नाशिक ग्रामीण

केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्या विरोधात वाहन चालक आक्रमक


नाशिक नाशिक/Nashik/

अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव – 2 जानेवारी 24  केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

अपघात प्रसंगी वाहन चालक स्थानिक नागरिकांकडून होणाऱ्या मारझोडीमुळे जीव मुठीत घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जात असतात असे अनेक प्रकरणात दिसून येते.मात्र या कायद्यामुळे वाहन चालकांना नाहक दडपणाखाली जीवन जगावे लागेल आणि कदाचित त्यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याचा निषेध करण्यासाठी शहराजवळच असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल ऑइल इत्यादी पुरवठा करणाऱ्या साठवणूक केंद्रातील हजारो ट्रक टँकरचे चालक यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 3 जानेवारी पर्यंत जर केंद्र शासनाने हा कायदा मागे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात वाहन चालक मालक आक्रमकरीत्या या कायद्याचा विरोध करण्याच्या विचारात असल्याचे समजते.

दरम्यान या बंदमुळे उत्तर महाराष्ट्रात होणारा पेट्रोल डिझेल पुरवठा बाधित झाला असून अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक जिल्हाधिकारी तातडीने पानेवाडी येथील इंधनपुरवठा साठा प्रकल्पाकडे मार्ग काढण्यासाठी रवाना झाल्याचे समजते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button