नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय पंधरावा

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी

दि.१/१/२०२४

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १५ वा

ईच्छा म्हणजे जिवन / अनिच्छा जाणावे मरण /
ईच्छा अनिच्छा दाेघाहुन / नामा निराळा ते जीवन मुक्त //

  खजीन्याच्या चमत्कारानंतर सर्व लाेकांनी महाराजांना एका पालखीत बसवीले व गावातुन भव्य मिरवणुक काढली. ईकडे प्रांतसाहेब हा चमत्कार बघुन बराच नरम झाला हाेता. त्याने ही मग महाराजांनाच आपले दैवत मानुन आपली श्रध्दा महाराजांच्या चरणी अर्पण केली हाेती. प्रांतसाहेबांचे दुषीत मन पुर्णपणे बदलले हाेते. त्यांच्या स्वभावात कमालीचा कायापालट झाला हाेता. दाेन तीन दिवस सटाण्यातच मुक्कामी राहुन नंतर प्रांतसाहेब परतीच्या प्रवासाला निघतात. तेव्हा त्यांचा घाेडा पाय झाडु लागताे व धाडकन जमीनीवर आदळताे. प्रांतसाहेबांना माेठा पेच पडताे. कारण ऊद्या सकाळी काही करुन जिल्हा कलेक्टर कडे जाणे गरजेचे असते व अशा महत्वाच्या वेळीच ह्या घाेड्याला तरी काय झाले असे म्हणुन माेठ्या विवंचनेत पडताे. काही वेळातच महाराज कचेरीत येतात तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजताे. मग महाराज घाेड्याजवळ जाऊन ऊभे राहतात आणि काय आश्चर्य घाेडा महाराजांचे चरण चाटु लागताे आणि ताडकन ऊठताे. प्रांतसाहेबांना पुन्हा आश्चर्याचा धक्का. प्रांत पुन्हा महाराजांचे चरण स्पर्श करतात व घाेड्यावरुन परतीच्या प्रवासाला निघतात. ज्या प्रांतसाहेबांनी अगदी तिरस्काराने सटाण्यात पाऊल ठेवले हाेते तेच प्रांतसाहेब आता मनात श्रध्दा, नम्रता व प्रेम घेऊन सटाण्याच्या बाहेर पडले हाेते.ईकडे काही दिवसांनंतर खजिन्याच्या चमत्काराची बातमी “खानदेश वैभव” ह्या साप्ताहीकात छापुन आल्यानंतर तर सटाण्यात राेजच गर्दीचा महापुर लाेटला जाऊ लागला. देशभरातुन लाेक मिळेल त्या साधनाने सटाण्यात येऊन देवमामलेदारांचे दर्शन घेण्यासाठी दाखल हाेऊ लागले. दर्शन ईच्छुकांच्या गर्दीचा परीणाम आपल्या तहसीलदार पदाच्या कार्यावर हाेऊ नये ही दखलही महाराजांना घ्यावी लागत हाेती. बाहेरगावाहुन येणा-या लाेकांना हार, नारळ, पेढे व प्रसादाची साेय गावातच व्हावी यासाठी सटाण्यातील काही लाेकांनी महाराजांच्या तहसील कचेरी जवळच प्रसादाची दुकाने थाटली. त्या काळात ही जगावेगळी गाेष्ट सटाण्याला घडली. सटाण्याच्या तहसील कचेरीला मंदीर व त्या कचेरीतील यशवंत मामलेदारांना लाेक देव मानु लागले. सर्व लाेक आता यशवंतराव महाराजांना “देवमामलेदार” म्हणु लागले व पुढे हेच नाव सर्वत्र प्रसीध्द झाले. बागलाणचे मामलेदार जनमानसात दाेन कारणांनी अतीशय आदरणीय व्यक्तिमत्व ठरले हाेते. एक म्हणजे ते गाेरगरीब रयतेप्रती दयाळुपणाने व मानवता धर्माने वागत व सरकारी कामकाजात, न्यायदान करताना नि:पक्षपातीपणा जपत. तर दुसरे कारण म्हणजे आध्यात्मिक व सांस्कृतीक कार्यात ते सर्व समाजाला साेबत घेऊन त्यांच्यात सात्विक भाव पेरत. म्हणुन अल्पावधीतच ते सर्वदुर प्रसिध्द झाले हाेते. त्यांच्या दैवी शक्तीचा सुगंध तर संपुर्ण भारतभर पसरला हाेता. म्हणुनच तर सटाण्यासारख्या अडगळीच्या ठिकाणी सुध्दा त्यांच्या दर्शनासाठी लांबलांबहुन लाेक येऊ लागले हाेते. अनेक असाध्य राेगांवर ही महाराज याेग्य पध्दतीने ऊपचार करीत असत. बागलाणच्या डांग भागातील जंगलातील विविध औषधी वनस्पतींपासुन आयुर्वेदिक औषधे तयार करुन गरजु रुग्णांना ते माेफत पुरवीत असत. अशा प्रकारे अनेक रुग्णांची देखील महाराज सेवा करीत असत. महाराजांच्या त्या औषधाने मग ते रुग्ण ही लवकरच बरे हाेत असत. कचेरीतील कामकाज व नंतर भक्तांची सेवा यामुळे महाराजांना ऊसंत अशी माहितीच नव्हती. आपले सर्व आयुष्य त्यांनी गाेरगरीब जनतेच्या हितासाठीच अर्पण केले हाेते. सटाण्यातील जनतेवर त्यांचे विशेष प्रेम हाेते. कारण ज्या वेळेस त्यांची सटाण्यात बदली झाली हाेती त्यावेळेस पासुनच सटाणेकरांचे हाल अपेष्ठा पाहुन महाराजांचे मन अगदी हेलावुन गेलेले हाेते. कारण बागलाणात शेतजमिनी तर भरपुर हाेत्या पण पाण्याचे नियाेजन नसल्याने संपुर्ण अर्थव्यवस्थाच काेलमडली हाेती. बागलाणातील डांगी पट्टयात जंगल भरपुर हाेते व त्या जंगलांमद्ये त्याकाळातील सर्वाधीक वाघ हे बागलाणातच हाेते. इंग्रज लाेक त्या वाघांना “बाग” असे म्हणत म्हणुनच तर सटाण्याला दुस-या नावाने “बागलाण” असे संबाेधले जायचे. बाग म्हणजे वाघ व लँड म्हणजे ठिकाण (बागलँड) वाघांचे ठिकाण म्हणजेच बागलाण असे नाव पुढे परीचीत झाले हाेते. भरपुर प्रमाणात जंगल तसेच भरपुर शेतजमिनी एवढे सर्व असुनही बागलाण च्या ह्या परीसराचा विकास का मंदावला असावा ह्या विचारानेच महाराजांना ग्रासले हाेते. सुरवातीच्या काळात काही आदीवासी तसेच दराेडेखाेरांकडुन महाराजांनाही काही प्रमाणात का असेना पण त्रास सहन करावाच लागला हाेता. पण कलांतराने महाराजांचे औदार्य व दैवी चमत्कार बघुन मग ह्या लाेकांनी सुध्दा ह्या सर्व गाेष्टी साेडुन सन्मार्गाला लागुन महाराजांच्या कार्यात त्यांना साथ देणेच पसंत केले हाेते. त्यामुळे हळुहळु सतत डिस्टर्ब राहणा-या बागलाणात देवमामलेदारांच्या प्रयत्नाने हळुहळु शांतता निर्माण हाेऊ लागली. अशांत बागलाणाची घडी बसवीण्यासाठी देवमामलेदार साहेबांनी बाहेर जनमानसात ‘मानवतावाद’ तर कचेरीत ‘राजनिष्ठावाद’ अवलंबल्यानेच त्यांना आजपर्यंत त्यांनी बागलाणचे ‘नंदनवन’ करण्याचा घेतलेला वसा पुर्णत्वास नेण्याच्या प्रत्येक उपक्रमाला यश येत हाेते. बागलाणातील सन १८७० मधील दुष्काळाला सामाेरे जातांना त्यांना सरकारी खजीना वाटपाचा जाे महत्वपुर्ण निर्णय घ्यावा लागला हाेता तसा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणुन त्यांनी बागलाणच्या परीसरात एक माेठे धरण निर्माण करण्याचा प्रस्ताव वरीष्ठांकडे मांडला हाेता. लवकरच वरीष्ठांनी देखील त्यांच्या ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली हाेती. त्या काळातील दुष्काळाची सर्वात जास्त झळ मुल्हेर, तहाराबाद व नामपुर ह्या भागाला तर ईकडे अभाेणा, देवळा, डांगसाैंदाणे ह्या डांगीपट्टयातील गावांना बसली हाेती त्यामुळे बागलाणात दाेन माेठी धरण निर्माण करण्यासाठी महाराजांची ऊपाययाेजना सुरु झाली. लवकरच धरणांच्या जागेसाठी सर्वे सुरु झाला. अभाेण्या जवळील सप्तश्रृंगी देवीच्या गडापासुन जवळच असलेल्या व सप्तश्रृंगी मातेलाच ईनाम म्हणुन दिलेले चंडीकापुर (आत्ताचे चणकापुर) हे गाव व ईकडे साल्हेर मुल्हेर किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेले हरणबारी हे गाव धरणांसाठी मंजुर झाले. लवकरच महाराजांच्या प्रयत्नाने बागलाणात चनकापुर व हरणबारी ही दाेन माेठी धरणे निर्माण झाली. महाराजांच्या स्वभावातील सर्वात वैशीष्ट्यपुर्ण गुण म्हणजे महाराज ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा राबवीत असत त्याच ठिकाणातील लाेकांना ते ही कामे मिळवुन देत व राेजगाराला लावत असत. त्यामुळे कुठलेही वाद विवाद न हाेता ही कामेही पुर्णत्वास जात व लाेकांनाही राेजगार मिळत असत. महाराजांची ही आदर्श कार्यशैली बघुन जनता त्यांच्यावर बेहद खुष हाेत. शासकीय कामांबराेबरच दैवी गुणांचा अविष्कार असल्याने महाराजांच्या दर्शनासाठी सामान्य जनतेबराेबरच अनेक महान संत देखील सटाण्यात हजेरी लावत. त्यात प्रामुख्याने त्या काळातील नामवंत संत साकाेरीचे श्री ऊपासनी महाराज, शेगावचे संत गजानन महाराज, ब्रम्हचैतन्य गाेंदवलेकर महाराज, माधवनाथ महाराज अशा कितीतरी महान संतांनी ह्या सटाणा नगरीत महाराजांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असत. त्यामुळे सटाणा हे गाव देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची पुण्यनगरी म्हणुन नावारुपास येउ लागले हाेते.

   अशा प्रकारे बागलाणकरांना पुन्हा दुष्काळाला सामाेरे जावे लागु नये ह्या ऊद्देशाने महाराज चणकापुर व हरणबारी ह्या दाेन माेठ्या धरणांची निर्मीती करतात. तसेच सामान्य जनतेसह अनेक नामवंत संत महाराजांच्या दर्शनासाठी सटाणा नगरीत हजेरी लावतात व म्हणुनच ळुहळु सटाणा ही नगरी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची पुण्यनगरी म्हणुन नावारुपास येऊ लागते व येथे पंधरावा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button