नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय चौदावा

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज जीवनचरीत्र


वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी

दि.३१/१२/२०२३

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १४ वा

काय रे डाेळ्या दिसे सार /
ते अगदी आहे का खर /
पाहण्या निट पुढे झाला /
खजीना हाेता गच्च भरलेला //

     महाराजांनी झालेला सर्व प्रकार नाशिक कलेक्टर ला स्वत: च पत्राद्वारे कळवुन टाकलेला हाेता. त्यामुळे आता महाराजांना काेणत्याही क्षणी अटक हाेणार हाेती. तिकडे नाशिकचे कलेक्टर मि. एच.एन.एस्कार्ईन साहेबांना हा प्रकार समजल्या नंतर तर ते खुर्चीवरुन अक्षरश: ऊसळलेच. त्यांनी सर्वांची झाेप ऊडवली हाेती. सर्व वरीष्ठांना तात्काळ कळवुन सखाेल चर्चा केली हाेती. कलेक्टर करीत हाेता हाय हाय, सरकारी खजीना ऊधळला म्हणजे काय? ही काही गंमत, पाेरखेळ की काय? असे म्हणुन गाेरासाहेब संतापाणे लालबुंद झाला हाेता. ताे नुसता चवताळला हाेता. समाेर येईल त्याला शिव्या देत, “पकडा त्याला आणि टाका तुरुंगात” असे म्हणुन हात चाेळत जमीनीवर पाय आदळत हाेता. त्यामुळे प्रांत साहेब मि.बाळकृष्ण यांना पहाटेच घाैडदाैड करीत सटाण्याचा रस्ता धरावा लागला हाेता. कलेक्टरने प्रांतसाहेबांबराेबरच काही सरकारी गुप्तहेर देखील सटाण्याच्या कान्याकाेप-यात पाठवीण्यात आलेले हाेते. कारण त्यांना सर्व अहवाल लवकरात लवकर जासुदा बराेबर पाठवायचा हाेता. दुसरा दिवस ऊजाडला आणि दुपारच्या आत प्रांतसाहेब घाेड्यावर बसुन सटाण्यात आले. त्यांना बघुन तर सटाणेकरांच्या पाेटात धस्स झाले. काळीज थरथरु लागले. आता पुढे काय घडणार ह्या विचारानेच लाेक चिंतातुर झाले. प्रांतसाहेबांनी घाईघाईने जेवण ऊरकुन महाराजांकडे शिपाई धाडला. कारण कलेक्टरचा आदेशच हाेता हाेता की, “खजिना तपासा जसाच्या तसा आणि मामलेदारास पकडुन आणा असेल तसा” शिपाई लगेच महाराजांच्या घरी गेला व महाराजांना नमस्कार करुन प्रांतसाहेबांचा निराेप सांगीतला. महाराज लगेच श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत कचेरीत आले. समाेर प्रांत साहेब बसलेले हाेते. महाराजांनी प्रांतसाहेबांना नमस्कार केला. मात्र प्रांतसाहेबांनी त्यांचा नमस्कार न स्विकारता त्यांच्यावर ओरडु लागले, “आत्ताच्या आत्ता मला खजीन्याची तपासणी करायची आहे. अरे तुला माहीती नाही हे प्रकरण किती गंभीर आहे.” यावर महाराज शांतपणे म्हणाले, “साहेब माझे नम्र निवेदन ऐकुण घ्या. ह्या दुष्काळपिडीतांचे हाल मला बघवीले
नाही त्यामुळे मी तिजाेरीतील सगळा पैसा त्यांना वाटुन टाकला. त्यामुळे आता तर खजीन्याची तिजाेरी पुर्णत: रिकामी आहे. सरकारी पैशांना हात लावण्याचा मला अधिकार नाही. मी किती माेठी चुक केली याची मला जाणीव आहे. त्यामुळे आता तुम्ही जाे निर्णय घ्याल ताे मला मान्य राहील.” यावर खुर्चीवरुन ऊठुन प्रांतसाहेब रागाने थरथरत म्हणाले, “इडीयट, समजताेस काय स्वत:ला? तुला सरकारी खजीना वाटुन देण्याचे कारणच काय? खजीना म्हणजे तुझ्या बापाचा माल समजलास की काय?काय संबंध खजीन्याचा आणि लाेकांचा? अरे तुझ्या ह्या मुर्खपणाचे किती वाईट परीणाम घडतील याची कल्पना तरी आहे का तुला? आता तुला अटक करुन नाशिकच्या जेल मधे टाकावे लागेल. मग बस काेठडीत ह्या गरीबांचे आशिर्वाद घेत.” असे काही काही बाेलुन प्रांतसाहेब महाराजांचा अपमान करीत हाेते. प्रांतसाहेब खुर्चीवरुन ऊठले व त्यांनी ऊजवीकडे पाहीले तर त्यांना दिड दाेन हजार माणसांचा जमाव त्यांच्या दिशेने येतांना दिसला. त्यांना माेठे आश्चर्य वाटले आपल्या भेटीसाठी एवढा माेठा जमाव? पण लगेच प्रांतसाहेबांचा गुप्तहेर आला व त्यांना सांगु लागला, “साहेब कृपया आपण आतच रहावे. बाहेर येऊ नये. कारण हा सर्व जमाव मामलेदार
यशवंतरावांना अटक हाेऊ नये ह्या काळजी पाेटी तुम्हाला विनंती करण्यास आलेला आहे. त्यामुळे जनतेच्या व तुमच्यात हाेणा-या परस्पर विराेधी संभाषणामुळे वातावरणाला हिंसक वळण लागण्याची दाट शक्यता असल्याने तुम्ही आतच थांबावे व एवढ्या माेठ्या जमावाशी बाेलणे टाळुन जमावातील दाेन चार पुढा-यांना आत बाेलवुन काय ताे निर्णय घ्यावा.” गुप्तहेर ने सांगीतल्याप्रमाणे प्रांतसाहेबांनी जमावातील काही माणसांना आत खाेलीत बाेलवुन घेतले. मग त्यातील काही माणसे सांगु लागली, “साहेब आमची विनंती एेका. आमच्या महाराजांना अटक करु नका. त्यांनी आपला सर्व संसार हा गाेरगरीबांसाठी ऊघडा केला. संपुर्ण तालुक्यावर ऊपकार केले व जनतेचे प्राण वाचवीले. त्यामुळे तुम्ही काय शिक्षा करायची ती आम्हाला करा पण आमचे महाराज शाबुत राहु द्या.” यावर प्रांत साहेब म्हणाले की, “सरकारी खजीना वाटुन चुक मामलेदारांनी केलेली आहे व सरकारी कायद्यानुसार आता त्यांना अटक हाेणे अटळ आहे. त्यामुळे आता तुम्ही सरकारी कामात व्यत्यय आणु नका.” यावर आलेले सर्वजण प्रांत साहेबांना खुपच विनवण्या करु लागतात. आता मात्र प्रांत साहेबांना खुपच पेच पडताे ते मनाशीच म्हणतात, “आता काय करावे? हा एवढा माेठा जमाव. आणि आपण तर एकटेच. आता आपण त्रागा करुन चालणार नाही. एवढ्या माेठ्या जमावाला डावलणे साेपे नाही. नाहीतर ऊगीचच काही तरी भलतेच घडावे.” असा विचार करुन प्रांतसाहेबांनी एक युक्ती केली की ह्या सर्व जणांना काहीतरी ऊलटसुलट सांगुन घरी पाठवुन देऊ आणि मग नंतर खजीन्याची तपासणी करु.असा मनाशी विचार करुन प्रांतसाहेब जनतेला सांगु लागले, “ठिक आहे तुम्ही सांगता म्हणुन मी दाेन तीन दिवस तपासणी तहकुब ठेवताे व वरीष्ठां पर्यंत तुमचे म्हणणे मांडताे व तुमच्या मामलेदारास न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करताे. मग काय ताे निर्णय घेताे. ताे पर्यंत तुम्हीही आता
येथुन जावे.” असे सांगुन सर्वांना जाण्यास सांगताे. मग सर्वजण यशवंतराव महाराजांना वेढा देऊनच तेथुन जातात व महाराजांच्या घरी पाेहचतात. मग महाराज सर्वांना शांत करुन सांगतात की, “भावांनाे तुमचे स्वर्गीय प्रेम मला मिळते आहे ही किती भाग्याची गाेष्ट आहे. पण बंधुनाे माझे म्हणणे तुम्ही एेका, मी खजीना वाटला आहे त्यामुळे माझी चाैकशी तर हाेणारच. मग कशाला ह्या प्रांतसाहेबांना आपल्या ह्या गर्दीचा त्रास. सरकारी कामात अशा गर्दीमुळे दबाव येणे अनुचीत आहे.” महाराजांचे म्हणणे लाेकांना काहीसे पटले पण तरीही कुणीही महाराजांना साेडायला तयार नव्हते. कारण त्यांना भिती वाटत हाेती की न जाणे कुणी रात्री येऊन महाराजांना जेरबंद करुन घेऊन गेले तर? असा विचार करुन त्या दिवशी सर्व सटाणेकर रात्री महाराजांच्या घराजवळील माेकळ्या पटांगणातच झाेपले. जनता जनार्दनातील हे प्रेम अपुर्व हाेते. आज सर्व सटाणेकर एकत्र झाले हाेते. ईकडे सरकारी चक्र सुरु झाले हाेते. प्रांतसाहेब कामाला लागले हाेते. प्रांतसाहेब रात्री झाेपतांना विचार करु लागले की, ऊद्या सकाळी लवकर ऊठुन फक्त कचेरीतल्या नाेकरांनाच बाेलावुन घेऊ व पुरावा म्हणुन त्यांच्यासमाेरच खजीन्याची तपासणी करुन घेऊ. तपासणी तरी कसली? नाहीतरी तिजाेरी रिकामीच आहे. व तपासणी नंतर ताबडताेब त्या मामलेदाराला अटक करुन नाशिकला घेऊन जाऊ. त्यामुळे उद्या सकाळी लवकरच पाेलीस बंदाेबस्त मागवुन घेऊ. कारण एवढ्या माेठ्या जनसमुदायामधुन आराेपीस घेऊन जाणे खुप अवघड हाेईल. त्यामुळे पाेलीसांचा माेठा ताफा मागवलाच पाहीजे. असा विचार करुन प्रांतसाहेबांनी राताेरात सरकारी यंत्रणा सज्ज केली. जनतेच्या भावना व त्या अनुशंगाने येणारे प्रसंग लक्षात घेता काय काय ऊपाययाेजना केली पाहीजे हे सर्व रिपाेर्ट नाशिकच्या कलेक्टरला ताबडताेब कळवीण्यात आले हाेते. साहेब सकाळी लवकर ऊठले. ऊठुन पटकन तयार झाले. मग शिपायामार्फत कचेरीतील सर्व कर्मचा-यांना निराेप गेले ते कचेरीला त्वरीत हजर हाेण्याचे. मग शिरस्तेदार, खजीनदार, कारकुन, शिपाई व फाैजदार सर्व भराभर आले. सर्वांच्या पाठाेपाठ प्रांतसाहेब आले. आधी कचेरीचे सर्व आवार फिरले. तेवढ्यात नाशिक व मालेगाव येथुन शस्त्रधारी पाेलीसांचा ताफा आला. खुप माेठा पाेलीस बंदाेबस्त मागवीण्यात आला हाेता. जसे काही सटाण्यात माेठे युध्दच हाेणार हाेते. जवळपास १२५ ते १५० शस्त्रधारी पाेलीसांची फाैज सटाण्यात दाखल झाली हाेती व संपुर्ण गावालाच त्यांनी वेढा दिला हाेता. खजीन्याची पुर्ण तपासणी हाेईपर्यंत कचेरीकडे कुणीही फिरकायचे ही नाही असे आदेश जनतेला देण्यात आले हाेते. प्रांतसाहेबांची ही खेळी पाहुन सटाण्यातील जनता चांगलीच बुचकळ्यात पडली. कारण कालच ह्याच प्रांतसाहेबांनी वरीष्ठांशी चर्चा करुन महाराजांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन जनतेला दिले हाेते आणि आज हे काय नवीन नाटक? अशा प्रश्नाने जनतेला चांगलेच ग्रासले व एवढा प्रचंड पाेलीस बंदाेबस्त पाहुन जनतेला माेठा धक्काच बसला. ईकडे खजीन्याच्या तपासणी आधी दैनंदीन कँशबुकवरुन आकडेवारीचा तपशील घेतला गेला. दैनंदीन कँशबुकवर शेवटच्या तारखेचा आकडा रुपये १,२७,००० असल्याचे निदर्शनास आले. मग तिजाेरीचा पंचनामा करण्यासाठी प्रांतसाहेब कचेरीतील सर्व नाेकरांना घेऊन खजीन्याच्या खाेलीत गेले. खजीनदाराला सांगीतले, “हं आता खजीन्याची चावी आणा ईकडे.” वास्तविक पाहता प्रांतसाहेबांचे हे वागणे चुकीचे हाेते कारण शासकीय नियमानुसार खजिन्याची तपासणी ही यशवंतराव महाराजांच्या समाेरच व्हायला पाहीजे हाेती. कचेरीतील नाेकरांचा सुध्दा ह्या गाेष्टीला विराेध हाेता. पहीले महाराजांना बाेलवा मग काय करायचे ते करा असे जाे ताे प्रांत ला सांगत हाेता. पण प्रांत कुणाचेही ऐकुण घेण्यास तयार नव्हता. प्रांत ने लगेच खजीन्याची चावी द्या आता असे खजीनदाराला हुकुम केला. खजीनदाराने तिजाेरीची च्यावी प्रांतच्या हातात दिली तसे सर्वांचे काळीज थरथरले कारण खजीना तर रिकामा आहे म्हणुन आता महाराजांना अटक नक्कीच हाेईल अशी चिंता सर्वांना वाटत हाेती. प्रांतसाहेबांनी लगेच तिजाेरीला चावी लावली आणि तिजाेरीचे दार ऊघडले……. आणि ……… सर्वजण डाेळे विस्फारुन पाहु लागले. प्रांतसाहेबांचे तर डाेकेच गरगरायला लागले. खजीनदार पुन्हा पुन्हा डाेळे चाेळुन पाहु लागला. ईतर कर्मचारी आपण स्वप्नात तर नाही? असा विचार करु लागले. कारण बघतात तर काय? खजीना गच्च भरलेला हाेता. कुणालाच काहीच कळत नव्हते की नक्की हे काय घडले? प्रांतसाहेब खजीन्याला स्पर्श करुन खात्री करुन घेऊ लागले. खजीना जसाच्या तसा गच्च भरलेला हाेता. कचेरीतील सर्व कर्मचारी एकमेकांकडे आश्चर्याने पाहु लागले. सर्वांना अत्यानंद झाला. सर्वांच्या डाेळ्यातुन अश्रु वाहु लागले. कारण आता ह्या सर्व प्रसंगामधुन त्यांचे प्राणप्रीय महाराज सुटणार हाेते. खजीनदार लगेच प्रांतसाहेबांना सांगु लागला, “साहेब माझे तर डाेकेच चालत नाही आहे. कारण कालच महाराजांनी सर्वच्या सर्व खजीना दुष्काळग्रस्त गाेरगरीबांना वाटुन टाकला व त्यानंतर मी ह्या माझ्या हातांनी ही रिकामी तीजाेरी बंद करुन हे कुलुप लावले व तेव्हापासुन तर चावी माझ्याकडेच आहे. आणि आज हा काय चमत्कार झाला?प्रांतसाहेबांना ही माेठे आश्चर्य वाटले. ते ही आता अतीशय मवाळपणे कर्मचा-यांना म्हणाले, “माझ्या संपुर्ण आयुष्यात मी असा प्रकार कधी पाहीला नाही. हा काय चमत्कार आहे?” यावर कचेरीतील सर्व नाेकर साहेबांना सांगु लागले, “साहेब तुम्ही काही म्हणा पण आमच्या महाराजांच्या अंगी माेठी दैवी शक्ती आहे. असे कितीतरी प्रसंग महाराजांच्या जिवनात घडलेले आहेत व आजचा हा तुमच्या डाेळ्यासमाेरचा प्रसंग बघा” मग प्रांतसाहेबही नाेकरांकडुन महाराजांच्या जिवनात घडलेल्या कथा एेकुन मंत्रमुग्ध हाेऊन जातात. साहेब म्हणतात, बर चला आता आपण खजीन्यातली रक्कम माेजुन खात्री करुन घेऊ. खजीन्यातली रक्कम माेजली जाते रक्कम बराेबर एक लाख सत्तावीस हजारच भरते. एक रुपया कमी नाही की जास्त नाही. आता मात्र प्रांतसाहेबांना पश्चाताप हाेताे. रागाच्या भरात आपण ह्या देवमाणसाला काय काय बाेलुन गेलाे याची चीड ही येउ लागते. खजीन्यातील रक्कम व कँशबुक वरील आकडे दाेन तीन वेळेस तपासुन सुध्दा तंताेतंत मिळतात. कचेरीतील कर्मचा-यांच्या मनात आनंदाच्या ऊकळ्या फुटतात. मग खजीनदार आनंदाच्या भरातच बाहेर पळत येताे व गावक-यांना खजीन्याच्या चमत्काराची बातमी सांगताे. ईकडे जाे पाेलीस बंदाेबस्त महाराजांना अटक करण्यासाठी आणलेला हाेता त्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसताे. गावातील लाेक आनंदाच्या भरात रडुच लागतात. देव तारी त्याला काेण मारी. देवासाठी देव धावला असेच जाे ताे म्हणु लागताे. खजीन्याच्या चमत्काराची बातमी आजुबाजुच्या खेड्यांमधे पाेहचल्यानंतर तर लाेकांच्या झुंडीच्या झुंडी बैलगाडीने सटाण्यात दाखल हाेतात. कचेरीबाहेर प्रचंड गर्दी जमते. मग महाराजांना
शिपायामार्फत कचेरीत बाेलवले जाते. यशवंतराव महाराज कचेरीत येतात तेव्हा संपुर्ण गाव तेथे नाचत असते. “देवाचा अवतार आमचा मामलेदार” अशा घाेषणा देऊन लाेक नाचत असतात. महाराज कचेरीत येतात तेव्हा जाे पाेलीस बंदाेबस्त महाराजांना अटक करण्यासाठी मागवलेला असताे ताेच पाेलीस बंदाेबस्त महाराजांना जाेरदार सलामी देऊन मुजरा करु लागतात. महाराज कचेरीत पाेहचतात महाराजांना समाेर बघुन प्रांतसाहेबांना तर काहीच बाेलणे सुचत नाही. प्रांत म्हणतात, “अहाे तुम्ही बसा ना. बर मला सांगा की हा काय चमत्कार आहे?” मग महाराज शांतपणे हसुन सांगतात की, “साहेब दुष्काळपिडीतांचे हाल न बघवल्याने मी काल सगळा खजीना वाटुन दिला. पण आज मात्र सर्व खजीना जसाच्या तसा भरुन आला हे कसे घडले हे मलाही समजत नाही. पण हाे एक मात्र नक्की माझ्या पांडुरंगाने विठ्ठलाने माझ्या स्वामी समर्थानेच ही कृपा केली एवढे मात्र नक्की. यावर आता आपण जाे निर्णय घ्याल ताे मला मान्य राहील.” यावर प्रांत म्हणतात, ” अहाे निर्णय घ्यायला वावच नाही. मी अगदी घडला तसाच्या तसा अहवाल कलेक्टरकडे पाठवताे.परमेश्वरी सत्तेपुढे काेण काय बाेलणार” असे म्हणुन प्रांत महाराजांचे चरण पकडुन माफी मागतात. ईकडे कचेरीबाहेर जनतेचा आनंदाेत्सव चालु असताे. लाेक महाराजांना पालखीत बसवतात. व गावातुन माेठी मिरवणुक काढतात.

(आजही वर्तमान काळात ह्या दिवसाचे स्मरण म्हणुन दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच मार्गशिर्ष महिन्यातील वद्य एकादशी सफला एकादशी ह्या दिवशी भव्य रथ मिरवणुक काढली जाते. व ह्या मिरवणुकीसाठी लाखाे भक्त सटाण्यात दाखल हाेतात.)

खजीन्याच्या ह्या चमत्कारानंतरच महाराजांना जनतेने “देवमामलेदार” ही पदवी दिली व पुढे ह्याच नावाने महाराज संपुर्ण देशात ओळखले जाऊ लागले.

अशा प्रकारे खजीना पुर्णपणे भरुन येताे व हा चमत्कार प्रांतसाहेब स्वत:च्या डाेळ्यांनी बघतात. व जनता महाराजांना “देवमामलेदार” ही पदवी देतात व येथे चाैदावा अध्याय संपताे.
क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button