नाशिकचे राजकारण

मोदींचा रथ आडविल्यावर ही शिक्षा….


वेगवान नाशिक / wegwan nashik 

नाशिक, ता. 20 डिसेंबर 23 केंद्रीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत संकल्प यात्रा ही केंद्रा मार्फत सुरू करण्यात आले आहेत, म्हणजेच  मोदींचे छायाचित्र असलेल्या ही यात्रा गावा गावात जात आहे. अनेक गावांमध्ये हा भारत संकल्प यात्रेचा  रथ रोखला गेल्याच्या घटना घडत आहे. 

 आता जर हा रथ  रोखला तर येथून पुढे रथ रोखणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत . त्यामुळे पंतप्रधान मोदीचा हा रथ रोखणा-यांसाठी आता गुन्ह्याची शिक्षा असणार आहे. 

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

आतापर्यंत 1388 पैकी 540 ग्रामपंचायती अंतर्गत गावामध्ये ही रथयात्रा पोहोचली आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे मालेगावचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी यात्रेचा ढिसळ नियोजन होत असल्याचा सांगत प्रशासनाची ही उणीव आहे असं निदर्शनास आणून दिल्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

भारत संकल्प यात्रेचा हा रथ गावांमध्ये जात असताना काही गावामध्ये या रथयात्रेला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. देवळा तालुक्यात सात दिवस एकाही गावात रथ येऊ शकला नाही. तर निफाड व येवला तालुक्यामध्ये काही गावांमध्ये रथयात्रेला विरोध झाला.

कांद्यावरील निर्यात बंदी केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हा रथ हुसकावून लावला होता.  अशी बाब  समोर आल्याने केंद्र सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून यात्रेचा आयोजन केला आहे, मात्र त्यास विरोध होत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी  जलद शर्मा यांनी याची दखल घेऊन रथ रोखणा-यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button