Life StyleNashik Businessआर्थिकखेळनाशिक क्राईमनाशिकचे राजकारण

5 वी ख्रिस्ती हक्क परिषद संपन्न

रिजनल ख्रिश्चन सोसायटी,नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व जय भारती सामाजिक संघटनेचा पुढाकार


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक, अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव  9 डिसेंबर 2023ः  पुणे रोजी 5 व्या ख्रिस्ती हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.समाजाच्या संविधानिक,सामाजिक,राजकीय हक्कांच्या संदर्भात व ध्येय धोरणे ठरवण्यासाठी ख्रिश्चन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.ख्रिस्ती समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व मिळायला हवे असे मत बिशप थॉमस डाबरे यांनी यावेळी व्यक्त केले.परिषदेचे अध्यक्षपद बिशप अँड्रू राठोड यांनी भूषविले. त्यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपली चळवळ ही ख्रिश्चनांचे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी असून ती संविधानावर आधारित आहे.बहुजन समाज,दलित समाज,अल्पसंख्यांक अशा सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबर आपण काम करीत राहू.राजकीय प्रतिनिधीत्वामध्ये ख्रिश्चनांना संधी मिळावी,अँग्लो इंडीयन खासदारकी, विधानसभा सरसकट ख्रिस्ती बांधवांना द्यावी,मदर तेरेसा यांचे नावाने स्वतंत्र महामंडळ मिळावे,अल्पसंख्यांकांकरीता असलेल्या बजेटमध्ये भरीव वाढ करावी.कुठल्याही पक्षाने ख्रिश्चन समाजाला गृहीत धरू नये,येणाऱ्या निवडणुकांमध्ये समाज ठोस भूमिका घेईल,ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा अजून तीव्र करण्यात येईल असे रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे प्रशांत केदारी यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात सांगितले.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

परिषदेमध्ये ख्रिस्ती समाज नेते विजय बारसे यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.स्टेला गोडे यांचा शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

IPS रहमान यांनी ख्रिश्चनांनी शिक्षण, आरोग्य,सामाजिक कामात देशासाठी मोठे योगदान दिले आहे.मुस्लिम व ख्रिस्ती बांधवानी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले.पोप फ्रान्सिस यांनी पॅलेस्टाईनच्या बाबतीत शांततेचे आवाहन केले ही खूप मोठी बाब आहे असे सांगितले.प्रशांत केदारी यांच्या चळवळीला मुस्लिम समाजाचा संपूर्ण पाठिंबा राहील असे सांगितले.

प्रवीण गायकवाड यांनी ख्रिश्चन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे.लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे.यासाठी सध्याचे राजकारण समजून घ्यावे लागेल व त्यासाठी मोर्चे बांधणी करणे गरजेचे आहे असे सांगितले.राहुल गायकवाड यांनी दलीत समाजाने रस्त्यावर उतरून हक्काची लढाई जिंकली त्याच प्रमाणे प्रशांत केदारी यांनी चळवळ उभी केली आहे असे सांगितले.नॅशनल कॉफरन्स फॉर मायनॉरीटीला बिशप थॉमस डाबरे आणि बिशप अनिल कुटो यांनी खूप मदत केली असे आवर्जून सांगितले. बाबा खरात म्हणाले की,चळवळ ही सातत्याने चालू राहिली पाहिजे,आव्हाने स्वीकारून पुढे चालले पाहिजे.फादर ज्यो गायकवाड यांनी प्रार्थना करून परिषदेला शुभेच्छा दिल्या.

परिषदेत ठरावाचे वाचन ऍड.आंतोन कदम यांनी केले.संविधान वाचन प्रतिमा केदारी यांनी केले.सूत्रसंचालन जॉन मुंतोडे व अर्चना बोर्डे यांनी केले. मार्कस पंडित यांनी आभार मांडले. राष्ट्रगीताने परिषदेची सांगता झाली. यावेळी विजय बारसे,माजी पोलीस महासंचालक अब्दूर रहमान,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाले, जमात ए इस्लामचे झुबेर मेमन,ख्रिश्चन फोरमचे राजेश केळकर,फा.ज्यो गायकवाड,संजय गायकवाड,सिस्टर आरकेंजल,युक्रांदचे संदीप बर्वे, ऍड.असुंता पारगे,स्टीव्हन गोडे, निशिकांत चांदेकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,आम आदमी पक्षाचे विजय कुंभार,सुदर्शन जगदाळे, रेन्झील युथचे सुधीर हिवाळे,पास्टर डॅनियल,सुधाकर सदाफळ,मार्कस पंडित,प्रमोद पारधे,जॉन फर्नांडिस,  फेबियन सॅमसन,मेरी पारगे,आलीस लोबो,सलामी तोरणे,अल्फान्सो रेफेन्स, सचिव अंतोन कदम,जॉन मंतोडे,रतन ब्राम्हणे,अविनाश भाकरे,जॉन फर्नांडिस,रॉनी दिकॉस्ता,पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button