नाशिक ग्रामीण

Nashik Rain नाशिकः पावसाला सुरुवात!


वेगवान नाशिक / wegwan nashik 

नाशिक, 22 डिसेंबर 23  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काही गावांमध्ये रिम झिम पाऊस पडण्यात सुरुवात झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांदवड तालुक्यातील काजीसांगवी सह अनेक गावांमध्ये रिम झिम  पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे…

चांदवड तालुक्यात आज सकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली होती. तसेच आता रात्री 7ः30 वाजेच्या सुमारास पाऊस सुरु झाल्यामुळे अनेक शेतक-यांचे कांदे शेतात कापून पडले आहे. तर काही शेतकरी कांदा काढत आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठं झाले होणार असल्यामुळे कांदे झाकण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

 

उत्तर भारतात पावसाचा जोर कायम

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून संपूर्ण उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहील, त्यानंतर थंडी आणखी वाढेल. देशभरातील लोकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सकाळपासून दाट धुके पाहायला मिळत आहे, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीत मागील दिवसांच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिल्लीत हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार, आज म्हणजेच 22 डिसेंबरला दिल्लीत हलक्या पावसानंतर तापमान पाच अंशांवर पोहोचेल.

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Rain Update) पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हवामान विभागानुसार, पुढील तीन दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामधील काही भागांमध्ये दाट धुक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, मात्र थंडी वाढणार असून कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button