शेती

Rain Update येत्या काही तासामध्ये गारपीट व जोरदार पावसाचा इशारा

मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचे मोठं नुकसान झालयं, आता पुन्हा हवामान विभागाकडून गारपीट व मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलायं.


वेगवान नाशिक / Wegwan Nashik 

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 23 चक्रीवादळ मिचॉन्गने  वातावरण साफ झाल्यानंतर उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने थैमान घातले आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये गारपीट व  मोठ्या पावसाचा इशारा दिलायं

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 ते 17 डिसेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, केरळ आणि  16 ते 18 डिसेंबर आणि लक्षद्वीपमध्ये 17 ते 18 डिसेंबरपर्यंत पावसाची अपेक्षा आहे. काही भागात पावसाचा अंदाजही आहे. जोरदार वाऱ्यासह हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलायं

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण असून, पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. याउलट, दिल्लीच्या तापमानात घट झाल्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके अपेक्षित आहे. हवामान खात्याने नोंदवले आहे की धुक्याचा प्रभाव उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये वाढू शकतो.

महाराष्ट्राच्या हवामानाचे काय?

केरळच्या काही भागांमध्ये गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज आहे., महाराष्ट्रालाही याचा फटका बसू शकतो. पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button