नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय ४ था

बागलाणचे आराध्य दैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
दि.21/12/2023
// श्री यशवंत लिलामृत //
अध्याय ४ था

धन्य धन्य यशवंत देवा /
तुला कुणाचा नाही हेवा //
मुखी नाम हाती सेवा /
कठीण व्रत आचरिले //

    यशवंतराव महाराजांच्या दैवी शक्तीचे असे एक ना अनेक अनुभव लाेकांना येऊ लागले हाेते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील सर्व लाेकांना महाराजांविषयी खुपच आदर वाटु लागला. पुढे काही दिवसांतच महाराजांची बदली “एरंडाेल” ह्या गावी झाली. अमळनेरकर मंडळी हळहळली. त्यांनी लगेच बाेरी नदीच्या तिरावरील श्री सखाराम महाराजांच्या समाधी ला साकडे घातले व महाराजांची बदली रद्द व्हावी यासाठी नवस करु लागले.मात्र यशवंतराव
महाराज सर्वांना समजावु लागले की, “भावांनाे शासकीय नाेकरीत बदली हाेणे हे क्रमप्राप्तच असते. ते कुणालाही चुकत नाही. त्यामुळे मला बदलीच्या ठिकाणी जाणे भाग आहे. ईश्वराची ईच्छा झाल्यास मी पुन्हा येथे बदलुन येईल” असे अनेक ऊदाहरणे देऊन महाराजांनी लाेकांची समजुत काढली. सर्व लाेकांनी मग महाराजांना अश्रु नयनांनी निराेप दिला. लवकरच महाराज एरंडाेलचे तहसीलदार म्हणुन काम बघु लागले. पगार १७५ रुपये झाला. यशवंतराव महाराज एरंडाेलला रुजु झाल्यापासुन मामलेदार कचेरी व मामलेदारांचा वाडा ईकडे माणसांची वर्दळ वाढु लागली. याचे कारण म्हणजे ह्या साधु पुरुषाचे आपणास राेज दर्शन घडावे हा त्यामागचा ऊद्देश असायचा. भुतदया, शांती, औदार्य, शिस्त, विनम्रता अशा असंख्य गुणांमुळे लाेक त्यांना “संतरावसाहेव” म्हणु लागले. काही विचीत्र लाेक तर त्यांची कचेरीतील स्वार्थी कामे करुन घेण्यासाठी महाराजांना गळ घालीत व लाच दाखवीत. पण तरीही महाराज त्यांच्यावर न रागावता त्यांना ते अतीशय शांतपणे युक्तीने टाळीत व कचेरीतील कामे निप:क्षपातीपणाने करीत.
सन १८५७ चा काळ, लष्करातील हिंदी सैनिकांनी इंग्रज सरकार विरुध्द बंड पुकारुन स्वातंत्र्य युध्दाची सुरुवात केली. ऊत्तर भारत ढवळुन निघाला. “मंगल पांडे” च्या पराक्रमाने व वीरमरणाने शेकडाे सैनिकांना स्फुर्ती मिळुन त्यांनी दिल्लीच्या तख्तावर स्वातंत्र्याचा ध्वज लावण्याचा चंग बांधला. कंपनी सरकार हादरले. अशातच अनेक घडामाेडी घडल्या. दिवसा ढवळ्या लुटमार हाेऊ लागली. बंडाची बातमी सरकार कडे जाताच बंदाेबस्तासाठी सरकारी पलटणी रवाना झाल्या. त्यातील एका पलटणीचा तळ एरंडाेलला पडला. पलटणी ला तातडीने सावदे तालुक्याकडे जायचे हाेते.पण खर्चासाठी पाहीजे तेवढे पैसे नव्हते. सरकारी अब्रु जाते की काय? शेवटी कर्नल साहेब हे मामलेदार कचेरीत आले. त्यांनी मामलेदार यशवंतरावांना सर्व हकीकत सांगुन अडचण सांगीतली. महाराज देखील चिंतेत पडले. तालुक्याचा मामलेदार ह्या नात्याने सरकारी तिजाेरीतुन रक्कम देता येईल पण ती फक्त पाच हजार रुपयापर्यंत. मात्र कर्नल साहेबांची गरज आहे ती तीस हजार रुपयांची. पण आपल्या अधिकारात एवढे पैसे देता येणार नाही. कलेक्टर साहेबांचा हुकुम मिळाल्या शिवाय तसे करता ही येणार नाही. मात्र पलटणीला तर आजच पुढे जायचे आहे. पैशावाचुन तर सर्व अडकले. आता काय करावे? अधिकार नसतांना एवढे पैसे सरकारी तिजाेरीतुन काढणे हे बेकायदेशीर आहे. कलेक्टरच्या परवानगीची वाट पाहत बसलाे तर तीन ते चार दिवस निघुन जातील. पण ही तर आता आणिबाणीची वेळ आहे. त्यामुळे माझेही काही कर्तव्य आहे. नियम, कायदा, शिस्त या सर्वांचा अंतीम ऊद्देश तरी काय? सुव्यवस्था हाच ना. तर मग सुव्यवस्थाच जर अडचणीत आली तर माझी काय जबाबदारी? लष्कर सरकारचे तसा खजीना ही सरकारचाच. गरज सरकारची व पुर्तीसाधन ही सरकारचेच दाेन्हीही पर्याय माझ्या समाेरच आहेत. पण नियमभंगामुळे मला नाेकरीत त्रास ही
हाेऊ शकताे. त्रास झाला तर ताे मला हाेईल पण सरकारची अब्रु मात्र वाचेल असे अनेक विचार करुन महाराजांनी तीस हजार रुपये सरकारी तिजाेरीतुन देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला हाेता. अर्ध्या तासाच्या आतच महाराजांनी कर्नल साहेबांकडे तीस हजार रु. ची रक्कम दिली व कर्नल साहेबांकडुन तशी लेखी मागणी पत्र व पाेहच घेण्यात आली. समयसुचकता दाखवुन महाराजांनी घेतलेल्या ह्या धाडसी निर्णयाचे सर्वांकडुन प्रचंड प्रमाणात काैतुक झाले. सुमारे दिड महीन्यांनतर नाशिक चे कलेक्टर श्री मेन्सफिल्ड साहेबांचे पत्र आले. पत्रात त्यांनी समयसुचकता, दुरदृष्टी व सरकारची लाज राखल्याबद्दल त्रिवार आभार मानले. ही घटना एरंडाेल वासीयांसाठी फार माेठी बहुमानाची ठरली. त्यामुळे महाराजांचे संपुर्ण जिल्ह्यातुन तसेच सर्वत्र प्रचंड काैतुक झाले. जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना बहुमान प्रदान करण्यात आला. असेच दिवसामागुन दिवस निघुन गेले. एरंडाेलात अनेक समाजपयाेगी कामे हाेऊ लागली. बेवारशी प्रेतांचा अंतीमसंस्कार महाराज स्वत:च्या खर्चाने करु लागले. तसेच गाेरगरीबांचे लग्न, मुंज, शिक्षण ह्या सर्व समस्यांसाठी महाराज सर्वांना मदत करीत असत. काही दिवसांनी एक अतीशय गरीब जाेडपे महाराजांकडे आले. महाराज व रुक्मिणी मातेने त्यांना अन्नदान केले तसेच वाटखर्चासाठी पैसे ही दिले. तेव्हा महाराजांच्या असे लक्षात आले की ह्या बाईंना राेजच्या वापरण्यासाठी फक्त एकच साडी आहे व ती साडी देखील आता अतीशय जिर्ण झाली आहे. त्यामुळे त्या बाईंना आता त्यांची लाज झाकण्यासाठी साडीची आवश्यकता आहे. हे बघुन महाराजांनी लगेच त्या स्त्री ला रुक्मिणी मातेची भरजरी पितांबर पैठणी देऊन टाकली व राेजच्या वापरासाठी दाेन लुगडे ही दिले. असे अनेक कितीतरी चांगले कार्य महाराजांकडुन ह्या एरंडाेल नगरीत घडुन आले. असेच दिवसामागुन दिवस निघुन गेले व मामलेदारांची बदली पुन्हा अमळनेर ह्या गावी झाली. अमळनेर ह्या गावी महाराजांची बदली हाेण्याची ही तिसरी वेळ हाेती. आज खराेखरच संत सखाराम महाराज हे आपल्या भक्तांच्या नवसाला पावले हाेते कारण काही वर्षांपुर्वीच महाराजांची अमळनेरहुन जेव्हा बदली झाली हाेती तेव्हा सर्व गावक-यांनी अमळनेरचे ग्रामदैवत संत सखाराम महाराज यांच्या मंदीरात जाऊन महाराज पुन्हा येथे बदलुन येऊ दे असे साकडे घातले हाेते व आज त्यांच्या ह्या नवसाला सखाराम महाराज पावले हाेते. महाराजांची बदली एरंडाेलहुन अंमळनेरला झाली ही बातमी समजल्यावर एरंडाेल वासीय तर धाय माेकलुन रडु लागले. त्यांच्या आयुष्यात हा भयंकर प्रसंग एवढ्या लवकर येईल याची त्यांना कल्पना ही नव्हती म्हणुन जाे ताे रडतच हाेता. आता पुन्हा असा मामलेदार आमच्या गावाला लाभणे शक्यच नाही असेच जाे ताे म्हणत हाेता. महाराज सर्वांना शांत करीत हाेते व सर्वांची समजुत घालीत हाेते. सर्वांची समजुत घालुन मग महाराजांनी सर्वांचा निराेप घेतला व अमळनेरला रुजु झाले.
    अशा प्रकारे महाराजांची पुन्हा बदली हाेते व येथे चाैथा आध्याय संपताे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो.९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button