नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा

बागलाणचे आराध्य दैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
दि.22/12/2023
// श्री यशवंत लिलामृत //
अध्याय ५ वा

खुट्याळाने वाईट चिंतीले /
संतासही व्यर्थ पिडीले //
नाेकरीत छळीले /
संबंध नसता //

   यशवंतरावांची बदली अमळनेरला झाली ही बातमी घराेघरी पाेहचली. अंमळनेरात आनंदाेत्सव साजरा करण्यात आला. कारण यापुर्वी देखील महाराज अमळनेरात हाेते. पण जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा सर्वांनी तेथील ग्रामदैवत सखाराम महाराजांना नवस केला हाेता की पुन्हा महाराजांना अमळनेरात बदलुन येऊ दे. त्यामुळे आता सर्व जण महाराजांना घेऊन सखाराम महाराजांच्या मंदीरात नवस फेडण्यासाठी गेले हाेते. मग मागचाच प्रवास पुन्हा सुरु झाला. महाराजांची किर्ती सर्वदुर पसरली हाेती. लाेकांना त्यांच्या दैवी शक्तीचे राेज वेगवेगळे अनुभव येत हाेते त्यामुळे ह्या चालत्या बाेलत्या देवाचे दर्शन घेण्यासाठी लांबलांबहुन लाेक येऊ लागले हाेते. अमळनेर नगरी दुमदुमुन जात असत. गावात नारळ, पेढे व मिठाई हा धंदा वाढु लागला हाेता. अनेक लाेक तर ह्या चालत्या बाेलत्या देवालाच नवस करु लागले आणि काय आश्चर्य हा देव सुध्दा त्यांच्या नवसाला पावु लागला. मग हा नवस तिथल्या तिथे फेडला जाई. त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरुप येऊ लागले. राेज रात्री यशवंतरावांच्या घरी भजन किर्तन व अन्नदानाचा कार्यक्रम हाेत असे. हळु हळु गर्दी एवढी वाढु लागली की शेवट गावातील मुक्त पटांगणावर भजन किर्तन हाेऊ लागले. दिवसभर कचेरीतील कामकाज व रात्री अन्नदान व भजन प्रवचन हा जणु दिनक्रमच ठरला हाेता. महाराजांची किर्ती सर्वदुर पसरली हाेती. सर्व लाेक महाराजांना देव यशवंत म्हणु लागले.आज अक्कलकाेट स्वामी समर्थांचा शब्द खरा ठरला हाेता. कारण काही वर्षांपुर्वीच स्वामी समर्थांनी महाराजांना आशिर्वाद दिला हाेता की भविष्यात भुतलावरील सर्व लाेक तुलाच देव म्हणतील. त्यांचा हा आशिर्वाद आज सत्यात ऊतरला हाेता. दिवसामागुन दिवस निघत गेले. अमळनेरात दिवसेंदिवस गर्दी वाढुच लागली. पण ज्या प्रमाणे समाजात चांगले लाेक राहतात त्याचप्रमाणे ह्याच समाजात अनेक वाईट लाेक ही असतात. मग अशा लाेकांना चांगले कार्य केलेले सहन हाेत नाही. ते काहीतरी वाईट घडवुन आणण्याच्याच बेतात असतात. मग अशा ह्या विघ्नसंतुष्ट लाेकांना देव,धर्म ह्या गाेष्टी
थाेतांड वाटतात. कसला देव आणि कसला धर्म अशी भावना त्यांची असते. मग सामान्य व्यक्तीच काय पण संतांना देखील ते साेडत नाहीत. अशाच काही लाेकांनी मग यशवंतराव महाराजांनाही त्रास देणे सुरु केले. वरीष्ठ अधिका-यांकडे महाराजांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खाेटे नाटे पत्र लिहुन ते जिल्हाधीकारी कडे पाठवीले. पुर्वीचे खानदेशचे कलेक्टर श्री मेन्सफिल्ड साहेब हे स्वत: महाराजांचे भक्त असल्याने अशा पत्रांचा त्यांच्यावर परीणाम हाेत नसे. मात्र काही दिवसांपुर्वीच मेन्सफिल्ड साहेबांची बदली झाल्याने त्यांची कराची येथे रेव्हेन्यु कमीश्नर ह्या पदावर बढती झाली हाेती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन जिल्हाधीकारी श्री अँशबर्नर साहेब रुजु झाले हाेते. अतीशय ऊध्दट व ऊर्मट अशी त्याची ख्याती हाेती. म्हणुनच तर मग आता ह्या विघ्नसंतुष्ट लाेकांचे कारणामे सफल हाेऊ लागले हाेते. त्यांनी लगेच नवीन कलेक्टरला भेटण्याचे ठरवीले व महाराजांविषयी कुरघाेडी करण्याचे षडयंत्र रचले. लवकरच मग हे लाेक कलेक्टर ला भेटले व सांगु लागले की, “साहेब, अमळनेरचे मामलेदार श्री भाेसेकर ( महाराजांचे पुर्ण नाव यशवंत महादेव भाेसेकर) हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. तसेच ते सतत देव देव करीत असल्याने त्यांचे मामलेदार पदावर लक्ष नाही. तसेच गाेरगरीबांच्या सेवेसाठी त्यांनी भरपुर कर्ज करुन ठेवले आहे व त्यामुळे संपुर्ण तालुक्यालाच बेकायदेशीर कर्ज झाले आहे. ह्या सरकारी कर्जामुळे संपुर्ण तालुक्याच्या विकासाचा खाेळंबा झाला आहे. त्यामुळे अनेक सरकारी कामांमध्ये व्यत्यय येत आहे. हा सरकारचा घाेर अपराध आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना मामलेदार पदावरुन निलंबीत करण्यात यावे” असे खाेटे नाटे आराेप लावुन त्यांना नाेकरीतुन बडतर्फ करावे अशी मागणी करु लागले. याचे कारण म्हणजे त्या लाेकांना महाराजांची लाेकप्रीयता सहन हाेत नव्हती व महाराजांवीषयी मनात जळफळाट हाेत असे. मग ह्या नवीन कलेक्टर श्री अँशबर्नर ने सुध्दा महाराजांची तपासणी करण्याचे आदेश दिले. यशवंतराव महाराजांना हा धक्का सहन झाला नाही. महाराजांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. “मी पराेपकार करताे, दानधर्म करताे, भुतदया दाखवीताे म्हणुन सरकारी कामात व्यत्यय येताे? लाेकांना वेळेवर न्याय मिळत नाही? हा काय खाेटारडेपणा? हे देवा माझे तर डाेकेच चक्रावुन गेले आहे. लाेक श्रध्देने माझ्याकडे येतात. मलाच नवस करतात व पांडुरंगाच्या कृपेने ते नवस पुर्ण हाेतात हा त्यांच्या श्रध्देचा भाग आहे. मात्र मी तर माझा धर्म म्हणुन पराेपकार करताे. पगार जरी १७५ रु. असला तरी ह्या दानधर्मासाठी मला हजाराे रुपये लागतात. त्यामुळे मी ह्या गरीब जनतेसाठी खाजगी कर्ज काढताे. माझे कर्ज हे वैयक्तिक आहे मग तालुक्याला कर्ज हाेण्याचा प्रश्न येताेच कुठे? मी हे कर्ज सरकारी तिजाेरीतुन घेतलेले नाही, मग ही ऊठाठेव तरी कशाला? तरीही ह्या खाेट्या आराेपांची कलेक्टर साहेब पुन्हा पुन्हा तपासणी तरी का करतात? दफ्तरात तर एकही अनियमीतता किंवा दुर्लक्षीत बाब आढळली नाही मग पुन्हा पुन्हा ही चाैकशी तरी कशासाठी? मी ह्या विघ्नसंतुष्ट लाेकांचे असे काय बिघडवीले आहे की हे लाेक सतत माझ्या विराेधात षडयंत्र रचतात व कलेक्टर साहेब देखील त्यांनाच साथ देतात. हे देवा मी तर आता पुर्णपणे बैचेन झालाे आहे. माझ्या परमार्थात हा काय अडथळा? त्यापेक्षा जर मीच आता नाेकरीचाच राजीनामा दिला तर? नकाे ते मामलेदार पद आणि नकाे ती नाेकरीची बेडी त्यापेक्षा संपुर्ण वेळ जर मी ह्या गाेरगरीबांच्या सेवेसाठीच दिला तर ? बस देवा झाला आता निर्णय. मी नाेकरीचा राजीणामा देणार” असे अनेक विचार करुन महाराजांनी निर्णय घेतला ताे मामलेदार पद त्यागण्याचा व नाेकरीचा राजीणामा देण्याचा. महाराज ऊठले व लगेच आपल्या तहसीलदार पदाचा राजीनामा लिहीला व खाली यशवंत महादेव भाेसेकर अशी माेडी लिपीतील सही करुन ताे राजीनामा जिल्हाधिका-यांकडे पाठवुन दिला. ईकडे गावात तर हाहाकार माजला देवमाणसावर काय ही वेळ आली असे म्हणुन जाे ताे रडु लागला. सर्व गावकरी एकत्र जमले व महाराजांच्या घरी जाऊन राजीनामा परत घेण्याची विनवणी करु लागले. मात्र यशवंतराव महाराज आपल्या निर्णयावर ठाम हाेते. त्यांनी राजीनामा परत घेण्यास नकार दिला. व तुमची सेवा करण्यास मी केव्हाही तयार आहे त्यासाठी मला मामलेदार पदाची काही आवश्यकता नाही अशी लाेकांची समजुत काढुन ते राजीनाम्यावर ठाम राहीले. मात्र गावातील काही प्रतिष्ठीत लाेक कलेक्टर कडे जाऊन महाराजांचा राजीनामा स्विकारु नये अशी विनवणी करु लागले. कलेक्टर श्री अँशबर्नर हा माेठा धुर्त आणि लबाड हाेता ताे त्या लाेकांचे काही एक म्हणणे एेकुन घेण्यास तयार नव्हता. तुमच्या मामलेदारांवर अनेक आराेप आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा मी मंजुर करुन घेत आहे असे सांगुन कलेक्टरने त्या लाेकांना हटवीण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील काही श्रीमंत सावकार कलेक्टरला सांगु लागले की ” साहेब महाराजांवर लावलेले सर्व आराेप हे बिनबुडाचे आहेत. महाराजांचे कर्ज हे खाजगी आहे व त्याचा सरकारी कर्जाशी काही एक संबंध नाही. आम्ही स्वत: महाराजांना ते कर्ज दानधर्मासाठी स्वखुशीने दिले आहे व जर तुम्हाला वाटत असेल की कर्ज फिटल्यावरच तुम्ही महाराजांचा राजीनामा परत कराल तर आत्ताच्या आत्ता आम्हीच महाराजांचे कर्ज फेडताे व तशा पावत्या तुम्हाला देताे पण आमच्या महाराजांचा राजीनामा स्विकारु नका” अशी विनवणी करु लागले. मात्र कलेक्टर काही एक ऐकायला तयार नव्हता. शेवटी गावकरी हाताश पणे रिकाम्या हाताने परत आले. महाराजांनी राजीनामा देऊन आता एक महीन्याच्या वरती काळ लाेटला हाेता. महाराजांचा संपुर्ण वेळ आता गाेरगरीबांची सेवा व अन्नदान यातच जात हाेता. महाराजांच्या ह्या कार्यात व्यत्यय येऊ नये तसेच पैशांची अडचण येउ नये म्हणुन गावातील श्रीमंत लाेक महाराजांना सहाय्य करु लागले हाेते.एकदा महाराज सखाराम महाराजांच्या मंदीरात दर्शनासाठी गेले असता त्यांना दृष्टांत झाला की, सखाराम महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगत आहेत की यशवंतरावांना राजीनामा परत घेण्याचा आदेश द्यावा. व त्याच रात्री महाराजांना पुन्हा स्वप्नात दृष्टांत हाेताे की स्वामी समर्थ महाराज त्यांच्यासमाेर ऊभे राहुन त्यांना म्हणतात की, “पळपुटा कुठला” यशवंतराव महाराजांना लगेच जाग येते. व मनात प्रश्नांचे काहुर माजते. “मी पळपुटा कसा काय? मी तर परमार्थ साेडला नाही.ऊलट दुपटीने वाढवीला. नाेकरीचा राजीनामा देऊन मी ऊलट परमार्थ वाढवीला. मग मी पळपुटा कसा?” असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले व लगेच त्यांना स्वामींच्या पळपुटा ह्या शब्दाचे आकलन झाले. “हाेय स्वामी म्हणतात ते बराेबरच तर आहे. कर्ममार्गात व नाेकरीत येणा-या अडथळ्यांना मी घाबरलाे. मी अग्निदीव्य टाळले. मग हा पळपुटेपणाच नाही का? सीतामाईने सुध्दा अग्नीपरीक्षेला ताेंड दिले मग मीच ह्या दुष्टांना का भ्यावे? अशाने तर हे दुष्ट लाेक जाेमाने माजतील. ईतर लाेकांना त्रास देतील. समाजात दुष्टांचा जाेर वाढेल व याचा त्रास सज्जनांना हाेईल. भवीष्यात देखील अनेक लाेक नाेकरी करतील त्यांच्यासमाेर मी काय आदर्श ठेवेल? मी नाेकरीमुक्त असुन चालणार नाही. अजुनही ब-याच लाेकांची मला सेवा करायची आहे. सुर्याने कधी प्रकाश साेडला नाही. नदीला अनेक लाेक घाण करतात मग ती कधी माघारी फिरते का? मग मीच का? नाही नाही आता मी स्वत: ऊन्हात ऊभा राहुन ईतरांना सावली देणारा वटवृक्ष हाेईल.” अशा अनेक विचारांती महाराजांनी राजीणामा परत घेण्याचा निर्णय घेतला व तसे पत्र प्रांताचे रेव्हेन्यु कमीश्नर एलीस साहेबांना लिहीले व एक पत्र मेन्सफिल्ड साहेबांना ही पाठवीले. एलीस साहेब व मेन्सफिल्ड साहेब या दाेघांची यशवंतरावांवर अपार श्रध्दा हाेती. त्यांनी लगेच खानदेश चे कलेक्टर श्री अँशबर्नर साहेब यांना यशवंतरावांचा राजीनामा परत करण्याचा हुकुम साेडला. मात्र अँशबर्नर हा नेहमीच महाराजांचा द्वेष करीत हाेता. त्याने लगेच तातडीने महाराजांच्या जागेवर अमळनेरला दुस-या मामलेदाराची तडकाफडकी नेमणुक करुन दिली व तसा अहवाल ही एलीस व मेन्सफिल्ड साहेबांकडे पाठवुन दिला. तसेच यशवंतरावांवर फार माेठे कर्ज असल्याने जाे पर्यंत ते कर्जमुक्त हाेत नाही ताेपर्यंत त्यांची सरकारी नियमानुसार दुस-या ठिकाणी ही नेमणुक करता येणे शक्य हाेत नसल्याची सबब निदर्शनास आणुन दिली. ही बाब लक्षात येताच महाराजांचे परमभक्त व मुंबईचे सर्वात श्रीमंत सावकार श्री गाेवींद आप्पा हरी वाळवेकर यांनी महाराजांवरील सर्व कर्ज भरुन टाकले व पावती कलेक्टर अँशबर्नर कडे देऊन महाराजांची नेमणुक करण्याची विनंती केली. मात्र अँशबर्नर कलेक्टर माेठा नाटकी हाेता ताे काहीही युक्त्या शाेधुन यशवंतरावांना तहसीलदार पदापासुन दुर ठेवण्याची खेळी खेळत हाेता. अँशबर्नर चे हे प्रकरण खुपच गाजु लागले हाेते स्थानिक प्रतिष्ठीत पुठा-यांकडुन त्याच्याच विराेधात आंदाेलने हाेऊ लागली. शेवटी वरीष्ठ पातळीवरुनच अँशबर्नरची कानऊघडणी करुन त्याच्यावर दबाव येऊ लागला. शेवटी वरीष्ठांच्या आदेशाने त्याने यशवंतरावांचा राजीनामा परत केला. मात्र अमळनेरहुन त्यांची “शहादा” ह्या गावी बदली करण्यात आली. अमळनेरकर मंडळी हळहळली. मात्र ह्या सर्व प्रकरणातुन महाराजांची सुटका हाेऊन त्यांना याेग्य ताे न्याय मिळाला हाच खरा आनंद मानुन अमळनेरकरांनी बदलीचे दु:ख पचवीले हाेते. यशवंतराव महाराज आता “शहादा” ह्या गावचे मामलेदार झाले.
  अशा प्रकारे विविध प्रकारची नाटके करणा-या कलेक्टर अँशबर्नरची खेळी जनता जनार्दन हाणुन पाडते व महाराजांना याेग्य न्याय मिळताे व येथे पाचवा अध्याय संपताे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे , (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button