नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय बारावा

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जीवनचरीत्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी

दि.29/12/2023

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १२ वा

सदगुरु समर्थ यशवंत देवा /
आज आमुचा करतील सर्वच हेवा /
जे भाग्यात ही नसे स्वर्गाच्या देवा /
त्याचा तु केला वर्षाव //

   आरम नदीच्या तीरावर वसलेले सटाणा हे छाेटस गाव. सन १८६९ च्या सुरुवातीपासुनच सटाण्याचे चैतन्य वाढु लागले हाेते. याचे कारण म्हणजे मामलेदार रुपातील देव सटाण्यात वास्तव्य करत हाेते. त्यामुळे गावात त्यांच्या दर्शनासाठी राेजच गर्दी हाेत हाेती. हजाराे लाेक आरम नदीलाच गंगा – गाेदावरी सारखे पवीत्र मानु लागल्याने आरम चे पात्र फुलुन जात.
     “आरम तीरी सटाणा नगरी नांदे देव पंढरी यशवंत हाे. ऊभा धर्म पिठवरती भक्तांची चिंता हरी. जन कल्याण करी यशवंत हाे.” गाई चारणा-या गाेपालांच्या या सुरेल व मधुर भजनाने सटाण्यात येणा-या प्रवाशांना आपण जणु पंढरपुरलाच आल्यासारखे वाटे. सटाण्यातील सुवासीनी पहाटे लवकर उठुन महाराजांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर सडा रांगाेळ्या घालीत असत. लाेक फुले ऊधळीत असत. एकादशी व पाैर्णिमा ह्या दिवशी तर आरम नदीचे पात्र गर्दीने फुलुन जात असे. असा महाराजांच्या दैवी गुणाचा सुगंध दुरदुर पर्यंत पसरतच हाेता.एकदा एका कापसाचे व्यापारी गाेवींद हरी वाळवेकर यांचे पत्र महाराजांना आले पण त्या वेळेस महाराज काही कामकाजानिमीत्त बाहेरगावी गेलेले हाेते. त्यामुळे ते पत्र नक्की कुणाचे असावे? त्यात काय लिहीलेले असावे? असा प्रश्न तेथील ऊपस्थित भक्तांना पडला. त्यामुळे सर्व भक्तांच्या वतीने महाराजांचे सहकारी श्री केशव रिसबुड यांनी पत्र ऊघडुन माेठ्याने वाचण्यास सुरुवात केली. पत्राचा मजकुर थाेडक्यात असा हाेता- “श्री यशवंतराव महाराज यांना गाेवींदआप्पा वाळवेकर यांचा साष्टांग नमस्कार. महाराज आपल्या भक्तीचा सतत धावा आमच्या मनात असताेच. आमचा कापसाचा व्यापार आहे हे तर आपणास ठाऊकच आहे. ब-याच दिवसांपासुन व्यापार अगदी तेजीत हाेता. मात्र सध्या कापसाच्या भावात जबरदस्त घसरण व बाजारातही मंदी आल्याने माझे फार नुकसान झाले. मी भरपुर भांडवल अडकवुन गाेदामच्या गाेदाम खचाखच भरले. मात्र काही दिवसातच बाजार भावात निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाली. अनेक दिवस असेच निघुन गेले. भावात सतत घसरण हाेतच गेली. माझी रात्रीची झाेप ऊडाली. भरपुर प्रमाणात ऊधारी झाली. अनेक लाेक माझ्या विराेधात गेले.माझी अवस्था दयनीय झाली. भविष्याची चिंता वाढल्याने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र लगेच मला तुमची आठवण झाली व मी लगेच मनाेमन तुम्हालाच नवस केला की, तुम्ही काही दिवसांपुर्वी दानधर्मासाठी माझ्याकडुन जे पाच हजार रुपये कर्ज घेतले आहे ती रक्कम मी तुमच्याच चरणी अर्पण करेल व कापसाला भाव मिळाला तर नफ्यातील काही रक्कम अन्नदानासाठी खर्च करेल. असा नवस बाेलुन मी रात्री झाेपुन गेलाे आणि काय आश्चर्य दुस-याच दिवशी कापसाचा भाव गगनाला भिडला. व माझ्या संपुर्ण आयुष्यात झाला नसेल ईतका नफा मला झाला. व लगेच भारावलेल्या स्थितीत हे पत्र तुम्हाला लिहीण्यास बसलाे. महाराज अशीच कृपा सदैव आमच्यावर राहाे हीच विनंती.” केशवपंतांनी पत्र वाचवुन संपवीले तेव्हा सर्वांचे डाेळे भरुन आले हाेते. सर्वांनी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. काही वेळातच महाराज आपले कामकाज आटपुन घरी आले तेव्हा पंतांनी घडलेला सर्व प्रकार महाराजांना सांगीतला. यावर महाराज अगदी शांतपणे स्मितहास्य करुन “नारायणाची लाज नारायणानेच राखली. ऊँ नमाे नारायण” असे म्हणुन निघुन गेले. पुढे काही दिवसांनंतर सटाण्याचे प्रतिष्ठीत ब्राम्हण श्री गाेवींदशास्त्री ऊपासनी हे आपला मुलगा काशिनाथ यासह महाराजांच्या दर्शनास आले. ऊपासनी घराणे हे वेदशास्त्र संपन्न असल्याने सटाण्यात प्रसीध्द हाेते. गाेवींदशास्त्रींनी आपल्या येण्याचा ऊद्देश सांगीतला, “महाराज हा आमचा काशीनाथ आता आठ वर्षांचा पुर्ण हाेईल. तेव्हा आता त्याची मुंज करावी असा विचार करताेय व ह्या मंगल प्रसंगी आपले शुभाशिर्वाद याला मिळावे म्हणजे याच्या जिवनाचे साेने हाेईल अशी आमची श्रध्दा आहे.” यावर महाराज म्हणाले, “मी अवश्य येईन.माेठा भाग्यवान आहे हा बाळ.” महाराजांनी लगेच आत जाऊन थाेडे कुंकु व भस्म आणले व काशीनाथ च्या कपाळावर एका खाली एक असे कुंकवाचे तीन ठिपके लावले व त्याखाली भुवयांच्या वर भस्माचा पट्टा आेढला व म्हणाले, “बघा किती सुंदर दिसताे हा बाळ. हा साैभाग्य आणि वैराग्य यांनी युक्त हाेईल बघा.” शास्त्रीबुवांना जरा आचंभाच वाटला. ते म्हणाले, “महाराज कुंकु म्हणजे
भाग्य व भस्म म्हणजे वैराग्य हे तर ठिक आहे पण कुंकवाचे एका एेवजी तीन तिलक म्हणजे……..! याचा अर्थ काय समजायचा महाराज?” यावर महाराज फक्त हसले व म्हणाले, “चला जाऊद्या. तुम्ही लवकर मुहुर्त काढुन मला निराेप पाठवा म्हणजे त्यावेळी मी तुमच्या कडे येईल.” लवकरच काशीनाथचे ऊपनयन झाले. काशीनाथने महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी काशीनाथच्या डाेक्यावर हात ठेवुन आशिर्वाद दिला, “आयुष्यवंत हाे काशीनाथ. तु ऊपासनी घराण्याचे नाव सार्थ करशील. नारायणाच्या कृपेने तुझ्याकडुन जगदाेध्दाराचे काम हाेईल व तु ह्या विश्वात तुझ्या कार्याने प्रसिध्द हाेशील. लाेकाेध्दाराचे काम सुरु केल्यावर तु आमच्या भेटीस ह्या सटाणा नगरीत येशील पण ताे पर्यंत आम्ही ह्या आरम नदीच्या खांद्यावर शांतपणे बसलेले असु. ऊँ नमाे नारायण.”( पुढे खराेखरच तसेच घडले. बाळ काशीनाथ हे “साकाेरी” चे उपासनी महाराज म्हणुन प्रसीध्द झाले. अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डी जवळच साकाेरी ह्या गावी त्यांनी मठ स्थापन करुन अनेक लाेककल्याणकारी कामे केली. “कुमारी पुजनाचा” नवीन सांप्रदाय स्थापणारा प्रथम महात्मा म्हणुन ते नावारुपास आले. पुढे काही दिवसानंतर ते सटाणा ह्या गावी यशवंतराव महाराजांच्या भेटीस आले पण ताे पर्यंत महाराज कालवश झालेले हाेते व आरम नदीच्या काठावर महाराजांचे मंदीर ऊभे हाेते. त्यावेळेस महाराजांच्या प्रतीमेसमाेर ऊभे राहुन ऊपासनी महाराजांच्या डाेळ्यात पाणी आले व त्यांच्या मनात विचार आला की किती सत्य हाेता ताे महाराजांनी मला दिलेला आशिर्वाद. कारण महाराजांनी त्यांना आशिर्वाद देतांना त्यांच्या कपाळावर तीन कुंकवाचे व एक भस्माचा पट्टा का ओढला असेल याचा ऊलगडा आज त्यांना झाला हाेता. याचे कारण म्हणजे ऊपासनी महाराजांचे तीन वेळेस लग्न झाले ते साैभाग्य म्हणजे ते कुंकवाचे तीन तिलक व भस्माचा पट्टा म्हणजे वैराग्य. याचाच अर्थ तीन लग्न हाेऊनही शेवटी ऊपासनी महाराजांनी वैराग्य प्राप्त केले हाेते.)

    अशा प्रकारे अनेक चमत्कार ह्या सटाणा नगरीत महाराजांच्या जिवनात पदाेपदी घडत असतात व सटाणा वासीयांना महाराजांच्या दैवीशक्तीचा पावलाेपावली साक्षात्कार घडताे व येथे बारावा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन)ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button