नाशिक क्राईम

Nashik News नाशिक शहरात चोरटे आता दारुचं चोरु लागले


 

वेगवान नाशिक / Nashik News 

नाशिक, 1 जानेवारी 2024  : चोरट्यांनी थर्टी-फस्टच्या पूर्वसंध्येला वाईन शॉपी दुकानांचे शटर उचकटून ब्रॅण्डेड विदेशी मद्याच्या बाटल्या चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. शहर आयुक्तालयातील शरणपूर रोडवर तर दुसरा प्रकार घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाईन शॉपी दुकान फोडल्याप्रकरणी घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात चोरट्यांनी ५ लाख ८४ हजारांचे विदेशी मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. (Thieves break into wine shop Foreign liquor worth about 6 lakhs stolen in two incidents Nashik Crime)

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

शहर आयुक्तालयातील शरणपूर रोडवरील शरणपूर वाईन शॉपलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून तिजोरीतील महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा 87,610 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

तक्रारी आणि पोलिस कारवाई:

शरणपूर वाईन शॉपचे व्यवस्थापक शैलेश शंकरराव कडवे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाइन शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

या ठिकाणीही चोरी 

घोटीतील मुंढेगाव येथील तनिष्क हॉटेल-बीअर बारही चोरट्यांनी फोडला. त्यांनी सरकत्या ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश करून 3,26,960 रुपये किमतीच्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याशिवाय काउंटरमधून १,७०,००० रुपये चोरीला गेले.

तनिष्क हॉटेल-बीअर बारचे व्यवस्थापक शेख युसूफ रसूल यांनी घोटी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. या घटनांमुळे घरफोड्यांसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी वाढीव सुरक्षा उपाय आणि पोलिस तपासाची गरज अधोरेखित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button