नाशिक ग्रामीण

sarpanch गावाचा विकास सोडून सरपंच उपसरपंच मागु लागले लाच- मग सापडले

Leaving the development of the village, the sarpanch started seeking bribes - then the sarpanch was caught


वेगवान नाशिक 

चांदवड – 29 डिसेंबर 23  सध्या लाच घेणं हे काही नवीन नाही, यामध्ये आता राजकारणी माघे राहिलेले नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत लाच घेण्याचे प्रमाण वाढत आहे, म्हणूनच काय की चांदवड तालुक्यातल्या  सरपंच आणि उपसरपंचानी टाकीचे बिल मंजूर होण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयाची लाच मागितली आणि तडजोडीअंती तीस हजारावरती हे प्रकरण मिटलं,

मात्र याची भनक ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लागली आणि त्यांनी रंगेहात सापळा रचून सरपंच आणि उपसरपंच यांना लाच घेतल्याप्रकरणी पकडले

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

हे लाचखोर सरंपच व उपसरंपच आहे चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील, गावाचा विकास म्हणून या विकास पुरुषांना गावातील लोकांनी मतदान केले, मात्र संरपच व उपरसंपच मात्र कश्या पध्दतीने पैसे ढापता येतील यावर त्यांचा डोळा होता. मग त्यांनी मिळेल त्या मार्गाने लाच मागण्यासाठी प्रयत्न केले.

याबाबत सविस्त सांगायचे झाले तर हे कसे लक्षात आले, यातील तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय 55 वर्ष धंदा शेती  2) प्रकाश चंद्रभान गांगुर्डे  (वय 45 वर्ष,धंदा शेती ) उपसरपंच यांनी  50 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र तडजोडी अंती 30 हजाराची लाच या दोघांनी घेतली.

सरपंच भास्कर गांगुर्डे  व  उपसरपंच प्रकाश गांगुर्डे यांनी दोघा मळून 30 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना रंगेहात पकडण्यात आलायं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button