नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय तेरावा

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जीवचरित्र


वेगवान नाशिक /अतुल सुर्यवंशी 

दि.३०/१२/२०२३

//श्री यशवंत लिलामृत//

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १३ वा

वा वा देवा कैसे सुचवीले तुम्ही/
हा खजीना कुणाचा ज्याचे मामलेदार आम्ही/
ह्या किल्ल्या कुणाच्या ज्याचे राखणदार आम्ही/
देवा हाे देवा सापडला तुमचा ठेवा//

   पुर्वीचा बागलाण तालुका हा आजच्या बागलाणच्या तुलनेत पाच ते सात पटीने माेठा हाेता. त्या काळात आजच्या कळवण तालुक्यातील अभाेणा पर्यंतची तर सध्याच्या गुजरात राज्याची सीमा असलेल्या वाघंबा शेजारील पर्यंतची सर्व गावे ही बागलाणात समाविष्ट हाेती. एकुण १३१२ गावांचा समावेश बागलाण तालुक्यात हाेता. हा एवठा माेठा कारभार सांभाळतांना महाराजांना काही वेळेस खुप कष्ट पडत असत. कारण त्यावेळेस बागलाणात दळणवळणाची साेय नसल्याने अनेकदा महाराजांचा टांगा ईच्छीत स्थळी पाेहचण्यास खुप अडचण येत. मग अशा वेळेस महाराज त्या ठिकाणी घाेड्यावर बसुन जात व जनतेच्या अडचणी साेडवत असत. म्हणुन अल्पावधीतच महाराज बागलाण मधील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले हाेते. देवाची तरी करुणा भाकावी लागते मात्र हा देवमाणुस तर न सांगताच गरीबांच्या गरजा पुर्ण करताे अशी महाराजांची ऊजळ प्रतीमा सर्वांना मार्गदर्शक ठरत हाेती.
   बागलाण विभागाचा कारभार चालवीण्यासाठी परिस्थीती सर्वदृष्टीने अनुकुल नसतांनाही यशवंतराव महाराजांसारख्या वक्तशीर, शिस्तप्रीय, तसेच संवेदनशील अनुभवी मामलेदारांनी त्या परिस्थीतीलाही ताेंड देत कारभार चालु ठेवला हाेता. कारण बागलाणात बदली झाल्यापासुन त्यांनी बागलाणची दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन बागलाण सारख्या शापीत तालुक्याला आदर्श नंदनवन बनवीण्याची शपथ घेतली हाेती. त्यामुळे महाराज आपल्या जिवाचे रान करण्यासही मागेपुढे पाहत नव्हते व त्यांची पत्नी रुक्मिणीमातेचाही त्यांना पुर्णपणे पाठींबा हाेता. १८७० सालातील पावसाळ्याचे दिवस चालु झाले हाेते. सुरुवातीस पाऊस ही वेळेवर चालु झाला हाेता. पण जुलै महीन्यापासुन पावसाने दडी मारली हाेती. संपुर्ण बागलाणातील पिके पाेग्यात असतांनाच पाऊस गायब झाला हाेता. गाेकुळ अष्टमी ते पाेळ्यापर्यंत जर पाऊसच आला नाही तर संपुर्ण हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात हाेती. त्यामुळे महाराजांच्या संवेदनशील मनावर अतिशय विपरीत परीणाम झाला हाेता. बागलाणात दुष्काळ पडण्याचे चिन्ह निर्माण झाल्यापासुन महाराज परीस्थितीवर सतत लक्ष ठेवुन हाेते. त्यामुळे ईकडे अभाेणा ते तीकडे वाघंबा पर्यंतच्या ह्या सर्व गावांचे दैनंदीन रिपाेर्ट न चुकता सादर करण्याचे आदेश महाराजांनी आपल्या कनिष्ठांना दिले हाेते. सप्टेंबर महीना ऊजाडला तरी पावसाचा अंदाज दिसत नव्हता. खरीप पिके पुर्णपणे नष्ट झाली. मामलेदार साहेबांनी परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळाविषयी वरीष्ठांशी सतत संपर्क ठेवणे सुरु केले. बागलाणात दुष्काळ जाहीर करुन शासकीय मदतीसाठी महाराजांनी वेळाेवेळी नाशिक कलेक्टरकडे पाठपुरावा करण्यास सुरवात केली. मात्र नाशिकचे कलेक्टर मि.एलियट साहेबांकडुन प्रतीसाद मिळत नव्हता. ईकडे दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढतच हाेती. पश्चिमेकडील डांग भागातील आदिवासी पट्टयात तर लाेक अन्न अन्न करत तरफडत असल्याचे रिपाेर्ट येत हाेते. जंगलातील कंदमुळे व रानभाज्यांवर जनतेचा ऊदरनिर्वाह चालु हाेता पण आता ताे पर्यायही संपत आला हाेता. काही भागात तर श्रीमंत,सावकार व जमीनदारांकडे कर्ज मिळण्यासाठी लाेंढेच्या लाेंढे ऊपाशी तापाशीपणे रांगा लावुन बसत. जनतेच्या ऊपासमारी विषयी गावागावांतुन येणा-या रिपाेर्ट वरुन महाराज व रुक्मिणी मातेचे मन व्याकुळ हाेत हाेते. काही ठिकाणी तर चाराच शिल्लक नसल्याने अनेक गुरे-ढाेरे मृत पावल्याच्या घटना ही घडल्या हाेत्या. मनुष्य तरी बुध्दी चालवुन एक एक दिवस पास करीत हाेता पण बिचा-या मुक्या जनावरांचा जीव जाण्यास सुरवात झाली हाेती. ईकडे महाराज व रुक्मिणीमातेची रात्रीची झाेप ऊडाली. सरकारकडुन कुठलीही मदत मिळत तर नव्हतीच पण ऊलट अशा परिस्थीतीतही इंग्रजांनी महसुल (लगान) देखील माफ केलेला नव्हता. आसमंत सटाणा हळहळला. लाेकांचा राेजगार बंद पडला. मेलेल्या जनावरांमधे किडे पडु लागले पण ते आवरण्याचे बळही मनुष्यात नसल्याने सटाण्यात व बागलाण परीसरात राेगराई निर्माण झाली. महाराज प्रचंड हादरले आता काय करावे? असा प्रश्न महाराजांना पडु लागला. महाराजांच्या घरापुढे गरजुंचे लाेंढेच्या लाेंढे येऊ लागले. महाराजांनी सावकाराकडुन कर्ज काढले पण ते पैसे तर तेव्हाच संपले. मग महाराजांनी आपल्या घरातील सर्व चीज वस्तुच काय पण रुक्मिणीमातेचे मंगळसुत्र सुध्दा विकुन टाकले व ते पैसे जनतेमधे वाटुन दिले. पण परिस्थीती जैसै थे. दुष्काळग्रस्तांसाठी महाराजांना फार माेठ्या रकमेची गरज पडु लागली पण सरकार कडुन मदत मिळत नव्हती. काही श्रीमंत, सावकारांनी महाराजांच्या कार्यात मदत ही केली पण दुष्काळ ईतका भयानक हाेता की खुप माेठ्या रकमेची गरज निर्माण झाली. दिवसेंदिवस महाराजांच्या घरापुढे गरजुंची संख्या वाढतच हाेती. महाराज प्रत्येकाला थाेडेफार अन्न पुरवुन कसेबसे वेळ निभावुन नेत हाेते. परीस्थितीपुढे हतबल झाले हाेते. अशातच एके दिवशी मुल्हेर भागात दाेन भुकबळी गेल्याचा रिपाेर्ट आला. आता मात्र महाराजांच्या हृदयाचा बांध फुटला. महाराज ढसाढसा ओक्साबोक्सी रडु लागले. देवाला प्रार्थना करु लागले, “हे देवा काय ह्या गरीबांचे हाल. हे बिचारे आज आपल्याच गावात वनवासी झाले. देवा आता तुच काही तरी ऊपाय सुचव देवा की मी ह्या जनतेची साेय करु शकेल. देवा मी जन्मभर काय केले तर फक्त ह्या इंग्रजांची ना्ेकरीच केली. तीही मामलेदाराची. नाेकरी करुन तरी काय केले? ह्या गरीबांकडुनच महसुल गाेळा केला आणि खजीन्यात भरला. नाेकरी इंग्रजांची केली त्यांना काय कळणार भारतीयांचा धर्म. पण मी तर भारतीयच ना. मला नाही बघवत आता ह्या गरीबांचे दु:ख. इंग्रजांना काय घेणे देणे ह्या गरीबांशी. काहीही झाले तरी त्यांना फक्त त्यांचा हा खजीना भरला गेला पाहीजे एवढेच कळते मग ताे खजीना भरण्यासाठी ह्या गरीबांना कितीही कष्ट पडले तरी त्यांना काही घेणे देणे नाही. अशा ह्या इंग्रजांची नाेकरी करुन मी तरी काय केले? गरीबांकडुनच महसुल गाेळा करुन ह्या इंग्रजांच्या खजीन्यात भरला. आणि नावाला ह्या खजीन्याचा ताबेदार झालाे.” अशी देवाला प्रार्थना चालु असतांनाच महाराजांच्या एकदमच लक्षात येते, “अरे……..! हाे देवा बराेबर सुचवीले तु. माझ्या कडे हा सरकारी खजीना आहे आणि ह्या खजीन्याचा याेग्य ताे ऊपयाेग आता मी करणार.” बस्स आणि बस्स आता महाराजांचे सर्व विचार संपले हाेते. दु:खाला कलाटणी मिळाली हाेती. सर्व प्रकारचा सखाेलपणे विचार करुन महाराजांनी अंतीम निर्णय घेतला ताे म्हणजे सटाण्याचा सरकारी खजीना दुष्काळग्रस्त गाेरगरीब जनतेला वाटण्याचा. मग महाराजांनी सखाेलपणे विचार केला, “समजा मी खजीना वाटलाच तर मला अटक हाेईल. माझा मान जाईल, प्रतिष्ठा जाईल, नाेकरी जाईल. फार फार तर हे इंग्रज मला फाशी देतील. माझा एकट्याचा जीव गेला तर चालेल पण ही बाकीची जनता तर वाचेल. सरकारी खजीना वाटणे हे बेकायदेशीर असले तरी आज ही आणिबाणी ची वेळ आहे. आणि मी तरी कुणाशी ईनामदारी करु? ज्या इंग्रजांनी धुर्तपणे हा भारत देश ताब्यात घेतला त्यांच्याशी की ह्या माझ्या देशबांधवांशी? हा खजीना तरी कुणाचा? इंग्रजांचा की भारतीय जनतेचा? ह्या गरीबांनी ऊन्हा तान्हात घाम गाळुन कष्ट करायचे आणि इंग्रजांनी ताे खजीना ऊधळायचा. हे किती दिवस चालायचे? नाही आता बस झाले. मी आज ह्या खजीन्याचा सदुपयाेग करणार आणि बागलाण मधील जनतेचे प्राण वाचवीणार. धर्मग्रंथात पण लिहीलेले आहे की जर कुणाचा प्राण संकटात सापडला असेल तर त्याचे रक्षण करावे हाच खरा धर्म.” असा विचार करुन महाराजांनी खजीना वाटण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. नाेव्हेंबर महीन्यातील शनिवारचा ताे दिवस हाेता महाराज कचेरीत आले व सरकारी तिजाेरी ऊघडली व ताे खजीना गाेरगरीबांना वाटण्यास सुरवात केली. महाराज भान हरपुन पैसा वाटत हाेते. समाेर जाे दिसेल त्याला महाराजांनी पैसा वाटण्याचा धडाकाच सुरु केला. ईकडे संपुर्ण बागलाणात चर्चा पसरली. कचेरीत गाेरगरीबांची झुंबड ऊडाली. महाराज येणा-या प्रत्येकाला हातात येतील तेवढे पैसे देत हाेते. सटाण्यात तर हाहाकार माजला. आज मामलेदारांना झाले तरी काय? देवमाणसावर काय ही वेळ आली? सगळा खजीना लाेकांना वाटीत आहेत. इंग्रज किती वाईट शिक्षा करतील महाराजांना. नकाे रे देवा ताे विचारही करवत नाही. असेच जाे ताे म्हणु लागला. पण महाराजांना अडविण्याची कुणालाही हिम्मत झाली नाही. सकाळपासुन खजीना वाटण्यास सुरुवात केली ती संध्याकाळ पर्यंत. अंधार पडला आणि तीजोरीतील खजीना ही संपला. त्या दिवशी महाराजांनी १,२७,००० रुपये (त्या काळातले एक लाख सत्तावीस हजार म्हणजे आजच्या काळातले अब्जावधी रुपये.) बागलाण च्या जनतेत वाटुन दिले. महाराज शांतपणाने घरी आले. रुक्मिणीमाता बसलेलीच हाेती. घरी येताच महाराजांनी स्वत:च झालेला सर्व प्रकार नाशिकच्या कलेक्टरला पत्राद्वारे कळवुन टाकला. व पत्रात त्यांनी नमुद केले की सरकारी मदतीची वाट पाहत बसलाे असताे तर न जाणे अजुन किती भुकबळी गेले असते त्यामुळे मी स्वत:च निर्णय घेऊन सटाण्याचा सरकारी खजीना गाेरगरीबांना वाटुन दिला. यावर आता आपण जाे निर्णय घ्याल व जी शिक्षा कराल ती मला मान्य राहील असा मजकुर लिहुन ते पत्र ताबडताेब कलेक्टरला देऊन येण्यास शिपायास सांगीतले. ईकडे संपुर्ण सटाण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत हाेती. महाराजांना तर आता अटक व काळ्यापाण्याची शिक्षा तर अटळ हाेती. आणि जर सरकारने हा गुन्हा जर गंभीर गुन्हा घाेषीत केला तर मग फाशी देखील हाेऊ शकते ह्या चिंतेनेच सटाण्यातील जनता व्याकुळ झाली हाेती. आज सर्व सटाणेकर एकत्र आले हाेते. ऊद्या आपल्या महाराजांवर कुठलीही वेळ येऊ शकते तेव्हा कलेक्टर महाराजांना अटक
करण्यास आले तर आपण सर्वांनी त्यांना विनंती करायची असे सर्वांचे एकमत झाले हाेते. ऊद्याचा दिवसच ऊगवु नये असेच प्रत्येकाला वाटत हाेते.
   अशा प्रकारे दुष्काळाची तिव्रता लक्षात घेऊन महाराज सटाण्याचा सरकारी खजीना गाेरगरीबांना वाटुन देतात व झालेला प्रकार स्वत:च वरीष्ठांना कळवुन टाकतात. आणि येथे तेरावा अध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो.९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button