नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय सोळावा

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज जीवनचरीत्र 


वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी

दि.२/१/२०२४

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १६ वा.

असा हा यशवंत देवाचा पुण्य प्रभाव /
विदेशीही ठेवती श्री चरणी शुध्द भाव /
अति आदरे घेती यशवंत देवाचे नाव /
भक्त कल्पतरु सर्वांचे देव आपुले //

    महाराज हळुहळु सटाणा येथील वातावरणाशी एकरुप हाेऊ लागले हाेते. या भागाचा भुगाेल लवकर कळावा म्हणुन त्यांनी बागलाण उपविभागाचा नव्या सेटलमेंटनुसार तयार करण्यात आलेला नकाशा कचेरीतील त्यांच्या आसना जवळील भिंतीवर लावला हाेता. महाराज राेज त्या नकाशाचा सखाेलपणे आभ्यास करीत व नंतर बागलाणच्या विकासाचा आराखडा आखत. बागलाणसह डांग भागाचाही विस्तार लवकरात लवकर व्हावा यासाठी महाराज आपल्या संपुर्ण लाव्याजम्यासह अनेकदा त्या भागांना भेटी देत असत. तेथील लाेकांना भेटुन त्यांच्याशी संवाद साधत. डांग भागातील आदिवासी लाेकांच्या लाेककला व संस्कृती जपण्यात महाराज त्यांना मदत करीत. मुल्हेरच्या ऊध्दव महाराज मंदीरातील अनेक वर्षांपासुनच्या परंपरा काही कारणास्तव बंद पडल्या हाेत्या. त्या परंपरा महाराजांनी पुन्हा चालु करण्यासाठी माेठे याेगदान दिले हाेते.
       बागलाणच्या विकासाबराेबरच तेथील लाेकपरंपरा जपणे हे देखील महाराजांनी अगदी जबाबदारीने सांभाळले हाेते. बागलाणच्या विकासाचा जणु धडाकाच महाराजांनी लावला हाेता. गावागावात पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक विहीरी, शेतीसाठी पाटचा-या, ठिकठिकाणी छाेटे माेठे बंधारे असे भरीव कामे त्यांनी अल्पावधीतच पुर्ण केली हाेती. त्यामुळे लवकरच सटाण्याला ऊर्जीतावस्था प्राप्त झाली हाेती. संपुर्ण बागलाण तालुका सुजलाम सुफलाम हाेऊ लागला हाेता. पुर्वी ज्या बागलाण ला कुणी ओळखत ही नव्हते ताेच बागलाण आज संपुर्ण जिल्ह्यात माेठ्या दिमाखात ऊभा हाेता. महाराजांनी बागलाण चा कायापालटच करुन टाकला हाेता. महाराजांच्या दर्शनासाठी हाेणा-या गर्दीत तर दिवसेंदिवस वाढच हाेत हाेती. असा हा महाराजांच्या किर्तीचा सुगंध ग्वाल्हेर पर्यंत जाऊन पाेहचला हाेता. ग्वाल्हेर संस्थानचे तत्कालीन राजे श्रीमंत जयाजीराव शिंदे यांनी बागलाण चे मामलेदार यशवंतराव महाराजांना भेटण्याची ईच्छा व्यक्त केली हाेती. मग काय राजा बाेले आणि दल हाले. लवकरच म्हणजे सन १८७१ साली ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंदे हे बागलाण च्या मामलेदारांच्या भेटीसाठी ग्वाल्हेरहुन मुंबई च्या प्रवासाला निघतात. ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंदे हे मुंबईस येत आहेत ही वार्ता मुंबईला ईंग्रज सरकार कडे पाेहचली. त्यांच्या व्यवस्थेची संपुर्ण जबाबदारी मुंबईचे लॉर्ड गव्हर्नर यांच्यावर साेपवीण्यात आली. शिंदे सरकार मुंबईला पाेहचले. लॉर्ड गव्हर्नर व शिंदे सरकारची भेट गाठ झाल्यानंतर त्यांनी मुंबईला येण्याचे कारण सांगीतले. शिंदे सरकार सांगु लागले, “ब-याच दिवसांपासुन आम्ही बागलाण चे मामलेदार यशवंत महादेव भाेसेकर यांच्या दैवी चमत्काराच्या गाेष्टी ऐकुन आहाेत. तसेच त्यांच्या परमार्थिक खर्चाचा आठावा घेतला असता ताे देखील एखाद्या संस्थानिका पेक्षाही माेठा आहे. तसेच काही ठिकाणी तर ते “बागलाण चा राजा” म्हणुनही प्रसीध्द आहेत. संपुर्ण मुलुखात ते “देवमामलेदार” ह्या नावाने आेळखले जातात. त्यांच्या बद्दलच्या ह्या सर्व अलाैकीक कथा ऐकुन आम्ही खुपच प्रभावीत झालाे आहाेत. त्यामुळे अनेक दिवसांपासुन आम्हाला ह्या महापुरुषाच्या भेटीची ओढ लागली आहे व त्यामुळेच आम्ही मुंबईला आलाे आहाेत.” यावर मुंबईचे लॉर्ड गव्हर्नर सांगु लागतात, “हाेय राजे तुम्ही जे ऐकले ते अगदी तंताेतंत खरे आहे. त्यांनी आपला सर्व संसार गाेरगरीबांसाठी ऊघडा केला. बागलाणात दुष्काळ पडला असता त्यांनी आपल्या नाेकरीची व जिवाची पर्वा न करता सर्वच्या सर्व सरकारी खजीना दुष्काळग्रस्त गाेरगरीबांना वाटुन दिला व कलेक्टरच्या तपासणीत ताे खजीना जसाच्या तसा भरल्याचा दैवी चमत्कार घडला. तेव्हापासुन तर संपुर्ण देशातुन लाेक त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागले व त्यांना देवमामलेदार म्हणु लागले. त्यांच्या घरी तर सदैव जत्रेचेच स्वरुप असते. मी ही आजपर्यंत त्यांना बघीतलेले नाही पण त्यांचे गुणगान राेजच ऐकत असताे. मलाही त्यांना भेटण्याची ब-याच दिवसांपासुन ईच्छा आहे.” त्यांचे हे बाेलणे ऐकुन मग शिंदे सरकार ने देवमामलेदारांना मुंबईस बाेलावीण्याचे ठरवीले. मग मुंबईच्या लॉर्ड गव्हर्नर साहेबांनी नाशिकच्या कलेक्टर ला हुकुम केला की सटाण्याच्या देवमामलेदारांना विनंती करुन मुंबईस येण्याचे आमंत्रण द्यावे. त्यावेळेस खानदेशचे कलेक्टर मी.अँशबर्नर साहेबांची नुकतीच नाशिकला बदली झालेली हाेती. अमळनेर प्रकरणात ज्याच्या खेळीने महाराजांना काही दिवसांसाठी राजीनामा द्यावा लागला हाेता हाच ताे अँशबर्नर. अँशबर्नरला माेठे कुतुहल वाटले. ग्वाल्हेरचे संस्थानप्रमुख राजे जयाजीराव शिंदे व मुंबईचे लॉर्ड गव्हर्नर सुध्दा यशवंत मामलेदाराबद्दल एवढी कमालीची निष्ठा बाळगतात आणि त्यांना मुंबईत येण्यासाठी विनंती करतात म्हणजे काय म्हणावे? आपले वरीष्ठ सुध्दा यशवंत मामलेदारांचे शिष्यत्व स्विकारतात म्हणजे नक्कीच काहीतरी गुण ह्या माणसात आहे असा विचार अँशबर्नर करु लागताे. कलेक्टर अँशबर्नर स्वतः जातीने सटाण्यास गेला व त्याने राजे व गव्हर्नरच्या भेटीची वार्ता देवमामलेदारांच्या कानावर घालुन विनंतीपुर्वक आमंत्रण दिले. महाराजांनीही कुठलाही आढा वेढा न घेता विनंतीला मान देऊन शिंदे सरकार व ब्रिटीश गव्हर्नरचे आमंत्रण स्विकारले. लवकरच महाराज मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले. महाराजांबराेबरच त्यांचे सहकारी श्री केशव रिसबुड, धाेंडाेपंत माेरेश्वर, पाणके मशालजी, हुजरे नावाचा आचारी, काळुराम शिपाई, स्वतः कलेक्टर अँशबर्नर व सटाण्यातील काही भक्तमंडळी ही महाराजांबराेबर मुंबईस जाण्यास निघाले. महाराज व त्यांच्या बराेबर असणा-या ईतर सर्व लाेकांसाठी रेल्वेची एक स्वतंत्र बाेगीच आरक्षीत करण्यात आली. सटाण्याचे देवमामलेदार मुंबईस जात आहेत अशी वार्ता सर्वत्र पसरल्याने प्रत्येक स्टेशनवर किमान पाच दहा मिनीटे तरी रेल्वे थांबवीण्यात यावी व ज्या भक्तांना परीस्थितीनुरुप सटाण्यास जाता येत नाही किमान अशा भक्तांना तरी देवमामलेदारांचे दर्शन घेऊ द्यावे अशा आशयाचे विनंतीपत्रच गावागावातुन स्टेशन मास्तर ला गेल्याने सर्वच स्टेशन मास्तरांची चांगलीच तारांबळ ऊडाली. सरकारने ही भक्तांच्या भावनांचा विचार करुन स्टेशन मास्तरला प्रत्येक स्टेशनवर रेल्वे थांबवीण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे मनमाड वरुन निघणा-या त्या रेल्वेचा त्या दिवसापुरता टाईमच बदलण्यात आला हाेता. तसेच काही अनुचीत प्रकार घडु नये व भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन घडावे ह्या हेतुने काही रेल्वे ही त्या दिवसापुरता रद्द करण्यात आल्या हाेत्या. महाराज मनमाड स्टेशनवर आल्यानंतर तर भक्तांची प्रचंड गर्दी महाराजांच्या दर्शनासाठी झाली हाेती. मनमाड वरुन रेल्वे निघाली व प्रत्येक स्टेशनवर दहा मिनीटासाठी थांबु लागली. प्रत्येक स्टेशनवर प्रचंड गर्दी हाेत असल्याने प्रत्येक स्टेशनवर पाेलीस बंदाेबस्त ही ठेवण्यात आलेला हाेता व लांबुनच सर्वांनी दर्शन घ्यावे असेही भक्तांना सांगण्यात आलेले हाेते. प्रत्येक जण मग लांबुनच देवमामलेदारांचे दर्शन घेऊन त्यांचे रुप डाेळ्यात साठवत हाेते. महाराज ही सर्वांना लांबुनच हातवारे करुन आशिर्वाद देत हाेते. गर्दीमुळे चेंगराचेंगरी हाेऊ नये म्हणुन प्रत्येक स्टेशनवर स्टेशनमास्तर व कलेक्टर अँशबर्नर जातीने लक्ष देत हाेते. जागाेजागी महाराजांची बडदास्त एखाद्या राजाला शाेभेल अशी ठेवली जात हाेती. हा सर्व प्रसंग जनता जनार्दनाचे महाराजांवर असलेली श्रध्दा व प्रेम दाखवीत हाेता. शेवटी रात्री अकरा वाजता महाराज मुंबईच्या बाेरीबंदर स्टेशनवर पाेहचले. व रात्री स्टेशन मास्तर चिंचाेपंतांच्या घरी मुक्कामाला थांबले. दुस-या दिवशी सकाळी लवकरच शिंदे सरकार व लॉर्ड गव्हर्नर हे आपल्या लाव्याजम्यासह पालखी घेऊन चिंताेपंतांच्या घरी आले व तेथुनच महाराजांना पालखीत बसवीले व मुंबईतुन वाजत गाजत त्यांनी महाराजांची मिरवणुक काढली. मुंबईच्या ईतीहासात प्रचंड गर्दी झाली. सर्व जाती धर्माचे लाेक महाराजांचे दर्शन घेऊ लागले. स्वतः शिंदे सरकार व लॉर्ड गव्हर्नर हे महाराजांच्या पालखी मिरवणुकीत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया ऊंचावल्या. शेवटी मिरवणुक राजवाड्यात आली. राजघराण्यातील स्त्रियांनी महाराजांची पाद्यपुजा करुन सन्मानपुर्वक महाराजांना राजवाड्यात आणले. महाराज जवळपास सतरा ते अठरा दिवस मुंबईत थांबले हाेते. महाराजांच्या दर्शनासाठी मुंबईतील त्या राजवाड्यात प्रचंड गर्दी हाेऊ लागली हाेती. हार, प्रसाद, नारळांच्या राशीच्या राशी महाराजांच्या पायाशी पडु लागल्या हाेत्या. मुंबईच्या ईतीहासात माेठ्या नवलाईची गाेष्ट घडली ती म्हणजे मुंबईतील हार, नारळे, व मिठाई संपुष्ठात आली. माेठमाेठ्या व्यापा-यांनी ताेंडात बाेटे घातली. असा हा महाराजांचा सुगंध लांबलांब पर्यंत दरवळतच हाेता.

   अशा प्रकारे शिंदे सरकार व ब्रिटीश गव्हर्नर सुध्दा महाराजांचे भक्त हाेतात व मुंबईतुन महाराजांची पालखीत बसवुन मिरवणुक काढतात व येथे साेळावा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button