नाशिक क्राईम

चांदवड मध्ये स्पोटकांनी भरलेला ट्रक जप्त


वेगवान नाशिक / wegwan nashik

चांदवड, ता. 24 डिसेंबर 23 – मनमाड राज्य महामार्गावर नाशिक पोलिसांनी बेकायदेशीरपणे स्फोटकांची वाहतूक करणारा ट्रक पकडला असल्याचे दिसून येत आहे.

जिलेटिनची वाहतूक करणारा ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होतीय तेंव्हा पोलीसांनी कारवाई केली. चांदवड येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ट्रक आला तो जप्त करण्यात आला.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

जिलेटिन वाहून नेणाऱ्या ट्रकची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला, ज्यामुळे अखेरीस ट्रकमध्ये स्फोटकांचा शोध लागला. वाहनातून तब्बल ७ लाख ९४ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

या संदर्भात चांदवड येथे बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून हे स्फोटके कुठे घेऊन जाणार होते, याचा उपयोग कशासाठी होणार होता याबाबत पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button