नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय अठरावा

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज जीवनचरीत्र


वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी

दि.०४/०१/२०२४

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १८ वा 

देवा केली कृपेची सावली /
मी अप्रतीम स्थिती अनुभवली /
हे सदगुरु माऊली तुझ्या चरणा //

   दिवसामागुन दिवस जातच हाेते. महाराजांचे भक्तमंडळ वाढतच हाेते. सटाण्यात गर्दीचा राेजच नवीन ऊच्चांक हाेत हाेता. काही इंग्रज लाेक सुध्दा महाराजांना देव मानु लागले हाेते. त्यामुळे बाकीच्या इंग्रजांना ही धाेक्याची घंटा वाटु लागली हाेती. आपण नक्की काेणत्या ऊद्देशाने हा भारत देश ताब्यात घेतलाय ते ऊद्दीष्ट अशाने पुर्ण हाेण्याच्या ऐवजी आपणच त्या गाेत्यात ओढले जाऊ असे इंग्रजांना वाटु लागले हाेते. सन १८६९ ते सन १८७४ ह्या पाच वर्षाच्या कालखंडातच महाराजांनी बागलाण चे नंदनवन करुन टाकले हाेते. बागलाण चा पुर्ण कायापालट झालेला हाेता. तर ईकडे नाशिकचे कलेक्टर मी. अँशबर्नर याची बढती हाेऊन ताे कमीश्नर झालेला हाेता. हाच अँशबर्नर सुरुवातीपासुनच महाराजांच्या प्रत्येक कामात व्यत्यय आणत व वेळाेवेळी महाराजांना अडचणीत आणण्याच्या कुरघाेडी करत असत. आता तर ताे कमीश्नर झालेला हाेता. मग ही संधी तरी ताे कसा साेडणार. त्याने लगेच नाशिकचे नवीन कलेक्टर मि.जँक्सन याला महाराजांच्या विराेधात अहवाल तयार करायला लावला. नाशिकचे नवीन कलेक्टर मी.जँक्सन यांनीही मग लगेच कमीश्नर मी.अँशबर्नर यांचा आदेश सर्वस्व मानुन कुरघाेडी करण्यास सुरुवात केली. सन १८७४ च्या डिसेंबर महीन्यातील ते दिवस हाेते. कलेक्टरने खाेटानाटा अहवाल तयार केला व अहवालात असे नमुद केले की- “बागलाण चे मामलेदार श्री यशवंत महादेव भाेसेकर यांच्या विराेधात नेहमीच तक्रारी येत असतात. त्यांचे कामकाज वक्तशीर नसुन थप्प असते. तालुक्याची सारी कामे सर्व फाईल्स तशाच पेंडींग पडुन असतात. त्यांचा सर्व वेळ देवधर्म व गाेरगरीब जनतेवर खर्च हाेत असल्याने त्यांचे कामात लक्ष नाही आणि कामावर नियंत्रण ही नाही. त्यांच्याकडे सतत लाेकांची गर्दी असते. मामलेदार पद हे अतीशय जाेखमीचे असुन ह्या गर्दीमुळे त्यांच्या कामावर याचा परीणाम हाेताे. तसेच बागलाणातील बरीचशी जनता राेज यांच्याच सानिध्यात राहत असल्याने तालुक्याचा विकास पुर्णत: खाेळंबला आहे. त्यामुळे यांची बागलाणातुन ताबडताेब बदली करण्यात यावी ही विनंती.” असा अहवाल कमीश्नर अँशबर्नर कडे जाताे. मग काय कमीश्नर अँशबर्नरच्याच ह्या कुरघाेडी असल्याने ताे लगेच अहवालावर डिसीजन घेऊन महाराजांची बदली सटाण्यापासुन लांब कुठेतरी करण्याचे ठरवताे. डिसेंबर १८७४ मधे महाराजांच्या हातात बदलीचा आदेश पडला हाेता. “नारायणाचीच ईच्छा असेल म्हणुन माझ्या आयुष्यात असे कसाेटीचे क्षण येतात.” असे म्हणुन महाराजांनी ताे आदेश मस्तकाशी लावला. सटाण्यापासुन अगदी दुर “येवला” ह्या गावी महाराजांची बदली करण्यात आली. जनमाणसांत देवपणास पाेहचलेल्या व्यक्तीची बदली जर जवळपास केली तर लाेकक्षाेभ अनावर हाेऊन कायदा व्यवस्था बिघडण्याच्या प्रसंगाला ताेंड देण्याची पाळी येऊ शकते. असे गृहीत धरुन मुद्दामच महाराजांची बदली येवला येथे करण्यात आली हाेती. लवकरच महाराजांना सरकारी टांग्याने व साेबत दाेन घाेडेस्वार व पाेलिसांच्या देखरेखीत येवल्याला पाेहचवीण्याची तयारी झाली हाेती. साेबत लाेहणेरचे जहागीरदार श्री देशमुख यांचा टांगा ही साेबतीला जाणार हाेता. येवल्याला बदली झाल्याची बातमी सटाण्याच्या जनतेपासुन गुप्त ठेवण्यात आलेली हाेती. कारण अँशबर्नरचा हुकुमच हाेता की सटाण्यातील जनतेपासुन ही बातमी गुप्त ठेवण्यात यावी. मग ठरलेल्या दिवशीच पहाटे ४ वाजेच्या अंधारातच सटाणेकरांना माहिती न करताच मामलेदारांना घेऊन जाणारे टांगे निघाले. मामलेदार येवल्यात आले. ईकडे सटाण्यात एवढ्या सकाळी सकाळी आपले यशवंतराव महाराज व रुक्मिणीमाता गेल्या तरी कुठे हा प्रश्न सटाणेकरांना पडला. कारण महाराज बाहेरगावी जायचे असल्यास सर्वांना सांगुन मगच जात असत. मग आज हे अघटीत कसे घडले हा विचार जनतेला ग्रासु लागला. भक्तांनी मग घ्या गाेष्टीचा शाेध घ्यायला लगेच सुरुवात केली. दाेन दिवसातच मग देवमामलेदारांवर आलेल्या बिकट प्रसंगाची बातमी संपुर्ण बागलाण भर पसरली.जनतेचा गाे-या साहेबाविराेधात खुपच संताप हाेऊ लागला हाेता. सटाण्यातील सर्व नागरिक महाराजांच्या अचानक गुप्तपणे निघुन जाण्याने अक्षरश: धाय माेकलुन रडु लागले. महाराजांवर झालेल्या अन्यायाचा आता आपण सर्वजण मिळुन प्राणपणाने मुकाबला करु व इंग्रजांचा हा डाव हाणुन पाडु असा जनतेने निर्धार केला. मग सटाण्यातील सर्व जाती धर्माचे लाेक एकत्र आले व त्यांनी कलेक्टर जँक्सन व कमीश्नर अँशबर्नर यांच्या विराेधात निदर्शने केली व विविध प्रकारचे आंदाेलने करुन महाराजांना न्याय मिळावा तसेच त्यांच्यावरील खाेटे नाटे आराेप दुर करुन त्यांना पुन्हा सन्मानपुर्वक सटाण्याचेच मामलेदार करण्यात यावे ही मागणी जाेर धरु लागली. अशातच अनेक घटना घडल्या व आंदाेलनाने ऊग्र रुप घेतले.त्या काळातील एखाद्या सरकारी अधिका-याला न्याय मिळावा ह्या मागणीचे हे पहीलेच आंदाेलन असावे. ही बातमी मग मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरच्या कानावर गेली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणुन मग गव्हर्नरनेही महाराजांच्या येवला येथील बदलीला तात्काळ स्थगिती देऊन त्यांना पुन्हा बागलाण चे मामलेदार म्हणुन नियुक्ती देण्यात यावी असे आदेश अँशबर्नर कमीश्नरला दिले. वरीष्ठांचा आदेश पाळणे हा सरकारी नियम अँशबर्नरलाही पाळावाच लागला व त्याने पुन्हा सन्मानपुर्वक महाराजांना बागलाण चे मामलेदार म्हणुन नियुक्ती दिली. महाराजांवरील सर्व दाेषाराेप खाेटे व बिनबुडाचे आहेत असा अहवाल सादर करुन शेवटी अँशबर्नरला पुन्हा सटाणा येथेच नियुक्ती करावीच लागली. सटाणेकरांच्या प्रयत्नांना यश आले. सर्व जाती धर्म ह्या भावना दुर ठेवुन जर संपुर्ण जनता एकत्र आली तर काय नाही करु शकत याचा चांगलाच प्रत्यय सटाणेकरांना आला हाेता. मग सर्व धर्मीयांनी ताे दिवस आनंदाेत्सव म्हणुन साजरा केला. पुढे काही महीन्यातच एप्रील १८७५ मधे महाराज सटाणा येथेच रितसर पणे मामलेदार ह्या पदावरुन सेवानिवृत्त (रीटायर) झाले. पुढे सेवानिवृत्ती नंतर देखील महाराजांनी सटाणा येथेच स्थायिक हाेऊन बागलाणकरांच्या सेवेचाच ध्यास घेतला. कारण आपल्या संपुर्ण आयुष्यात नाेकरी करीत असतांना सटाणा ह्या गावावरच त्यांचे विशेष प्रेम हाेते व संपुर्ण बागलाणातच त्यांचा जिव अडकला हाेता. म्हणुन सटाण्यातच ऊर्वरीत आयुष्य घालवायचे व बागलाणच्या जनतेची सेवा करायची असा त्यांनी निर्धार केला हाेता.महाराज आता सेवानिवृत्त झाले हाेते. सेवानिवृत्ती नंतर दरमहा त्यांना सरकार कडुन पेंशन मिळु लागली. आपले दानधर्म व अन्नदान त्यांनी अशा ही परीस्थितीत चालुच ठेवले हाेते. गावातील श्रीमंत लाेक व सावकार ही त्यांच्या ह्या कामात त्यांना मदत करु लागले. भक्तांच्या संखेत तर दिवसेंदिवस वाढ हाेतच हाेती असा हा परमार्थ चालुच हाेता. पुढे काही दिवसांनी महाराजांनी एका मुमुक्ष अवस्थेत असलेल्या व्यक्तीस आत्मध्दानाचा साक्षात्कार दिला. त्या व्यक्तीचे नाव हाेते सिताराम झिलु मयेकर. ताे सावंतवाडी संस्थाना जवळील सुकळवाड गावाचा राहणारा हाेता. व्यवसायाने ताे चित्रकार हाेता. ताे याेगायाेगाने यशवंतराव महाराजांच्या दर्शनासाठी आला हाेता.महाराजांनी त्याला तात्काळ आेळखले कारण ताे साधासुधा नसुन एक परमाेच्च काेटीचा संत हाेता. पण त्याला एका महान संता कडुन अनुग्रह मिळाल्यावरच ताे आपले जिवन जगाच्या कल्याणासाठी अर्पीत करणार हाेता. त्याने महाराजांच्या चरणावर डाेके ठेवले तसा महाराजांनी त्याला जवळ घेऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला व लगेच त्याला भावसमाधी लागली. तन्मय स्थितीत असतांना महाराजांनी त्याला अनुग्रह दिला व नामस्मरणाची उपासना दिली. सीतारामवर महाराजांची विशेष कृपादृष्टी झाल्याने लवकरच ताे सिध्दप्राप्त झाला. व पुढे त्याने जगाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य अर्पण केले. व पुढे ताे सिताराम महाराज ह्या नावाने आेळखला जाऊ लागला. अशा प्रकारे महाराजांनी अनेक महापुरुषांना अनुग्रह देऊन सत्कर्मास लावले.

   अशा प्रकारे जाती धर्मात भेदभाव न करता सर्व जनता जर एकत्र आली तर काय करु शकते याचा प्रत्यय येथे येताे व सिताराम नावाचे थाेरपुरुष महाराजांच्या अनुग्रहामुळे सिताराम महाराज म्हणुन प्रसिध्द हाेतात व येथे अठरावा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) इंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button