नाशिकचे राजकारण

मनोज जरांगेच्या मुंबई आंदोलनाला या राज्यातून पाठींबा

Manoj Jarange


वेगवान नाशिक

पानिपत, 26 डिसेंबर 23 – Manoj Jarange  मराठा समाजाचा आंदोलन दिवसेंदिवस वेगळ्या वळणावरती चाललेला आहे म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईला उपोषणाचा इशारा दिल्यामुळे आता हे आंदोलन एका वेगळ्या वळणावर जात आहे याचमुळे आता मनोज जरांगे यांना हरियाणा मधून पाठिंबा मिळाल्यामुळे हे आंदोलन आता महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवरती जात असल्याचं बोललं जातंय

जरांगे यांच्या आंदोलनाची देशभरात त्याची दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपणास मनोज जरांगे पाटील कोण आहेत? असा प्रश्न विचारला होता, असे म्हटले होते.  २० जानेवारीपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

रोड मराठा समाजाचा इशारा

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला देशव्यापी आंदोलन बनवू, असा इशारा हरियाणातील रोड मराठा समाजाने दिला आहे. हरियाणा मधील पानिपतच्या रोड मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी आम्हाला आशा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button