नाशिक क्राईम

Nashik News बायकोला मारहाण करनं भवलं, पतीला न्यायालयाने ठोठावली ही भयानक शिक्षा


वेगवान नाशिक / wegwean nashik 

नाशिक, 3 जानेवारी 24  : नाशिक मधून ही बातमी आहे, एका पतीने आपल्या पत्नीला मारहाण केली, मात्र मारहाण या पतीला इतकी भोवली की पतीला न्यायालयाने एक मोठी शिक्षा सुनावली. ती शिक्षा साधीसुधी नाही तर तब्बल सात वर्ष सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली. 

याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी पतीला सात वर्षे सश्रम कारावास व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Accused gets 7 years sentence in case of assault on wife Nashik Crime) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ठार मारण्याच्या उद्देशाने वस्ताऱ्याने गळ्यावर वार करून जखमी केले होते.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

दीपक वसंत पवार (३२, रा. समर्थनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दीपक हा पत्नीसमवेत पंचवटीतील समर्थनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा.

३० जुलै २०२० रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्याने त्याच कारणातून वाद झाला आणि त्याने पत्नीच्या गळ्यावर वस्तार्याने वार करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एन.व्ही. निवणे यांच्यासमोर चालला.

यावेळी सरकार पक्षातर्फे ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी पंच, साक्षीदार तपासले. त्यात आरोपी दोषी सिद्ध झाल्याने न्या. निवणे यांनी आरोपी पवार यास ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.एम. पिंगळे, सहायक उपनिरीक्षक के.के. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button