नाशिक ग्रामीण

Export Onion बाजार समिती बंद ठेवणा-या व्यापा-याचे परवाने रद्द होणार

Onion Export केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती, त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.


वेगवान नाशिक / Wegwan Nashik 

नाशिक, ता. 10 डिसेंबर 23 -Onion Export केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती, त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.

कांदा निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) सहकार विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार असा इशारा सहकार विभागाने दिला आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी बाजार समित्यांना सहकार विभागाने पत्र लिहिले आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

जिल्ह्यात जवळपास 60 ते 70 टक्के व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण  सहकार विभागाने नोंदवले आहेत.  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळला. मात्र यावेळी नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार काय मध्यममार्ग काढणार याकडं लक्ष लागलय.सहकार विभागाने  सर्व जिल्ह्यातील परिस्थिती जाणून  घेतला आहे.

मरण फक्त शेतक-याचे 

शेतमालावर ‘निर्यात बंदी’ लादण्यात आल्याने शेतकरी बिकट परिस्थितीला सामोरे जात आहेत. आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे कांद्याचे लासलगाव हे नाशिक जिल्ह्यात आहे. प्रतिकूल हवामान आणि गारपिटीमुळे जवळपास 80 टक्के कांद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. केवळ 20 टक्के कांद्याचे पीक जगू शकले आहे.

विशेषत: लाल कांद्याला प्रति क्विंटल 4 ते 4.5 हजार रुपये समाधानकारक भाव मिळत असल्याने उर्वरित कांद्याच्या विक्रीतून किमान त्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल असा आशावाद शेतकरी व्यक्त करत होते. मात्र, केंद्र सरकारने नुकताच ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने उर्वरित कांदा आता कमी भावात विकावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कांद्याची लवकर विक्री झाली नाही, तर शेतातच असलेला शेतमाल टाकून द्यावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, कारण ते कांदा विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button