नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय अकरावा

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जीवनचरीत्र 


वेगवान नाशिक/ अतुल सुर्यवंशी

दि.28/12/2023

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय ११ वा

सन अठराशे एकाेणसत्तर/ आनंदीले हाेते सटाणेकर/
बदलुन सिंदखेड मामलेदार/यशवंत देव आले सटाण्याला//
आरम नदी काठी/ सटाणा गाव शाेभती/
यशवंत देवामुळे / सटाणा पावन झाले अती//

   खानदेशात यशवंतराव महाराजांचे भक्तमंडळ दिवसेंदिवस वाढतच हाेते. सिंदखेडा येथे नाेकरी करीत असतांना त्यांच्या जिवनात चमत्काराचे अनेक प्रसंग घडले त्यामुळे लाेक त्यांना देव मानु लागले. मामलेदार पदावर काम करीत असतांना देखील आपल्या धर्माचा, संस्कृतीचा प्रसार करण्यात ते यशस्वी ठरले हाेते. त्यांचा स्वच्छ व लाेकाभीमुख कारभार ब्रिटीश प्रशासनाला अडचणीचा ठरत हाेता. हीच गाेष्ट ईंग्रजांना खटकत हाेती. मात्र ते ऊघडपणे बाेलुन दाखवीत नव्हते. कारण धर्म व संस्कृतीच्या नावाने भारतीयांना न दुखवीता आपला कार्यभाग त्यांना साधायचा हाेता. महाराज सिंदखेडा येथे नाेकरी करीत असले तरी अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या मंदीरात दर्शनानिमीत्त त्यांचे कायम येणे जाणे असायचे. अशातच सन १८५७ चे स्वातंत्र्य याेध्दे तात्या टाेपे व काजरसिंग नाईक हे खानदेशात घुसण्याच्या बेतात आहेत व ते यशवंतराव महाराजांना भेटुन त्यांचा आशिर्वाद घेणार आहेत अशी बातमी ईंग्रज सरकारला समजली हाेती. ही बातमी समजल्यानंतर तर ईंग्रज सरकारने संपुर्ण खानदेशात आपले गुप्तहेर पाठवीले हाेते व तात्या टाेपे हे यशवंत मामलेदारांना केव्हाही व काेणत्याही ठिकाणी भेटु शकतात त्यामुळे सर्वांनी सतर्क राहुन सापळा रचावा व तात्या टाेपेंना पकडुन आणुन तुरुंगात टाकावे अशा सुचना करण्यात आल्या हाेत्या. मात्र अशा परिस्थीतीतही तात्या टाेपे हे वेश बदलुन अंमळनेर ह्या गावी आले व त्यांनी सखाराम महाराजांच्या मंदीरात यशवंत मामलेदारांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला अशी वार्ता सर्वत्र पसरली हाेती. त्यामुळे यशवंतराव महाराज संशयाच्या भाेव-यात सापडले. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन ईंग्रज सरकारने यशवंतराव महाराजांना लक्ष करण्याचे ठरवीले व तुम्ही सरकारचे एक जबाबदार अधिकारी असुन देखील ब्रिटीश प्रशासनाच्या विराेधात ज्या व्यक्तींनी बंड पुकारला अशा तात्या टाेपेंसारख्या व्यक्तींना तुम्ही गुप्तपणे सहाय्य करतात असा आराेप लावुन राताेरात महाराजांची बदली सिंदखेड्याहुन धुळे येथे करण्याचे ठरवीले. परंतु लगेचच ईंग्रज सरकारच्या असे लक्षात आले की, धुळे म्हणजे खानदेशातील दळणवळण व ईतर साेयीसुविधांयुक्त सर्वात माेठी बाजारपेठ आहे. व संपुर्ण खानदेशात यशवंत मामलेदारांचे भक्तमंडळ माेठ्या प्रमाणात वाढलेले आहे. खानदेशातील जवळपास सर्वच लाेक यशवंत मामलेदारांना त्यांच्या कार्यामुळे व आदर्श जिवनशैली मुळे देवासमान मानतात. त्यामुळे त्यांची जर धुळ्याला बदली केली तर ऊलट ते त्यांच्या संस्कृतीचा प्रसार करण्यात लवकरच यशस्वी हाेतील. अशी भिती ईंग्रज सरकारला वाटु लागली. त्यामुळे यशवंत मामलेदारांची बदली अशा ठिकाणी करण्यात यावी की ज्या ठिकाणी दळणवळणाची साेय नसावी. रस्ते व ईतर साेयीसुविधा नसाव्यात. अतीशय दुर्गम अशा भागात त्यांची बदली करण्यात यावी असे ब्रिटीशांचे एकमत झाले व वरीष्ठ पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या. ईंग्रज सरकारने त्या काळातील अतिशय दुर्गम अशा “सटाणा” ह्या गावी यशवंतराव महाराजांची बदली करण्याचे ठरवीले. बागलाण त्याकाळी अतिशय दुर्गम आदिवासी बाहुलभाग म्हणुन प्रचलीत हाेते. त्या काळात सटाणा येथे कचेरी देखील नव्हती. मात्र ईंग्रज सरकारने काही दिवसांतच सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन केली व शनिवार दिनांक ८ मे १८६९ राेजी यशवंतराव महाराज हे सटाण्याचे पहीले मामलेदार ( तहसीलदार) म्हणुन रुजु झाले.
    नाशिक जिल्ह्यातील “सटाणा” हे छाेटेसे गाव. त्या काळात ह्या गावाचे नाव देखील कुणालाही अधिक परीचीत नव्हते. आदिवासी बाहुलभाग असल्याने बागलाणात काेणत्या ना काेणत्या कारणाने सतत अशांतता हाेती. डाेंगरद-या, रस्ते नाही, दळणवळणाची साेय नसल्याने ईतर भागातील लाेकांशी वर्षानुवर्षे संपर्क हाेत नसे. धरण किंवा ईतर पाण्याची साेय नसल्याने संपुर्ण शेतजमिनी ओसाड हाेत्या. लाेकांना काेणताच राेजगार नव्हता. त्या काळात बागलाण परीसरातील प्रख्यात दराेडेखाेर तुळ्या नाईक च्या टाेळीसह ईतर दराेडेखाेरांच्या एकुण ८० टाेळ्या कार्यरत हाेत्या. त्यामुळे श्रीमंत जमीनदार, सावकार यांच्या घरांवर दराेडेखाेरांचे नेहमीच हल्ले हाेत असे. खुन, घातपात अशा घटना सतत घडत. बागलाणच्या भागात वाघांची संख्या देखील लक्षनीय हाेती. कायमच हा भाग डिस्टर्ब असायचा. त्यामुळेच ईंग्रज सरकारने मुद्दामच बागलाण सारख्या आदिवासी मुलुखात यशवंतराव महाराजांची बदली केली हाेती. कारण ईंग्रजांना पुर्णपणे असा विश्वास हाेता की, बागलाणच्या ह्या आदिवासी मुलखात यशवंत मामलेदारांचे भजन, प्रवचन काेण ऐकेल? दराेडेखाेरांच्या लुटारु टाेळ्यांकडुन सततच्या अशांत भागात स्थिरस्थावरता आणण्यात एकदा का हे यशवंत मामलेदार अडकले की त्यांचे धार्मिक कार्य आपाेआपच थांबेल ह्या हेतुनेच यशवंतराव महाराजांची बदली सटाण्यात करण्यात आली हाेती. मात्र अशा परीस्थितीतही यशवंतराव महाराजांनी आपल्या स्वच्छ व लाेकाभीमुख पारदर्शी कारभाराच्या जाेरावर बागलाण परीसरातील जनतेच्या मनावर आदरयुक्त व्यक्तीमत्वाची छाप निर्माण केली. आपले मामलेदार हे अतीशय सात्वीक प्रवृत्तीचे व दानशुर पणातही ऊदार मनाचे आहेत अशी वार्ता संपुर्ण बागलाणात पसरली हाेती. ईतर भागातील मामलेदारांच्या तुलनेत बागलाणचे मामलेदार हे सामान्य जनतेला अगदी सहजपणे भेटुन त्यांच्या समस्या साेडवीत असत.तालुक्याच्या विकासासाठी मामलेदार साहेब सर्व जनतेला बराेबर घेऊनच कामकाजाची दिशा ठरवत असत. त्यामुळे सामान्य जनतेला ही त्यांच्या विषयी जिव्हाळा निर्माण हाेऊ लागला हाेता. सुरुवातीच्या काळात महाराजांनी सर्वप्रथम बागलाण परीसरातील सर्व लाेकांची एक बैठक घेतली व लाेकांच्या अडीअडचणी समजुन घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला. महाराजांनी सर्वप्रथम बागलाणातील ओसाड पडलेल्या शेतीच्या विकासासाठी धरण निर्माण केले. त्यामुळे बागलाणातील लाखाे हेक्टर शेती ओलीताखाली आली व लागवडी याेग्य झाली. तसेच ठिकठिकाणी बंधारे, पाट तर पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विहीरी खाेदुन प्रथमत: पाण्याची साेय निर्माण केली. त्यानंतर जवळपास सर्वच रस्ते पायरस्त्यांनी जाेडले. मुल्हेर, वाघंबा, अंतापुर, किकवारी, डांगसौंदाणे ह्या डांगी पट्टयात डाेंगर द-यांना घाट फाेडुन रस्ते निर्माण केले. ही सर्व कामे त्यांनी सरकारकडुन मंजुर करुन घेतली व तालुक्यातीलच बेराेजगार लाेकांना ही कामे मिळवुन दिली. त्यामुळे अनेक बेराेजगार लाेकांना राेजगार देखील उपलब्ध झाला व तालुक्याच्या दृष्टीने
दळणवळणाची माेठी साेय झाली. त्यानंतर पडीक जमीनीवर जंगल निर्माण केले. तसेच सन १८७० मधे ठेंगाेडा येथे काेर्ट स्थापन करण्यात आले. सर्वांना याेग्य ताे न्याय मिळु लागला. पारदर्शी व निपक्षपातीपणामुळे परिसरातील जनतेच्या मनावर महाराजांच्या व्यक्तीमत्वाचा आदरयुक्त दरारा हाेता. त्यामुळे आदिवासी लाेक तसेच दराेडेखाेर देखील महाराजांच्या कार्यात मदत करु लागले कारण त्यांना देखील कळुन चुकले हाेते की महाराज हे सर्वांचे कल्याण चिंतणारे थाेर महापुरुष आहेत.याचाच परीपाक म्हणजे हळुहळु बागलाण ला ऊर्जीतावस्था प्राप्त हाेऊ लागली.
  ह्याच बागलाणच्या मातीत महाराजांच्या जिवनात चमत्काराचे सर्वाधिक प्रसंग घडले. त्यातला हा एक प्रसंग –
महाराजांना सटाण्यात रुजु हाेऊन काही दिवस झाले हाेते. महाराज ज्या ठिकाणी बदलुन जात त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी हाेतच असत. महाराजांची किर्ती सर्वत्र पसरली असल्याने महाराजांचे भक्त महाराजांपर्यंत कसेही पाेहचत. सटाण्यात बदली झाल्यानंतर कधी नव्हे एवढी गर्दी सटाणेकरांना राेजच बघावयास मिळत. सटाणेकरांना माेठे कुतुहल वाटे. साधु, बैरागी, गाेसावी, फकीर, जाेगी, संन्याशी, गारुडी, शीख व इतर अशा सर्वच जाती धर्मातील लाेक महाराजांना देव मानत त्यामुळे दिवसेंदिवस सटाण्यात
गर्दीचा महापुर वाढतच हाेता. याचे सटाणेकरांना माेठे नवल वाटायचे. नवसाला पावणारा चालता बाेलता देव अशी ख्याती महाराजांची झाल्याने सटाण्यात अनेक लाेक राेज नवस करायला व नवस पुर्ण झाल्यावर ताे फेडायला ही येत. कुणी नाेकरी तर कुणी मुलबाळ तर कुणी व्यापारात प्रगती व्हावी यासाठी नवस करत. असाच एकाबाईने एक विचीत्रच नवस केला. आदिवासी समाजातील त्या बाईला सासरी माेठा जाच हाेता. तीला एकामागुन एक अशा एकुण सात मुलीच झाल्या. मुलगा हाेत नव्हता म्हणुन सासरची मंडळी तीचा छळ करु लागली. कुणीतरी एकाने तीच्या सासुला विचीत्रच ऊपाय सांगीतला की राेज हीच्या डाेक्यावर मुसळीने मार देत जा म्हणजे हीला हमखास मुलगा हाेईल. मग सासु ही राेज तीच्या डाेक्यावर मुसळीने मार देऊ लागली. त्या बाईच्या डाेक्याला माेठा त्रास हाेऊ लागला. मग तीने संतापाच्या भरातच यशवंतराव महाराजांना नवस केला की ह्या वेळेस मला मुलगा हाेऊ दे मी तुझ्या डाेक्यावर नारळ फाेडेल. लवकरच तीचे दिवस भरले व तीला मुलगा झाला. काही दिवसातच मग ती बाई सटाण्याला नवस फेडण्यास मुलासह आली. महाराज घरीच बसलेले हाेते. तीने मग सर्व हकीकत महाराजांना सांगीतली व रडु लागली. कारण तीला ही पश्चाताप हाेत हाेता की संतापाच्या भरात आपण त्या वेळेस नवस बाेललाे खर पण आता ताे नवस फेडायचा कसा. यावर महाराज हसुन म्हणाले “ताई तुमचा नवस पुर्ण झालाय ना मग आता तुम्ही माझ्या डाेक्याचा विचार करु नका व निश्चींतपणे आपला नवस फेडा.”सटाण्यातील सर्व लाेक हा प्रकार आश्चर्यचकीत हाेऊन बघु लागले. ती बाई महाराजांकडे गेली व तीने महाराजांच्या डाेक्यावर नारळ धरले व यशवंतराव महाराज की जय म्हटले आणि चमत्कार घडला नारळ वरच्या वर फुटले व नारळाचा प्रसाद महाराजांच्या चरणाशी पडला. हा सटाण्यात घडलेला सर्वात पहीला चमत्कार हाेता. एकच गजर झाला यशवंतराव महाराज की जय. अशा प्रकारे आपल्यावर बिकट प्रसंग आल्यावर लाेक देवाला काय काय नवस करतात आणि देवही ताे नवस कशाप्रकारे पुर्ण करुन घेताे याचा प्रत्यय सटाणा वासीयांना येताे आणि येथे अकरावा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button