नाशिक ग्रामीण

येवल्यामध्ये जरांगे पाटलांच्या गावबंदी बॅनरवरुन रास्तारोको

Jarange Patil's Gaonbandi banner in Yevalya


वेगवान नाशिक / Yeola News 

येवला, ता. 21 डिसेंबर 23  तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोंची ग्रामस्थांच्या बॅनरवर विटंबना झाल्याच्या घटनेचा सकल मराठा समाजाने निषेध केला आहे. या मुळे मराठा समाजाने  नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून येवल्यातील उंदीरवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या गाव बंदीच्या बॅनरवरील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

प्रदान केलेल्या माहितीमध्ये असे नमूद केले आहे की अशी कृत्ये समुदायांमध्ये संघर्ष निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यक्ती किंवा गटांकडून केली जाऊ शकतात. या रणनीतीमुळे वाद आणि विवाद होऊ शकतात, संभाव्यतः विद्यमान तणाव वाढू शकतात.

यामधील आरोपींना लवकर आळा बसणे गरजेचे असून समाजात तेढ निर्माण कऱणा-या आरोपींवर त्वरीत गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button