नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा

बागलाणचे आराध्य दैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांची चरित्रगाथा


//देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज चरीत्र//

// श्री यशवंत लिलामृत //

अध्याय २ रा

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

तुझे कारणी देह झिजावा/
घडु दे तुझी सर्वांगी सेवा//
स्वामी समर्था देवाधी देवा/
काही दुजे नकाे//

साेलापुर जिल्ह्यातील पंढरपुर तालुक्यातील ‘भाेसे’ हे गाव. ह्या गावाचे वतनदार श्री महादेव नारायण कुलकर्णी (भाेसेकर) व त्यांच्या पत्नी हरीदेवी हे दाेघ ब्राम्हण पती पत्नी आपल्या संसार सुखात रमले हाेते. पुढे काही दिवसांनी हरीदेवीला दुसरे अपत्य हाेण्याची चाहुल लागली. त्यामुळे हरीदेवी आपल्या माहेरी पुणे येथे आल्या. पुण्यात शनीवार पेठेतील ओंकारवाडा येथे बाळाजी मकाजी वाजपे म्हणजेच हरीदेवींचे वडील राहत हाेते. ह्याच ठिकाणी भाद्रपद महीन्यात शुध्द दशमी ह्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक १३ सप्टेंबर १८१५ राेजी सुर्याेदयाच्या वेळी श्री यशवंतराव महाराजांचा जन्म झाला.यशवंतराव महाराजांचे व्यक्तीमत्व हे अतीशय प्रभावशाली हाेते. यशवंतराव महाराजांच्या आजाेबांच्या मनातील ब-याच दिवसांपुर्वीच्या ईच्छा ह्या एकामागुन एक अशा प्रकारे पुर्ण हाेत गेल्या की आपल्या लेकीच्या ह्या तेजस्वी बालकाचाच हा पायगुण असावा असा विचार करुन त्यांनी नातवाचे नाव ‘यशवंत’ ठेवले. पुढे काही दिवसांनी हरीदेवी मुलगा यशवंत यासह आपल्या सासरी म्हणजेच भाेसेगावास आल्या. यशवंतरावांचे वडील महादेव यांनी आनंदाेत्सव साजरा करण्यासाठी संपुर्ण गावास अन्नदान केले. यशवंताच्या बाललीला पाहुन संपुर्ण घरात आनंदी आनंद हाेऊ लागला. असेच काही दिवस भाराभर निघुन गेले. बाळ यशवंत हळुहळु वाढु लागला. तीन वर्षाचा झाल्यानंतर यशवंताचे जावळ काढण्यात आले. यशवंताच्या बाललीला ह्या देवपुजेशीच निगडीत हाेत्या. घरातील वडीलधा-या माणसांप्रमाणेच लहान बालकांवर परीणाम हाेत असतात. यशवंतरावांवर देखील तेच संस्कार झाले. वडील महादेवपंत राेज भल्या पहाटे स्नान आटाेपुन देवपुजेस बसल्यावर यशवंत देखील त्यांच्या मांडीवर येऊन बसत असत. त्यामुळे यशवंतला अगदी लहानपणापासुनच अतीशय चांगले संस्कार मिळत गेले. देवपुजा आटाेपल्यानंतर घरातील सर्व वडीलधा-या व्यक्तींचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेणे हा दिनक्रमच ठरला. लहान लहान मुलांमधे यशवंत खेळु लागला.       खेळतांना काही खाेडकर मुले यशवंताशी मुद्दाम भांडत. मात्र हे भांडण एकतर्फीच असे. कारण कुणी जर यशवंताशी भांडु लागले तर यशवंत हा फक्त शांतपणे ऐकुण घेत असत व कुणालाही ऊलट ऊत्तर देत नसे. म्हणुन भांडखाेर मुलेही यशवंतापुढे मवाळ हाेत असत. बाळ यशवंत आता आठ वर्षाचा झाला. ताे आता शाळेत जाऊ लागला. यशवंत आभ्यासातही खुप हुशार हाेता. गरीब विद्यार्थ्यांस मदत करण्यास ताे तत्पर असे. कुणाकडे कागद, पेन नसल्यास यशवंत आपल्या जवळील वस्तु त्यांना देऊन टाकत. शालेय शिक्षणा बराेबरच कुलकर्णी पणाचे काम ही ताे शिकला. शाळेतील अनेक मित्रांचे वाद व तंटे ताे अतिशय सामंजस्याने मिटवीत असे व त्यांना भक्तीमार्गाला लावत. हेमाडपंथी माेडी लिपीतील त्याचे सुवाच्च अक्षर अनेकांना माेहुन टाकीत असत. आभ्यास, कुलाचार व ईश्वरभक्ती यात गढलेला यशवंत हा दिवसेंदिवस गंभीर दिसु लागला. चेह-यावरील तेजपुंज भाव, तेजस्वी नेत्र, सुडाैल बांधा व गुडघ्यापर्यंत लांब हात यामुळे पाहणा-या प्रत्येकाला ताे कुणी देवलाेकीचा पुण्यात्मा असावा असे वाटे.किशाेरवयात आल्यानंतर टेंभुर्णीच्या जिवाजी बापुजी देशपांडे यांनी यशवंत ला बघीतले व त्यांच्या मनात लगेच ह्या तेजस्वी मुलास आपला जावई करावे ही ईच्छा प्रकट झाली. त्यांनी लगेच भाेसेगाव गाठले व महादेवपंतांना आपल्या मनातील विचार बाेलुन दाखवीला. महादेवपंतांनाही हा विचार आवडला व त्यांनीही मनात विचार केला की यशवंत आता बारा वर्षांचा झाला आहे त्यामुळे संसार सुखातच त्याने पडलेले बरे हाेईल त्यामुळे त्यांनी लगेच हाेकार देऊन टाकला. लवकरच फाल्गुन महिन्यातील षष्ठी ह्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक १५ मार्च १८२७ ह्या दिवशी गाेरज मुहुर्तावर यशवंताचा विवाह जिवाजी देशपांडे यांची कन्या सुंदराबाई यांच्याशी टेंभुर्णी जिल्हा साेलापुर ह्या गावी झाला. सुंदरा त्यावेळी सहा वर्षांची हाेती. सुंदराचे नाव सासरी रुक्मिणी ठेवण्यात आले. दाेघांचा संसार सुखात सुरु झाला. पुढे काही दिवसांनी यशवंताचे मामा नारायणराव वाजपे हे भाेसेगावास काही कामानिमीत्ताने आले तेव्हा यशवंताचे माेत्यासारखे सुंदर हस्ताक्षर पाहुन कुतुहल वाटले. तसेच यशवंतच्या हुशारपणाची ही त्यांना कल्पना आली. त्यांनी लगेच आपली बहीण हरीदेवी व महादेवपंतांना सांगीतले की, “तुम्ही यशवंतला भटजीगीरीत किंवा कुलकर्णी पणात अडकवु नका. त्याच्याजवळ एक माेठा अधिकारी बनण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत. मी ऊद्या लगेच त्याला काेपरगावी घेऊन जाताे व नाेकरीसाठी प्रयत्न करताे.” त्यांचे हे बाेल एेकुण हरीदेवी व महादेवपंतांनी लगेच हाेकार दिला. दुस-या दिवशीच यशवंत मामांबराेबर जाण्यास निघाला. त्याने आई वडीलांचा आशिर्वाद घेतला व त्याची नजर लगेच पत्नी रुक्मिणी कडे गेली. त्यावेळेस रुक्मिणी आठ वर्षांची हाेती. लहान असल्याने पती ला नाेकरी निमीत्ताने बाहेरगावी जाण्याचे बघुन तीला फार काही विशेष वाटले नाही मात्र यशवंताला गहीवरुन आले. लवकरच म्हणजे सन १८२९ मध्ये यशवंतला मामा नारायणरावांच्या खटपटीने व नाशिकचे त्यावेळेसचे कलेक्टर श्री बदादुर साहेब यांच्या प्रयत्नाने “येवला” ह्या गावी सरकारी खात्यात महसुल विभागात “कारकुन” ह्या पदावर तात्पुरत्या स्वरुपात नाेकरी मिळाली. पुढे दाेन वर्षांनंतर सन १८३१ मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब येवला येथे आले असता त्यांनी सहज यशवंतरावांच्या कामकाजावर नजर फिरवली असता त्यांचे चाेख काम पाहुन यशवंतरावांना दरमहा १० रुपये पगारावर कायम (पर्मनंट) करुन घेतले. पुढे यशवंतराव गाेरगरीबांची सेवा करु लागले. गाेरगरीबांचे हाल अपेष्टा पाहुन त्यांचे हृदय पिळवटुन जाई. म्हणुन यशवंतरावांनी लगेच निर्णय घेतला की आजपासुन आपल्याला मिळणारा सर्व पगार हा गरीब जनतेच्या गरजांसाठीच खर्च करायचा व त्याप्रमाणे ते करु ही लागले. पुढे यशवंतरावांची बदली पारनेर ह्या गावी झाली. नाेकरी निमीत्ताने नेहमीच परगावी रहावे लागणार हाेते. त्यामुळे यशवंतरावांना एकटे राहील्याने खाण्यापिण्याचा त्रास हाेऊ नये म्हणुन त्यांच्या आईने त्यांची पत्नी रुक्मिणी हीस पतीसाेबत पारनेर ला पाठवीण्याचे ठरवीले. पत्नी रुक्मिणी आल्याने यशवंतरावांना गाेरगरीबांची सेवा करण्यास अधिक सुलभ हाेऊ लागले. कारण रुक्मिणीदेवी देखील त्यांच्याच याेग्यतेच्या हाेत्या. त्या देखील पतीच्या कार्यात अगदी समर्थपणे त्यांना साथ देत असत. असा हा त्यांचा संसार अगदी गुण्यागाेवींदाने सुरु हाेता. अशातच एके दिवशी यशवंतराव रात्री झाेपले असता त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की एक तेजस्वी महापुरुष समाेर बसलेले दिसले. अजानुबाहु दिगंबर, डाव्या मांडीवर ऊजवी मांडी ओढुन धरलेली. पायांचे तळवे मात्र जमिनीला टेकलेले. भव्य कपाळ, हि-याप्रमाणे चकाकणारे नेत्र, भेदक नजर. ते महापुरुष म्हणाले – “बेटा घबराओ नही. ये लाे काम की चीज” एक शाळीग्राम (काळा दगड) यशवंतरावांच्या हातावर ठेवुन म्हणाले – “ईसकी भक्तीभाव से पुजा करना. तुम्हारी हर मनाेकामना पुरी हाेगी” असे म्हणुन ते लगेच अंतर्धान पावले. यशवंतरावांना लगेच जाग आली. बघतात तर काय? त्यांच्या हातात खरच शाळीग्राम हाेता.
   यशवंतरावांना लगेच कळुन चुकले की हे स्वप्न नसुन प्रत्यक्ष देवानेच आपल्याला साक्षात्कार दिला. त्या दिवसापासुन त्यांनी ताे शाळीग्राम दरराेजच्या देवपुजेत ठेवुन राेज त्याची पुजा करु लागले. अशातच काही दिवसांनी पुन्हा एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की ते महापुरुष सांगतात की, “ताे शाळीग्राम घेऊन आमच्या भेटीस यावे. सध्या आम्ही मंगळवेढा ह्या गावी वास्तव्यास आहाेत” आता मात्र यशवंतरावांनी क्षणाचाही विलंब न करता मंगळवेढ्याचा रस्ता धरला. मंगळवेढे जसजसे जवळ येऊ लागले तसतशी यशवंतरावांची तळमळ वाढु लागली. अनेक प्रश्नांचे काहुर त्यांच्या मनात माजु लागले अशातच ते मंगळवेढ्यास पाेहचले व तपास करत करत ते एका वाड्यात आले. समाेरच स्वप्नात दिसणारे ते महापुरुष प्रत्यक्षात त्यांना बसलेले दिसले. तेच सिध्दासन, तीच भेदक नजर, तेच भव्य कपाळ. ते महापुरुष म्हणजेच अक्कलकाेटचे श्री स्वामी समर्थ महाराज हाेय. त्यांना बघुन तर यशवंतरावांचे देहभान हरपले. त्यांच्या ताेंडातुन एक शब्द ही फुटेना. अखेर यशवंतरावांना समाेर बघुन स्वामी म्हणाले – “काय रे ताे शाळीग्राम आणलास काय?” यशवंतरावांना लगेच अंतरीची खुण पटली व त्यांनी लगेच ताे शाळीग्राम काढुन स्वामींच्या पुढे ठेवला आणि स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवुन आशिर्वाद मागु लागले. स्वामी समर्थांनी यशवंतरावांच्या कपाळावर हात ठेवला. यशवंतरावांना लगेच शांत वाटु लागले. मध्येच वीज चमकल्याचा भास झाला व लगेच स्वामी समर्थांच्या रुपात त्यांना प्रत्यक्ष दत्त दिगंबर दिसु लागले. व लगेच त्यांना त्यांचा मागचा जन्म दामाजीपंतांचा अवतार आठवु लागला. यशवंतराव महाराज पुन्हा स्वामींच्या चरणावर डाेके ठेवुन रडु लागले व म्हणाले की, “देवा आज मी देवमय झालाे. स्वामीमय झालाे. अनाथाचा सनाथ झालाे. हाेय देवा आज मी कृतार्थ झालाे” त्यांच्या बाेलण्याने स्वामी समर्थ जाेरात हसले व म्हणाले, “ए आज तु मला फार देव देव म्हणताे आहेस हं! थाेड थांब एक दिवस असा येईल की तुझ्या हातुन असे काही कार्य घडेल की भुतलावरील सर्व लाेक तुलाच देव म्हणतील”. असा आशिर्वाद स्वामी समर्थांनी यशवंतरावांना दिला. स्वामींचा आशिर्वाद घेऊन यशवंतराव महाराज आपल्या नाेकरीच्या ठिकाणी म्हणजेच पारनेरला पाेहचतात आणि येथे दुसरा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – श्री दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदौर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button