाण ची खुप माेठी हानी झाली हाेती. देवमामलेदारांनी निसर्गाचे ते राैद्ररुप बघुन फार माेठा धसका घेतला हाेता. कचेरीच्या संरक्षक भिंतीवर बसुन ते आरम नदीचे राैद्र रुप न्याहाळत हाेते. निसर्गाच्या काेपाने त्यांचे मन अतिशय व्याकुळ झालेले हाेते. पाऊस ऊघडुन ५ ते ६ दिवस झाले असतांनाही बागलाणातील नुकसानग्रस्त गावांपर्यंत नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सरकारी यंत्रणा पाेहचु शकत नव्हती. ईकडे आरम नदीने एवढा हाहाकार माजवला तर गिरणा व माेसम च्या महापुरात काय घडले असेल या चिंतेने महाराज अतिशय अस्वस्थ रहात हाेते. काही दिवसातच सरकारी आकडेवारीनुसार बागलाणातील एकुण १२८ गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला हाेता. जवळपास ७०६८ एकर शेतीतील पिके पुर्णपणे वाहुन गेली हाेती. साेमपुरचे कसाड थळ व जायखेड्याचा जुना नकट्या बंधारा व असे अनेक छाेटे माेठे बंधारे पुरात नष्ट झाले हाेते. जवळपास त्या काळातील लाखाे रुपयांचे नुकसान झालेले हाेते. अनेक गावातील लाेकांजवळ अन्नाचा कण ही शिल्लक राहीला नव्हता. त्यामुळे अनेक लाेक दिवसेंदिवस ऊपाशी तापाशीच एक एक दिवस पार पाडत हाेते. हा भयानक प्रसंग पाहुन महाराजांचे मन पिळवटुन जाई. “हे परमेश्वरा अजुन किती वेळेस ह्या बागलाणकरांची कसाेटी घेणार?” असा सवाल ते परमेश्वराला करीत.पुरग्रस्तांसाठी जमेल तेथुन जमेल तशी मदत महाराज आपल्या प्रयत्नातुन करीत हाेते पण ती मदत ताेकडी पडत हाेती. बागलाणातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाखाे रुपयांची गरज भासु लागली. आता काय करावे? एवढे पैसे काेढुन आणावे हा प्रश्न राेजच देवमामलेदारांना पडु लागला हाेता.
अशातच एके दिवशी पंढरपुरचे विठ्ठल महाराजांच्या स्वप्नात आले व त्यांनी महाराजांना दृष्टांत दिला. ते महाराजांना सांगु लागले, “ऊठ यशवंता एवढा विचार करु नकाेस. ज्यासाठी तुझा जन्म झाला आहे ती वेळ आत्ता येऊन ठेपलेली आहे. ऊठ आणि आठव पृथ्वीवर जन्म घेतांना मी तुला आदेश केला हाेता की भुतलावरील लाेक पाप कर्मात पैसा वाया घालवीत आहेत.एकीकडे काही लाेकांकडे खुप पैसा आहे तर दुसरीकडे काही लाेकांकडे एक वेळचे अन्न देखील नाही. तेव्हा तु अशा लाेकांकडुन ते पैसे घ्यावे ज्यांनी भविष्याच्या हव्यासापाेटी साठवुन ठेवलेले आहेत व ते पैसे गाेरगरीब जनतेच्या कल्याणासाठी लावावे. यामुळे श्रीमंत जनतेत गाेरगरीबांविषयी प्रेम ही पसरेल व त्यांना पुण्य ही लाभेल.” महाराजांना लगेच जाग येते. दुस-याच दिवशी महाराज “ऊँ नमाे नारायणाय” लिहुन गावाेगावींच्या श्रीमंत, शेठ व सावकारांना चिठ्ठी लिहीतात व बागलाणातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतीची याचना करतात. गावाेगावी महाराजांच्या चिठ्ठया पाेहचतात. देवमामलेदारांची चिठ्ठी म्हणजे आपल्यासाठी माेठी पर्वणीच मानुन मग सर्व श्रीमंत लाेक देखील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराजांना माेठ्या प्रमाणावर मदत करतात. धन व धान्याच्या राशीच्या राशी ठिकठिकाणाहुन सटाण्यात येऊ लागतात. त्या काळात ज्या माेठमाेठे सावकार तसेच ईतर श्रीमंत व्यक्तींनी यथाशक्ती मदत पाठवीली हाेती त्यात प्रामुख्याने पेठच्या बेगम हरहायनेस नुरजहाँ, यशवंत देशमुख- लाेहणेर, कृष्णा अलई- नामपुर, धाेंडु साेनवणे- सटाणा, विष्णुदास महाराज- मुल्हेर, रघुनाथ सरदार- विंचुर, शामराव गरुड- धुळे, शंकरराव देशमुख- सुरगाणा, अमृत नाईकढाेर- बेज, रंगराव सहस्त्रबुध्दे- जायखेडा, लक्ष्मण ब्राम्हणकर- वाडी पिसाेळ, निळकंठ तेंडुलकर- साेमपुर, कृष्णाबाई ठाेके- अभाेणा, महादेव भामरे- तांदुळवाडी, कृष्णाशेठ बागड- सटाणा, गाेपाळ पंडीत- सटाणा, विठ्ठलआप्पा साेनवणे सटाणा, फत्तेसिंग कुवर- गाढवी, हाफसींग लालसींग- कराेली, सत्रा पाटील- पाटण, ईनामदार साहेब- कनाशी, सिताराम फडके- पिंपळनेर, तुळ्या नाईक- विरखेल, महादु साेनवणे, सटाणा यांची मदत फार माेठी हाेती. लाखाे रुपयांची देणगी ठिकठिकाणाहुन श्रीमंत लाेकांनी बागलाणच्या पुरग्रस्तांसाठी महाराजांकडे पाठवली हाेती. लवकरच महाराजांनी बागलाणातील सर्व पुरग्रस्तांचे पुनर्वसण केले हाेते. महाराजांचे नावलाैकीक संपुर्ण देशाच्या कान्याकाेप-यात पाेहचले हाेते. महाराजांच्या दर्शनास सामान्य भक्तांसह अनेक महापुरुष देखील सटाण्यात येत असत. एकदा असेच महाराज आपल्या भक्तांना सहजच म्हणाले की, “आज रात्री आपल्याला स्वागत करावयाचे आहे” महाराजांच्या बाेलण्याचा गुढ अर्थ सर्वसामान्य जनतेला समजला नाही. लाेकांना वाटले कुणी माेठा पाहुणा येणार असावा. मध्यरात्रीच्या वेळेस एक महापुरुष समाेरुन येतांना लाेकांना दिसले ते महापुरुष म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसुन चित्रकुटचे संत माधवनाथ महाराज हाेते. माधवनाथांनी यशवंतराव महाराजांना भेटुन नमस्कार करुन आशिर्वाद घेतला. दहा ते बारा दिवस सटाण्यातच राहुन हे सिध्दपुरुष पुढे चित्रकुटला प्रकटले. देवमामलेदारांच्या कृपेने हे महापुरुष पुढे चित्रकुटचे माधवनाथ महाराज म्हणुन प्रसिध्द झाले. असेच एकदा देवास येथील शिलनाथ महाराज हे देखील सिध्दतेच्या अवस्थेत असतांनाच त्यांना विठ्ठलाने दृष्टांत दिला. शिलनाथ महाराज हे ईंदाैर जवळील देवास ह्या गावातील अरण्यात एकवीस वर्ष वास्तव्यास हाेते. ते महान तपस्वी हाेते. एकदा ते तपस्वी अवस्थेत असतांना विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला की, “आता तुम्ही सटाण्यास जावे तेथे यशवंतराव महाराजांना भेटुन अनुग्रह घ्यावा म्हणजे तुम्ही ह्या जगात सिध्द व्हाल.” त्या प्रमाणे ते सटाण्यास आले व त्यांनी यशवंतराव महाराजांकडुन आशिर्वाद घेऊन अनुग्रह मिळवीला व लवकरच ते ईंदाैर जवळील देवास ह्या गावचे शिलनाथ महाराज म्हणुन प्रसिध्द झाले. अशा प्रकारे भारत भरातील अनेक नामवंत संतांना देखील यशवंतराव महाराजांनीच अनुग्रह देऊन त्यांना सिध्दता प्राप्त करुन दिली आहे.

   अशाप्रकारे महाराजांचा अधिकार किती माेठा हाेता हे ह्या सर्व घटनांवरुन समजते व येथे एकाेणीसावा अध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो.९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button