आर्थिक

Nashik News नाशिक जिल्ह्यातील या 12 जातींना मिळणार 5 लाखा प्रमाणे कर्ज Loan

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत मिळणार कर्ज


वेगवान नाशिक / wegwan Nashik 

नाशिक, ता. 2 जानेवारी 24 Nashik News  Suvidha karja yojana  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) व राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्तीय विकास महामंडळ तथा एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत मातंग व त्याअंतर्गत येणाऱ्या 12 पोटजातीतील लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून सुविधा कर्ज योजना Facility Loan Scheme  ( रूपये 5 लाख), लघुऋणवित्त कर्ज योजना (रूपये 1 लाख 40 हजार) व महिला समृद्धी योजना (रूपये 1 लाख 40 हजार) सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा बेरोजगार गरजु लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), संजय आरणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे सुविधा कर्ज योजनेत एनएसएफडीसी नवी दिल्ली यांचे रूपये 3 लाख 75 हजार, महामंडळाकडील बीजभांडवल रूपये 90 हजार, अनुदान रूपये 10 हजार, लाभार्थींचा सहभाग रूपये 25 हजार अशी एकूण रूपये 5 लाख रक्कम आहे. लघुऋणवित्त कर्ज योजनेत एनएसएफडीसी नवी दिल्ली यांचे कर्ज रूपये 1 लाख 25 हजार व अनुदान रूपये 10 हजार, लाभार्थीचा सहभाग रूपये 5 हजार असे एकूण 1 लाख 40 हजार रक्कम आहे. महिला समृद्धी योजनेत एनएसएफडीसी नवी दिल्ली यांची रक्कम रूपये 1 लाख 25 हजार, महामंडळाकडील अनुदान रूपये 10 हजार व लाभार्थीचा सहभाग रूपये 5 हजार असे एकूण रूपये 1 लाख 40 हजार इतके कर्ज उद्योग व्यवसायासाठी वितरीत केले जाणार आहे.

योजनेच्या लाभासाठी अर्जदार 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच त्याने यापूर्वी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव अर्जदारास असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांसह करारपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. सुविधा कर्ज व लघुऋणवित्त योजनेमध्ये पुरूष-स्त्रीयांचे आरक्षण शहरी व ग्रामीण भागासाठी 50 टक्के असून पुरूष व स्त्रीयांचे प्रमाण अनुक्रमे 60 टक्के व 40 टक्के असे राहील. महिला समृद्धी योजनेत पुरूषांचा समावेश नाही.

अर्जदारास वारसाचे बंधपत्र कर्ज वितरणापूर्वी वसुलीपोटी उत्तर दिनांकित धनादेश कर्जाचा पहिला हप्ता वितरित केल्यानंतर विमा महामंडळ व लाभार्थी यांच्या संयुक्त नावे देणे बंधनकारक आहे. दरवर्षी विम्याचे नुतनीकरण करण्यासाठीचा खर्च अर्जदारास करावा लागेल. सदरचे योजनानिहाय कर्ज समान हप्त्यांमध्ये मुद्दल व व्याज याप्रमाणे वसुली असणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करतांना उद्दिष्टनिहाय परितक्त्या/ विधुर/अपंग/ निराधार व्यक्तींना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सुविधा कर्ज 60, लघुऋणवित्त 40 व महिला समृद्धी 40 असे उद्दिष्ट्ये विभागून देण्यात आलेले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ.आंबेडकर सामाजिक न्यायभवन, नासर्डीपुलाजवळ, नाशिक-पुणे रोड नाशिक या कार्यालयात किंवा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0253-2236081 यावर संपर्क साधावा असेही श्री. आरणे यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button