नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा

बागलाणचे आराध्य दैवत श्री. देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
दि.20/12/2023
// श्री यशवंत लिलामृत //
अध्याय ३ रा

रावसाहेब पराेपकारी/ कचेरीत व घरीदारी//

काेणी न फिरे माघारी/ एकही याचक //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने तर यशवंतराव महाराजांचे जिवनच बदलुन गेले. आता तर महाराज पुर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात अन्नदान करु लागले. त्यांचा संपुर्ण पगार हा अन्नदान व गाेरगरीब जनतेच्या गरजा पुर्ण करण्यासाठीच खर्च हाेऊ लागला काही वेळेस तर त्यांना जनतेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी कर्ज ही काढावे लागत असत. तसेच अनेक श्रीमंत, शेठ, सावकार यांच्या कडुन ऊसने पैसे ही घ्यावे लागत असे. त्यांच्या पत्नी सुंदराबाई (रुक्मिणी) ह्या देखील त्यांच्याच याेग्यतेच्या हाेत्या. त्या देखील स्वत:चा संसार बाजुला ठेवुन गाेरगरीबांच्या गरजा पुर्ण व्हाव्यात यासाठी महाराजांना मदत करीत असत. ब-याच वेळेस तर रुक्मिणीमाता स्वत: आपल्या हाताने अन्न बनवुन ते अन्न गाेरगरीबांना खाऊ घालीत असत. त्यामुळे ब-याचदा त्यांना शारिरीक कष्ट ही पडत असत पण तरीही रुक्मिणीमाता कधीही कंटाळा करीत नसत. हे अन्नदान बघुन तर संपुर्ण गाव त्यांना लक्ष्मी- नारायणाचा जाेडा असे म्हणु लागले. दिवसभर कचेरीतील कामकाज तर रात्री अन्नदान हा जणु महाराजांचा दिनक्रमच ठरला हाेता.अशातच दिवसामागुन दिवस निघत गेले अनेक लाेककल्याणकारी कामे महाराजांच्या हातुन घडु लागली. काही दिवसानंतर यशवंतराव महाराजांची बदली पारनेरहुन अमळनेर ह्या गावी झाली. अशातच एकदा रेव्हेन्यु कमीश्नर हे अमळनेरला आले असता त्यांनी कचेरीतील यशवंतरावांच्या कामकाजाची तपासणी केली असता त्यांचे कामकाज पाहुन रेव्हेन्यु कमीश्नर यांना अतीशय कुतुहल वाटले. चाेख काम वेळच्या वेळी शिस्तही कडक हे सर्व गुण पाहुन कमीश्नर साहेबांनी लगेच महाराजांची बढतीसह बदली केली. सन १८३६ साली “कर्जत” ह्या गावी महाराज “खजीनदार” ह्या पदावर काम करु लागले. पगार १५ रु. झाला. पुढे पुन्हा काही दिवसात खजीनदार पदावर केलेले चाेख काम पाहुन वरीष्ठांनी त्यांची “शिरस्तेदार” ह्या पदावर बढती (प्रमाेशन) दिली. पगार २० रु. झाला. महाराजांचा पगार वाढला तसा त्यांचा दानधर्म ही वाढु लागला. स्वत:चे संसार सुख बाजुला ठेवुन महाराज व रुक्मिणीमातेने गाेरगरीबांची सेवा करणेच आपले कर्तव्य मानले. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली हाेत असे त्या त्या गावातील लाेकांना त्यांचे हे अलाैकीक रुप बघुन आश्चर्य वाटे. असे असुनही त्यांनी लाचारी कधी पत्करली नाही. प्रामाणिकपणा कधी साेडला नाही. मदत कुणाला नाकारली नाही. विनम्रता कधी साेडली नाही. कामात देव पाहीला ताेच देव वरीष्ठ अधिक-यात व ताेच देव कनिष्ठ शिपायात देखील पाहीला. म्हणुन सर्वच स्थरातील लाेक त्यांचा आदर करु लागले. पुढे काही दिवसांनी बाप्पाजी अमृत नावाचे गृहस्थ जे खानदेशच्या कलेक्टर साहेबांचे चिटणीस हाेते, त्यांच्या प्रयत्नांतुन व प्रशंसेतुन यशवंतरावांना पुन्हा बढती मिळाली. दिनांक १६ सप्टेंबर १८४० राेजी खानदेशातील नशिराबाद तालुक्यातील “कानळदे” ह्या गावी महाराज “महालकरी” ह्या पदावर रुजु झाले. पगार ३५ रुपये झाला. नाेकरी व आध्यात्माची एक एक पायरी महाराज चढतच गेले. सन १८५१ साली पुन्हा बढती. कारण दफ्तरदार कचेरीतील रामचंद्र अंबादास ऊपाख्य हे गृहस्थ सेवानिवृत्त झाल्याने रिकाम्या जागेवर यशवंतराव महाराज “दफ्तरदार” ह्या पदावर काम बघु लागले. पगार ४५ रु. झाला. भार वाढला तसा कारभार ही वाढला. नंतर वरिष्ठांनी त्यांच्या अनेक तपासण्या घेतल्या. मात्र एकही दाेष सापडला नाही. त्यामुळे वरीष्ठांकडुन प्रशंसा ऐकू येत हाेती. सहकारी व कनिष्ठांकडुन आपुलकी व आदर मिळत हाेता. तर लाेकांकडुन श्रध्दा मिळत हाेती. श्री स्वामी समर्थांचे सुखद दृष्टांत हाेत हाेते. पत्नी रुक्मिणी देखील त्यांची सावली बनुन त्यांच्या पाठीशीच असत. माता, पिता, भावंडे व अतिथी हे देखील वारंवार येऊन यशवंतरावांकडे राहु लागले. त्यामुळे त्यांची ही सेवा घडतच हाेती. असा हा संसार व परमार्थ चालु असतांनाच नाेकरीत पुन्हा बदल. सन १८५३ मध्ये दफ्तरदार म्हणुन ऊल्लेखनीय काम केल्याचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे गेला व आदेश मिळाला ताे चाळीसगाव येथे रुजु हाेण्याचा. यशवंतराव महाराज “चाळीसगाव” तालुक्याचे “मामलेदार” झाले. साध्या कारकुन पदापासुन ते सर्वाेच्च तहसीलदार पदापर्यंत यशवंतराव महाराजांचा झेंडा फडफडत गेला. पगार ८० रुपये झाला. भार, कारभार, अधिकार व पगार यात झालेली वाढ तरीही पाठीमागे काहीही शिल्लक ठेवली नाही. येणारा सर्व पगार हा फक्त आणि फक्त गाेरगरीबांसाठीच खर्च हाेऊ लागला. आता तर महाराज तालुक्याच्या सर्वाेच्च म्हणजेच मामलेदार पदावर काम करीत हाेते. त्यामुळे तर आता गाेरगरीबांची सेवा करण्यास त्यांना अतीशय साेपे जाऊ लागले. आपला संपुर्ण अधिकार ते जनतेच्या कल्याणासाठी वापरु लागले. पुर्वी ज्या सरकारी कामाला आठ आठ दिवस लागत हाेते ते काम आता काही मिनीटात हाेऊ लागले त्यामुळे तालुक्यातील जनता महाराजांच्या कार्यकुशलतेवर खुप खुश हाेत असत. मामलेदार पद भुषवीत असतांना सचाेटी, प्रामाणिकपणा, कामाची एकाग्रता, बुध्दीची प्रखरता तसेच दुरदृष्टी समाेर ठेवुन निर्णयक्षमता व त्या अनुशंगाने मिळणारे मानसन्मान आणि मानहानीकारक प्रसंग सुध्दा सारख्याच स्थितप्रद्नतेने स्विकारणारे महाराज खराेखरच खुप महान हाेते. यशवंतराव महाराज जनतेला नेहमी सांगत असत की आपणास जे मिळते ते केवळ नारायणाच्या कृपेने. मग त्या धनाचा संचय कशाला करायचा? जे धन आपण भवीष्य काळातील लालसेपाेटी सांभाळुन ठेवताे तेच धन जर वर्तमान काळात गरीब भुकेल्या जनतेसाठी खर्च केले तर ते नक्कीच सत्कारणी लागेल. असे सांगुन त्यांना मिळणारा सर्व पगार ते जनतेसाठीच खर्च करीत असत. डाेक्याला लाल पगडी व कमरेला धाेतर असा त्यांचा शुध्द भारतीय पेहराव अनेकांना भुरळ पाडीत असत. यशवंतराव महाराज व रुक्मिणी माता यांचे संपुर्ण जिवनच एक तत्वध्नान आहे. परमेश्वराचे परमेश्वरासाठी असे त्यांचे जगणे आहे. त्यांच्यातच राहणा-या ईतर सर्व लाेकांना, ही आपल्यातच राहणारी एक व्यक्तीच आहे तरीही ती आपल्यापेक्षा वेगळी आहे असा सतत भास हाेत असे. भक्तीमार्गात रागाला जागा नाही तर विनम्रता ही अंगातच मुरावी लागते असे ते नेहमी जनतेला सांगत असत. इंग्रज सरकारची नाेकरी करीत असतांना त्यांनी यत्कींचीतही त्यांच्या संस्कृतीचा स्वत:ला स्पर्श सुध्दा हाेऊ दिला नाही. नाेकरीत लाच कधीच स्विकारली नाही. लहान, माेठे सर्वांशी महाराज विनम्रतेने च वागत.त्यामुळे लाेकांनाही ते मामलेदार असुनही अगदी जवळचे वाटत. काही लाेक तर त्यांना संत रावसाहेब असे म्हणु लागले. पुर्वीच्या काळात न्यायाधीश (जज) ची जबाबदारी ही मामलेदारास पार पाडावी लागत असत त्यामुळे एखाद्या गुन्हेगारास शिक्षा करावयाची असल्यास ती शिक्षा जर अटळ असेल तरच ते करीत व ब-याचदा शिक्षेच्या ऐवजी ते दंड करीत असत व ताे दंड भरण्यास जर ताे गुन्हेगार असमर्थ ठरला तर ताे दंड देखील महाराज स्वत: भरुन त्या गुन्हेगारास साेडुन देत असत. त्यांचे हे अलाैकीक रुप पाहुन मग ताे गुन्हेगारही महाराजांचे चरणस्पर्श करुन भावी आयुष्य हे प्रामाणिकपणे जगण्याचे त्यांना वचन देत असत. अशा प्रकारे महाराजांनी अनेक गुन्हेगारांना देखील प्रेमाच्या जाेरावर सन्मार्गाला लावले हाेते. अशातच दाेन वर्ष ऊलटुन गेले व नियमाप्रमाणे महाराजांची बदली अमळनेरला झाली. चाळीसगावचे लाेक दु:खाने हळहळले. यशवंतराव महाराज अमळनेरला रुजु झाले पगार आता १२५ रु. झाला. पुढे महाराजांना एकामागुन एक असे तीन पुत्र व एक कन्या झाली मात्र त्यांचे एकही अपत्य तीन महीन्यांपेक्षा जास्त काळ जगले नाही. म्हणुन गावातील लाेकांनाही हळहळ वाटायची. संपुर्ण गावाचे दु:ख जपणारे महाराज व रुक्मिणीमाता यांनाच जर वारंवार अशा दु:खांना सामाेरे जावे लागले तर कसे हाेईल असा प्रश्न गावक-यांना पडायचा. मात्र महाराज कधीही आपले दु:ख लाेकांना दाखवीत नव्हते. नारायणाने दिली व त्यानेच ती नेली. त्याचीच तशी ईच्छा असेल तर आपण काय करणार असे म्हणुन ते अापले दु:ख पचवुन घेत. ते रुक्मिणी मातेलाही नेहमी सांगत असत की आता हे जे गाेरगरीब लाेक आहेत त्यांनाच आपण आपले आपत्य मानुन त्यांचीच सेवा करु. मग ती माता देखील पतीचे शब्द प्रमाण मानुन आपले आपत्यहीनतेचे दु:ख बाजुला ठेवुन पुन्हा गाेरगरीबांच्या सेवेला लागत असे. एकदा असेच सकाळी स्नान आटाेपुन महाराज कचेरीत गेले असता कचेरीत नाशिकचे कमीश्नर केशव रामचंद्र जाेग खुर्चीवर बसलेले हाेते. एकमेकांना नमस्कार करुन केशव जाेग महाराजांना म्हणाले, “रावसाहेब मला क्षमा करा, मी आपला अपराधी आहे.” यावर महाराज म्हणाले, “रावबहादुर साहेब हे आपण काय म्हणता आहात? ऊलट दफ्तरात काही चुक असल्यास तुम्हीच मला माफ करा.” यावर जाेग म्हणाले, “नाही नाही रावसाहेब मी याेग्य तेच बाेलताे आहे. कारण तुमचे औदार्य, क्षमाशिलता ह्या विषयी ब-याच दिवसांपासुन एेकत हाेताे. माझ्या मनात शंका निर्माण झाली की तुमच्या ह्या गाेरगरीबांकडे जास्त लक्ष देण्याचा परीणाम हा तुमच्या मामलेदार पदाच्या कामावर हाेत असावा असे मला वाटले तसेच तुमची लाेकप्रीयता बघुन माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष व जळफळाट निर्माण हाेऊ लागली. व म्हणुन मुद्दामच मी कुठलीही पुर्वसुचना न देता काल रात्रीच तुमचे दफ्तर तपासण्यासाठी आलाे. मात्र तुमच्या कामात कुठलीही चुक मला आढळली नाही. एक तरी चुक सापडेल ह्या आशेने मी पुन्हा पुन्हा दफ्तर संपुर्ण रात्रभर तपासत हाेताे मात्र माझ्या पेंसीनीला एकही चुकीची फुली मारण्याचे भाग्य लाभले नाही. बराेबरच्या खुणा मनात नसतांनाही मारत गेलाे व अशातच पहाटे पहाटे मला झाेप लागुन गेली व त्या तंद्रीतच एक सिध्दपुरुष अजानबाहु महामानव ( अक्कलकाेटचे श्री स्वामी समर्थ) हे माझ्यासमाेर प्रकट झाले व जाेरजाेरात हसत मला म्हणाले की, “काय रे मुर्खा सुर्यप्रकाशाचे तेज तपासताेस हाेय. महामुर्ख आहेस” असे म्हणुन हसत हसतच ते अचानक गायब झाले. तेव्हापासुन तर माझ्या हृदयाचे अगदीच पाणी पाणी झाले. अपराधी पणाची भावना निर्माण झाली. आता तुम्हीच सांगा रावसाहेब मी कितीही कठीण तपस्या केली असती तरी
त्या सिध्दपुरुषाने मला असे दर्शन दिले असते का? पण माझ्याकडुन तुमचा अपमान झाला व ताे अपमान स्वर्गातील देवांनाही सहन झाला नाही म्हणुनच तर ते सिध्दपुरुष माझी कान ऊघडणी करुन गेले. हा किती माेठा चमत्कार म्हणावा” असे म्हणुन केशव जाेग यांनी महाराजांचे चरणस्पर्श करुन माफी मागीतली.
    अशा प्रकारे अनेक वरीष्ठांना देखील महाराजांच्या दैवी शक्तीचा अनुभव येऊ लागताे आणि येथे तिसरा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button