नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा

बागलाणचे आराध्य दैवत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
दि.२४/१२/२०२३
// श्री यशवंत लिलामृत //

अध्याय ७ वा

तुझे गुण गायला / स्वरुप समजवायला //
रामेश्वर स्वत: आला / झाले दर्शन //
तुझ्या कारणी या पामरा / दर्शन दिले रामेश्वरा // न करता साधन पसारा /
धन्य धन्य यशवंता //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

 महाराज शहाद्याला रुजु झाल्यापासुन गावाचे चैतन्य वाढु लागले हाेते. बदली कुठेही झाली तरी महाराजांच्या दिनक्रमात कसलाही बदल हाेत नव्हता. त्यामुळे महाराजांची बदली ज्या गावाला हाेत त्या गावाचे रुपच बदलुन जात. महाराजांच्या दर्शनासाठी लांबलांबहुन लाेक येत त्यामुळे शहादे गावी गर्दीचा महापुर लाेटत असे. एकादशी व पाैर्णीमा ह्या दिवशी तर कधी नव्हे ईतकी गर्दी हाेत असे. त्यामुळे ते गाव एखादे तिर्थक्षेत्र आहे की काय असे वाटत. अवघी शहादा नगरी दुमदुमुन जात असे. असा हा परमार्थ चालु असतांनाच महाराजांवर दु:खाचा डाेंगर काेसळताे. महाराजांचे वडील श्री महादेव कुलकर्णी (भाेसेकर) यांच्या निधनाची बातमी येते. महाराज व रुक्मिणीमाता तातडीने आपल्या मुळगावी म्हणजेच भाेसेगावी जातात. महाराजांचे सर्व भावंड तेथे जमलेले असतात. महाराजांना एकुण आठ भाऊ त्यात अनुक्रमे दादा, मनाेहर, आबा, यशवंत, रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव व बलराम तर सखु नावाची एक बहीण हे सर्व भावंड पित्याच्या अंतीम संस्कारासाठी जमलेले असतात. महाराज आल्यानंतर पित्याच्या देहास अग्नीडाग दिला जाताे. महाराजांना पित्याच्या जाण्याचे माेठे दु:ख हाेते. महाराजांनी आपल्या पित्याच्या सेवेत काहीच कमी केले नव्हते म्हणुनच तर महादेवपंतांनी देखील अगदी तृप्त मनाने ह्या जगाचा निराेप घेतला हाेता. पित्याचे सर्व विधी आटाेपल्यानंतर काही दिवसांनी महाराज व रुक्मिणी माता आपली आई हरीदेवीसह शहाद्याला येतात. यशवंतरावांची आई हरीदेवी पतीच्या निधनानंतर खुपच खिन्न झाल्या हाेत्या. परंतु महाराजांनी त्यांच्या सेवेत काहीही कसुर ठेवली नव्हती त्यामुळे हरीदेवी हळुहळु आपले दु:ख विसरु लागल्या हाेत्या. तसेच पुत्र यशवंताचे समाजसेवेचे व्रत पाहुन त्यांनी आपले दु:ख पचवले हाेते. पुढे काही दिवसांनी धुळे येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री केशव सदाशिव रिसबुड जे महाराजांचे परमभक्त हाेते व ते नेहमी महाराजांच्या दर्शनास येत असत हे असेच एकदा शाळेला कुलुप लावुन घरी जाण्याच्या बेतात असतांनाच त्यांना समाेरुन एक बाबा येतांना दिसले. त्यांच्या खांद्यावर कावड हाेती. हळुहळु ते बाबा त्यांच्या समाेर पाेहचले. ते बाबा केशवरावांना म्हणाले, “पंताेजी राम राम.” त्यांचे खाेल गेलेले डाेळे, कृश शरीर, थरथरता आवाज याचा अंदाज घेऊन केशवरावांनी प्रतीनमस्कार करुन त्यांना विचारले, “बाबा तुम्हाला काही औषध वैगरे हवे आहे का?” बाबांनी हाेकार देताच केशवरावांनी त्या बाबांना चावडीवर आणले. व त्यांना काही वनाैषधी व सरकार कडुन पुरवीण्यात आलेल्या काही गाेळ्या दिल्या. एका काेप-यात व्यवस्थीतपणे कावड ठेवुन केशवरावांनी त्या बाबांना थाेडावेळ आराम करण्यास सांगीतला. बाबा ही थाेडे विसावले. केशवराव त्यांना विचारु लागले की, “बाबा तुम्ही काेणत्या यात्रेला निघाला आहात?” यावर ते बाबा लगेच सर्व हकीकत सांगु लागले की, “पंताेजी तुम्ही विश्वास ठेवा किंवा वेड्यात काढा पण मी तुम्हाला सर्व हकीकत सांगताे. मी काेल्हापुरचा ब्राम्हण आहे. सतत अकरा वर्षांपासुन काशी व रामेश्वराची यात्रा करण्याचा नेम मी धरला आहे. वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पवित्र गंगाजल कावडीत घ्यायचे व पायी पायी प्रवास करीत रामेश्वरास जाऊन भगवान रामेश्वरास त्या जलाने स्नान घालायचे व पुन्हा काशीस जायचे. अशी माझी ही कावड यात्रा सतत अकरा वर्षापासुन चालु आहे. माझा हा नेम पाहुन लाेक मला कावडीबाबा म्हणु लागले. व पुढे ह्याच नावाने मी प्रसीध्द झालाे. मात्र यंदा मी बाराव्या वर्षी नेहमी प्रमाणे निघालाे. सातपुडा पर्वत मागे टाकत असतांनाच मला थंडी ताप भरला. शरीर अशक्त झाले. चालण्याची गती मंदावली. शरीरात त्राण ऊरले नव्हते. शेवटी मी पर्वताच्या पायथ्याशी ‘शेंदणे’ ह्या गावी थांबलाे. डाेंगरी वारा, बाेचरी थंडी व काळाकुट्ट अंधार व त्यातच अंग थंडी तापाने फुटते की काय? असे झाले. अशक्तपणा वाढला. डाेळ्यांची आग हाेऊ लागली. घशाला काेरड पडली व प्राण कासावीस हाेऊ लागला. मरण जवळ आले की काय असे वाटुन मी मनाेमन देवाला प्रार्थना केली की हे देवा माझा नेम तुम्ही अकरा वर्ष चालवीला पण आता माझा अंतकाळ हाेण्याची वेळ आली आहे. ही बारावी खेप पुर्ण हाेणार नाही. आता शेवटी एकच प्रार्थना करताे, माझे शरीर गेले तर भले जावाे पण हे काशीचे पवीत्र गंगाजल तुझ्या मस्तकावर पडाे. असे मी मनात म्हटलाे व मला ग्लानी येऊन मी बेशुध्द पडलाे. अशातच मला एक स्वप्न पडले की, एक तेजस्वी महापुरुष माझ्यासमाेर येऊन ऊभे राहीले. कपाळावर त्रिपुंड, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, एका हातात कमंडलु, पायात खडावा असा ताे दिव्य महापुरुष मला म्हणाला. “ऊठ भक्ता भिऊ नकाेस. तुझी बारा वर्षांची तपश्चर्या पुर्ण हाेऊन आता फळ प्राप्तीची वेळ आली आहे. आता तु रामेश्वरला येण्याची आवश्यकता नाही. येथुनच काही अंतरावर शहादा हे गाव आहे. तिथे यशवंत महादेव भाेसेकर नावाचा एक महान संत आहे. ताे मामलेदार असुन त्याने पराेपकारातच आपले संपुर्ण आयुष्य पणाला लावले आहे. ताे मीच आहे असे समज. तुझ्याकडील तिर्थाने त्या यशवंत मामलेदाराला स्नान घाल म्हणजे मला स्नान घातल्यासारखे हाेईल व बारा वर्षाचा मला स्नान घालण्याचा नेम पुर्ण केल्याचे पुण्य तुला लागेल. ऊठ चिंता करु नकाेस.” असे म्हणुन ते महापुरुष गायब झाले व मला लगेच जाग आली. ऊठुन बघताे तर काय माझ्या अंगातील ताप ऊतरला हाेता. मनात हुरुप आला. तेथुन लगेच ऊठलाे व येथे आलाे. थाेडेफार औषध पाणी घ्यावे ह्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलाे. आता मला चिंता नाही. आता येथुन शहाद्याला जायचे व त्या संत मामलेदारांच्या मस्तकावर ह्या गंगाजलाने अभिषेक करायचा म्हणजे मग माझी यात्रा संपली.” कावडीबाबा आपले बाेलणे संपवुन भिंतीला टेकले. ही कथा ऐकुन तर केशवरावांचे डाेळे भरुन आले. ते म्हणाले, “हे देवा यशवंता तुझ्या किर्तीचा ध्वज तर स्वर्गातही फडकत आहे.” केशवरावांच्या डाेळ्यातील अश्रु बघुन कावडीबाबा त्यांना विचारु लागले “पंताेजी तुम्ही रडताय का?” केशवराव म्हणाले, “काय सांगु कावडीबाबा संपुर्ण खानदेशचे दैवतच आहेत ते. हजाराेंचा अन्नदाता, लाखाेंचा दर्शनदाता व असंख्यांच्या नवसाला पावणारा पृथ्वीवरील चालता बाेलता देव आहे. ऊगीचच नाही लाेक त्यांना देव यशवंत म्हणत. गेल्या कित्येक वर्षांपासुन मी त्यांचा नम्र भक्त आहे.” असे त्यांचे बाेलणे झाल्यावर कावडीबाबांनी केशवरावांचा विनम्र हाेऊन निराेप घेतला व काही वेळानंतर ते शहाद्याकडे जाण्यास निघाले. काही दिवसांतच माघ पाैर्णीमेच्या दिवशी कावडीबाबा शहाद्याला पाेहचले. तेव्हा महाराज कचेरीत गेलेले हाेते. ताेपर्यंत रुक्मिणीमातेने त्यांचा याेग्य ताे पाहुनचार केला हाेता. थाेड्याच वेळात महाराज आपले कचेरीतील कामकाज आटपुन घरी आले. महाराजांचे रुप व त्यांच्या दर्शनासाठी हाेणारी गर्दी पाहुन तर कावडीबाबाला गहीवरुनच आले. त्यांनी लगेच महाराजांचा आशिर्वाद घेऊन घडलेली सर्व हकीकत सांगीतली. त्यावर महाराज शांतपणाने म्हणाले, “बाबा ही तर तुमची श्रध्दा आहे. परमेश्वराने मला ती ऊपमा दिली एवढेच. मी तर एक अगदी सामान्य माणुस आहे. ऊलट तुमचे चरण माझ्या घराला लागल्याने माझे घर पावन झाले.” महाराजांचे हे अलाैकीक रुप व ऊदारपणा व विनम्रता पाहुन तर कावडीबाबा थक्क झाला. स्वर्गातील देव ज्याची थाेरवी गातात ताे माणुस एवढा विनम्र ! कावडीबाबाला तर रडुच आले. ताे म्हणु लागला, “महाराज तुम्ही प्रत्यक्ष देव आहात. तुमची थाेरवी दाही दिशा आेलांडुन स्वर्गातील देवांच्या मुखी पाेहचली आहे. तेव्हा मी आणलेली ही गंगा स्विकारा व मला पावन करावे अशी माझी ईच्छा आहे.” यावर महाराज म्हणाले, सर्वेश्वराच्या आदेशाचा आम्ही भंग कसा करु. तुमची ईच्छा असेल तसे करावे.” महाराजांचे हे ऊदगार एेकुन तर कावडीबाबा नाचुच लागला. कावडीबाबाच्या दृष्टांताची बातमी गावाेगावी पाेहचली. लाेकांच्या झुंडीच्या झुंडी यशवंतराव महाराजांच्या दर्शनाला येऊ लागल्या. पुढे काही दिवसांनी महाशिवरात्रीच्या पवीत्र मुहुर्तावर कावडीबाबाने काशीहुन आणलेल्या गंगाजलाने महाराजांचा अभिषेक केला. महाराजांचा अभिषेक हाेत असतांना ऊपस्थितांपैकी सर्वांनाच महाराजांच्या चेह-यात प्रत्यक्ष भगवान रामेश्वराचा चेहरा दिसु लागला हाेता. हा एक माेठा चमत्कार प्रत्यक्ष शहादेकरांनी अनुभवला हाेता. कावडीबाबा ही मग महाराजांचा निस्सीम भक्त झाला हाेता व पुढे वेळ मिळेल तेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी नित्य नियमाने येत असत. असेच दिवसामागुन दिवस निघुन गेले. महाराजांवर काळाने पुन्हा घाला घातला. पिता महादेवपंतांच्या निधनाच्या दु:खातुन सावरताे न सावरताे ताेच पुन्हा काही दिवसांनीच सन १८६५ साली यशवंतराव महाराजांच्या आई हरीदेवी यांचे निधन झाले. “पुढे जाणा-यास जाऊ द्यावे” असे म्हणुन महाराजांनी आपले दु:ख पचवुन पुन्हा जनतेची सेवा करण्यास सुरवात केली.( श्री केशव सदाशिव रिसबुड धुळे येथील शाळेचे मुख्याध्यापक हे महाराजांच्या कार्यकाळातील हाेते. यांनी आपल्या जिवनातील बराचसा काळ यशवंतराव महाराजांच्या बराेबरच घालवीला हाेता. त्यांना आपल्या जिवनात दैनंदिनी डायरी लिहीण्याची सवय हाेती. यशवंतराव महाराजांच्या जिवनात घडणा-या प्रत्येक घटनेची त्यांनी पुराव्या निशी आपल्या दैनंदिनी डायरीत नाेंद केलेली आहे. पुढे महाराजांच्या महानिर्वानानंतर महाराजांच्या जिवन चरीत्रावर सर्वात पहीला ग्रंथ हा केशवरावांनीच लिहीला हाेता. महाराजांचा जन्म ते मृत्यु पर्यंतच्या सर्व घटना अगदी तंताेतंत तारीख वार प्रमाणे त्यांनी लिहील्या आहेत व केवळ त्यांच्यामुळेच ही सर्व माहिती आपणास ऊपलब्घ हाेऊ शकली.) 

अशा प्रकारे कावडीबाबाच्या दृष्टांतामुळे यशवंतराव महाराजांच्या दैवीपणाचा शहादेकरांना प्रत्यक्षात अनुभव येताे व येथे सातवा अध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, उज्जैन (ईंदाैर.)

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button