Nashik Business

Pedha अरं…तुमचं एवढं वय झालं…तुम्ही आज पर्यंत गुळाचा पेढा खाल्ला का!

Nashik News Gule Pedha


वेगवान नाशिक / WEGWAN NASHIK

 ( अमोल मसरुप )

 चांदवड ता, 26  डिसेंबर 23 Nashik News Gule Pedha  पेढ्याचे नाव काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं… कारण पेढ्याची चव सर्वात श्रेष्ठ चव मानली जाते, कारण दुध अटवून जो खवा बनतो त्यातून पेढ्याची निर्मीती केली जाते. पेढे खाणा-या खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात चांदवड चा पेढा अनेक दशाकांपासून प्रसिध्द आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

या पेढ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील निसर्ग पेढ्याची भर पडली आहे. या पेढ्याचे खास वैशिष्ट म्हणजे निसर्ग पेढा  Nisarg Pedha हा गुळाचा व साखरेचा बनविला जातो. आता पर्यंत तुम्ही फक्त साखरेचा पेढे खाल्ले असेल मात्र वेगवान तुम्हाला निसर्ग पेढ्याने बनविलेल्या गुळाचा व साखरेचा पेढा आज मार्केट market मध्ये मोठ्या प्रमाणात विकाल्या जात आहे. एवढंच नाही वर्तमान पत्रानेही या पेढ्याची दखल आहे. त्यामुळे यावरुन तुम्हालाही या पेढाची बाजारात सुरु असलेल्या मागणीचा अंदाज येईल.

rain update 7 जानेवारी 24 महाराष्ट्रात पावसाची शक्यता तर नाशिक ला एलो अर्लट जारी

 

आपल्याला एखांदी शुभ कार्य करायचे असेल तर आपण पेढे वाटून आनंद साजरा करतो.  घर खरेदी असो की दसरा दिवळी, कार,बाईक खरेदी असो किंवा एखांदी शेती,अथवा बंगला. तसेच मुलगा झाला म्हणून आपण गावभर पेढे वाटतो, एवढचं नाही आपण एखांद्या रुग्णाला भेटण्यासाठी गेलो तर पेढे का घेऊन जातो. याचं कारण पेढा अनेक वर्षापासून राजं करत आहे. आणि आपणही पेढ्याला प्रथम स्थान देतो.  कारण पेढ्याची चव ही सर्वात चवदार आहे. महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त दुध, भेसळयुक्त खवा, यामुळे अन्न भेसळ प्रशासन विभाग मोठ्या कारवाया करतांना आपल्या दिसते, मात्र, आम्ही तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील शेतकरी साहेबराव ठाकरे यांनी नाशिक व महाराष्ट्राच्या बाजारात निसर्ग गुळाचा साखरेचा पेढा लॅान्च केला आहे.

वर्तमान पत्राने घेतली दखल

या पेढ्याची सकाळ या वर्तमान पत्राने दखल घेतली असून शेतक-यांनी बनविलेला हा पेढा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय.

नवरात्री पासून निसर्गाचा प्रवास सुरु

नवरात्र उत्सव काळात रेणुका देवीच्या यात्रेमध्ये हा पेढा लॅान्च करण्यात आला. याचवेळी या पेढ्याची चव पाहून खवय्यांनी या पेढ्याला प्रथम प्रसिध्दी दिली. त्यामुळे नवरात्र काळामध्ये निसर्ग गुळाचा व साखरेचा पेढा मोठ्या प्रमाणात विकल्या गेला. आता या पेढ्याचे मार्केट मध्ये चांगल प्रस्थ निर्माण झाल्यामुळे हा पेढा घेण्यासाठी लोक ठाकरे यांच्या घरी जावून पेढे घेतात. आणि या पेढ्याची चव पाहिल्यानंतर खाणा-याच्या लगेच लक्षात येतं खरा पेढा म्हणजे निसर्गचा पेढा…

निसर्ग पेढा

घराच्या गाईचे दुध

बाजारात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. यामुळे लोक घाबरतात, तसेच बाहेरुन येणा-या खव्या मध्ये मिलावट असते म्हणून लोक पेढे खाण्यास सुध्दा विचार करतात की पेढा खरोखर भेसळ मुक्त आहे की नाही. म्हणून निसर्ग पेढ्याचे संचालक व शेतकरी साहेबराव ठाकरे यांनी सुरुवातील गाईचे पालन सुरु केले. आज त्याच्याकडे 15 गाई आहे. आज ते रोज 100 ते 150  लिटर दुध काढतात.

खवा निर्मीती

सध्या ठाकरे यांचे घरचेचं दुधाळ जनावरे असल्यामुळे त्यातून निघणा-या दुध आटवून ते खव्याची निर्मीती करतात. सध्या त्यांचा खव्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या त्यांचा खवा नाशिक, मुंबई सह विविध मंगल कार्यालयासाठी मागविला जातो. तसेच मोठ्या मिठाईच्या दुकानामधून खव्याला मोठी पसंती आहे. अनेक लोक घरगुती वापरासाठी पण हा खवा घेऊन जातात. दुध घरचे असल्यामुळे हा खवा शुध्द असून त्यामध्ये कोणतीही मिलावट केली जात नाही. त्यामुळे खात्रीशीर खव्याला लोक पसंती देतात.

आता घरपोच मिळणार पेढा

निसर्ग पेढ्याचे संचालक श्री. साहेबराव ठाकरे यांनी गुळचा व साखरेचा पेढा घरपोच देण्याची नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी  9822939336 वर लोक पेढ्याची बुंकीग करतात. आता “निसर्ग पेढा” नाशिक सह महाराष्ट्रात घरपोच मिळत आहे. शुध्द खव्यापासून बनलेल्या गुळचा व साखरेचा चवीष्ठ पेढ्याने चांदवड सह महाराष्ट्रातील मार्केट कबीज करण्यास सुरुवात केलीयं. हा पेढा खाणा-यांना भुरळ पाडतोचं.  त्यामुळे खवय्यांची पावले निसर्ग पेढ्याकडे वळतात.  चांदवडचा पेढा तो ही निसर्ग पेढा घरपोच मिळू लागल्याने खव्यांची चांदीच झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button