नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा

बागलागचे आराध्य दैवत श्री.देवमामलेदार यांची चरित्रगाथा


वेगवान नाशिक/ अतुल सुर्यवंशी

//देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज चरीत्र//

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १

लाभुतली पाप कर्मात/ लाेक पैसा घालवीतात/

धर्मभक्ती दुर लाेटतात / निज भाेग स्वार्था लागुनी //
तरी दामाजीपंता पुन: तुम्ही अवतार घ्यावे / आणि भु लाेकी जावे/
भुतदया शिकवावे / अजुन सकल जना //

संतांचे अवतार ही काळाची गरज असते. युगानुयुगे संतांनी वेळाेवेळी जन्म घेऊन समाज प्रबाेधन केले व आपला धर्म, संस्कृती यांचा प्रसार करुन जनतेच्या माध्यमाने आजपर्यंत हा वारसा जपुन ठेवलेला आहे.
पुढे ईंग्रजांनी भारतावर आक्रमण केले व संपुर्ण देश ताब्यात घेतला. साहजिकच ईंग्रजांच्या सत्तेबराेबर त्यांची संस्कृती देखील हळुहळु भारतात रुजु लागली. त्यामुळे भारतीय संस्कृतीला मरगळ आली. माणसातील दुर्गुणांचे सामुहिक बळ वाढले की मग सामुहिक अनिष्ठ फळही भाेगावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. संपुर्ण भारतीयांच्या आप आपसातील भांडणामुळे व स्वार्थामुळेच मुठभरच पण व्यवहारी ईंग्रज हे भारताचे राज्यकर्ते झाले. त्याचा फायदा ईंग्रजांनी धुर्तपणे घेतला. ईंग्रजांबराेबरच त्यांचे आचार विचार व संस्कृती भारतात आली. ईंग्रजांना भारत देश चालवीण्यासाठी नाेकरांची गरज पडु लागली त्यामुळे भारतीयांनाच नाेकर बनवीण्याचे त्यांनी ठरवीले. त्यामुळे ऊच्च पदांवर ईंग्रज अधिकारी व निम्नस्तरावर भारतीय नाेकर अशी रचना ईंग्रजांनी तयार केली. राज्यसेवेसाठी नाेकर तयार करणे ह्या हेतुने ईंग्रजांनी भारतात शिक्षणाची साेय केली. त्यामुळे अनेक शिक्षीत भारतीय सरकारी नाेकर झाले. ह्या शिक्षीतांचा संबंध ईंग्रजी संस्कृतीशी अगदी जवळुन येऊ लागला. कुतुहल व अनुकरण यामुळे ते ईंग्रजी आचार विचार यांचा अंगीकार करु लागले. पाेशाख, बाेलण्याची, लिहीण्याची पध्दत यांमधे ईंग्रजीपणा येऊ लागला. श्रीयुत साेनवणे एेवजी मिस्टर साेनवणे म्हणण्यात साहस वाटु लागला. मग संमीश्र संस्कृती निर्माण झाली. निम्मा पाेशाख भारतीय व निम्मा ईंग्रजी. कमरेचे धाेतर तसेच राहीले पण वर मात्र साहेबी काेट आला. एका बाजुला ईंग्रज साहेबांशी संबंध तर दुस-या बाजुला गरीब भारतीय जनतेबराेबर संपर्क असा हा सुशीक्षित भारतीय नाेकरवर्ग ईंग्रज साहेबांच्या सानीध्यात
राहील्याने त्यांच्यातही आता बदल हाेऊ लागला. देव, धर्म ह्या सर्व गाेष्टी आता त्यांना थाेतांड वाटु लागल्या. तर मग काय? अशिक्षीत व गरीब जनतेचा धर्म व श्रध्दा ह्या त्या शिक्षीतांना अंधश्रध्दा वाटु लागल्या. त्यांना असणारा थाेडा बहुत अधिकार यामुळे स्वत:ला ईतर जणांपेक्षा श्रेष्ठ समजुन स्वत: भारतीय असुन देखील भारतीय गरीब अशिक्षीत जनतेबद्दल त्यांची तुच्छतेची भावना हाेऊ लागली. आपल्याच गरीब देशबांधवांना हे सुशिक्षीत लाेक तुच्छतेने वागवु लागले. मग हळु हळु आध्यात्म, धर्म, संस्कृती ह्या गाेष्टींचा मानव जातीला विसर पडु लागला.
अशा प्रसंगी पुन्हा एकदा आध्यात्म, धर्म, संस्कृती हे सर्व जगाला स्वत:च्या ऊदाहरणावरुन पटवुन देणा-या महापुरुषाची गरज निर्माण झाली व ही गरज लक्षात घेऊनच देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी धरतीवर
जन्म घेतला व भारतीयांबराेबरच ईंग्रजांना देखील आपली भारतीय संस्कृती दाखवुन दिली व येणारे एक भयानक संकट हद्दपार झाले.
माेगल राजवटीत मंगळवेढ्याचे संत श्री दामाजीपंत यांनी मंगळवेढा ह्या परीसरात दुष्काळ पडला असता दामाजीपंतांनी धान्याचे काेठार भुकेल्या जिवांसाठी ऊघडे केले त्यावेळेस त्याची भरपाई स्वत: विठ्ठलाने केली हाेती असा पुर्वीचा ईतीहास घडला हाेता. माेगलांच्या राजवटीत दामाजीपंतांनी अनेक लाेककल्याणकारी कामे केली व लाेकांना सन्मार्गाला लावले हाेते तसेच त्यांच्या जिवनात चमत्काराचे ही अनेक प्रसंग घडले हाेते. आपले
पराेपकाराचे व्रत पुढे चालु रहावे यासाठी पुन्हा एकदा त्यांनी भगवान श्री विठ्ठलाच्या आद्नेप्रमाणे ईंग्रजांच्या राजवटीत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या रुपाने धरतीवर जन्म घेतला. भगवान विठ्ठल दामाजीपंतास सांगतात की, “भुतलावर लाेक पाप कर्मात पैसे वाया घालवीत आहेत त्यामुळे धर्म व भक्ती यांचा -हास हाेताे आहे. त्यामुळे तु पुन्हा अवतार घ्यावा व लाेकांना सन्मार्गाला लावावे त्यांना धर्म कार्य समजवावे. एकीकडे काही लाेकांकडे खुप पैसा आहे तर दुसरीकडे काही लाेकांकडे एका वेळचे पुरेसे अन्न देखील नाही. त्यामुळे तु सर्वांमुखी अन्न घालावे. व लाेकांमधे धर्म व संस्कृती रुजवावी.” यावर दामाजीपंत म्हणतात की, ” हे ईश्वरा हे कार्य तर अती कठीण आहे. कारण ह्या सर्व जणांना तृप्त करण्यासाठी मला धन, पैसा, द्रव्य ई. ची भरपुर प्रमाणात गरज पडेल व त्यासाठी तु जर मला धनवान केले तर लाेक काय म्हणतील हा धनवान आहे म्हणुन दानधर्म करताे त्यात नवल काय? मग अशाने लाेकांमधे भुतदया कशी पसरेल?” यावर भगवान विठ्ठल म्हणतात की, “दामाजीपंता सावधान ! मी काही तुला धनवान वैगरे करणार नाही तर तु एक सामान्य मनुष्य म्हणुनच जन्म घ्यावास व जे लाेक पाप कर्मात पैसा वाया घालवीत आहेत त्यांना तु तुझ्या
सत्कार्याने स्वत:च्या ऊदाहरणावरुन जनसेवेचा मार्ग दाखवावा. असे केल्याने जे पाप मार्गाने लाेकांनी धन गाेळा केले आहे ते पुण्य मार्गाकडे जाईल व गाेरगरीबांचे दारीद्र्य नाहीसे हाेईल.”. यावर दामाजीपंत म्हणतात,
“ठिक आहे देवा पण मी जन्म कुठे घेऊ?” यावर विठ्ठल म्हणतात की, ” अरे आपल्या पंढरपुर जवळच ‘भाेसेगाव’ आहे. तेथे महादेव कुलकर्णी नावाचा वतनदार आहे ताे माझा फार माेठा भक्त आहे. त्याच ब्राम्हण कुटुंबात त्यांच्याच कुशीत तु जन्म घ्यावास.”दामाजीपंत म्हणतात. “जशी आपली ईच्छा.” आणि अशा प्रकारे देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा जन्म हाेताे आणि येथे पहीला आध्याय संपताे.
क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे. उज्जैन (ईंदाैर.)

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो.९९७५२७७९४३.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button