नाशिक ग्रामीणनाशिक शहरनाशिकचे राजकारणसरकारी माहिती

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न

आमदार सुहास कांदे यांचा पुढाकार


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव –

मनमाड शहरातील ऐतिहासिक चळवळ बघता मनमाड शहराला जिल्ह्यामध्ये एक वेगळेच स्थान आहे.मात्र काळाच्या ओघात मनमाड शहरातील थोर समाजसेवक,महान नेते यांचे स्मारकाचे नूतनीकरण होणे अपेक्षित होते,  आवश्यक होते.त्यामुळे शहराच्या सौंदर्यकरणांमध्ये निश्चितच भर पडते. शहरातील ही गरज ओळखून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने शहरातील स्मारकांचे नूतनीकरण करण्याचा संकल्प पूर्णतेस जात आहे.

त्यापैकीच एक इंदोर-पुणे राज्य महामार्गावरील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचे नूतनीकरण सोहळा नुकताच पार पडला.त्यामुळे शहराच्या सौंदर्यकरणात नक्कीच भर पडणार आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सून श्रीमती सावित्रीमाई साठे व नातू सचिनजी साठे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

पाकीजा कॉर्नर ते शासकीय उद्घाटन कार्यक्रम ठिकाणपर्यंत पायी चालत ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.या ठिकाणी सन्माननीय प्रांताधिकारी,तहसीलदार तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत स्मारकाचे व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यानंतर पोलीस परेड ग्राउंड,मनमाड येथे सकल मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.

यानिमित्ताने मातंग समाजाचे नेतृत्व केलेले मनमाडचे माजी नगराध्यक्ष दिवंगत दिलीप सोळसे यांना मरणोत्तर कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला.तसेच मुरलीधर ससाणे यांना समाजभूषण व बाळासाहेब थोरात पटेल यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांना समाज गौरव पुरस्कार आणि फरहान खान व मयुर बोरसे यांना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या धनंजय अवचारे व यशवंत बागुल यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर, बापू वाघ यांनी केले तर आभार बाळासाहेब शिरसाठ यांनी केले.

यावेळी मा.आमदार राजाभाऊ देशमुख, अल्ताफ बाबा खान,उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,राजाभाऊ अहिरे,राजेंद्र पगारे, गंगाभाऊ त्रिभुवन,नितीन पांडे,सचिन संघवी,फिरोज शेख,युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,पिंटू शिरसाठ,अमिन पटेल,अमजद पठाण, ललित रसाळ,आजू शेख,दिनेश घुगे, निलेश ताठे,पिंटू वाघ,महिंद्र गरुड, अमोल दंडगव्हाळ,सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी,प्रमोद अहिरे,स्वराज वाघ,सचिन दरगुडे,निलेश व्यवहारे लाला नागरे,महेेंद वाघ,बाबा शेख, लोकेश साबळे,मन्नू शेख,अनिल जाधव, बाबा पठाण,सनी पगारे,आसिफ पठाण, स्वराज देशमुख,कैलास सोनवणे,संदीप वावरे,महेश कापडणे व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button