नाशिक क्राईम

Sharad Pawar कांद्याच्या आंदोलनात भारताच्या केंद्रीय मा. कृषीमंत्र्यांची उडी Onion export ban

Sharad Pawar's protest against onion export कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे सर्व खापर हे केंद्र सरकारवर फोडल्या गेलं आहे. कारण शेतक-यांचा कांदा कोठे बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आणि शासनाने निर्यांत बंदी केली तिही 31 मार्च पर्य़ंत म्हणजे तो पर्यंत कोणाचा कांदा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे देशाची माजी कृषीमंत्री स्वता शरदचंद्र पवार हे रास्तोरोको मध्ये सहभागी होणार आहे.


वेगवान नाशिक / WEGWAN NASHIK

साहेबराव ठाकरे ( वेगवान हेड ) 

चांदवड, ता. ( नाशिक) 9 डिसेंबर 23 – Onion export ban, India’s former agriculture minister Pawar’s jump in the onion movement  कांद्याचे निर्यात बंदी झाली आणि भाव एकदम कोसळले यामुळे शेतकरी प्रचंड संतापलेले आहेत. 3500 ते 4000 रुपये विकणारा कांदा अवघ्या बाराशे रुपये येऊन ठेपल्यामुळे नाशिक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात ठीक ठिकाणी शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केलं, मात्र, आता या आंदोलनाची धार अधिकच तीव्र होणार आहे कारण 11 तारखेला म्हणजेच 11 डिसेंबरला भारताचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या आंदोलनामध्ये उडी घेत आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून 11 डिसेंबरला सोमवारी चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये खास उपस्थिती असणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांची, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कांद्याच्या आंदोलनाकडे लागणार आहे. कांद्याची निर्यात बंदी हा शेतक-यांसाठी डोके दुखीचा विषय ठरला आहे.

कांद्याची निर्य़ात बंदी झाली आणि भाव 1200 रुपयांवर आल्यामुळे हे आंदोलन आता रौद्र रुप धारण करण्याच्या मार्गावर आहे. त्यात आता स्वता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे उतऱणार असून ते चांदवड मध्ये येऊन मुंबई -आग्रा हायवे अडविणार आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामधून निर्यात बंदी विरोधात हे आंदोलन आता जोर पकडणार आहे. यामुळे येथून पुढे याची धार अजूनचं तीव्र होत जाणार आहे.  या आंदोलनाला शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. शेतक-यांचे कैवारी शरदचंद्र पवार हे स्वता उपस्थित राहत असल्यामुळे हे आंदोलन तीव्र होणार यात शंका नाही.

कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी हटली पाहिजेत, अश्या शेतक-यांच्या मागण्या घेऊन हे आंदोनल छेडल्या जाणार आहे. यामध्ये सर्वात चांदवड मध्ये मुंबई -आग्रा हायवे रोखून हे आंदोलन सुरु होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार हे महायुतीमध्ये आहे तर इकडे राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र  पवार हे सरकारच्या विरोधात  रस्त्यावर उतरणार आहे. या आंदोलनाकडे असंख्य शेतकऱ्यांचे लक्ष  लागून राहिले आहे.

व्यापा-यांनी बेमुदत लिलाव बंद करण्यामागील  कारणे

कांद्याची निर्यात बंदी झाल्याचाआदेश हातात पडल्यानंतर व्यापारी वर्ग सावध भूमिका घेतो, ज्या वेळेस बाजार समितीमध्ये लिलाव सुरू होतात त्यावेळेस कांद्याचे लिलाव हे कमी बोलीने पुकरले जातात, कमी कांद्याचे बोली पुकारल्यामुळे शेतकरी लिलाव बंद पाडतात आणि लिलाव बंद पडल्यानंतर व्यापारीही बाजार समितीचे लिलाव बेमुदत काळासाठी बंद राहतील असा पवित्रा घेतात.

यामागील कारण असे आहे व्यापाऱ्यांनी या अगोदर मोठ्या प्रमाणात कांदा खेरदी केलेला असतो. तो त्यांच्या  शेड वरती (खळे )  साठवलेला असतो. कारण तो कांदा महागड्या भावाने खरेदी केलेला असतो. जेंव्हा निर्यात बंदीचा आदेश येतो. तेंव्हा व्यापारी हे अंदाज बांधतात की आपल्याकडे किती माल (कांदा )  शिल्लक आहे. आणि किती दिवसात आपण तो माल (कांदा ) बाहेर पाठवू शकतो, तो पर्य़ंत आपण कांदा मार्केट बेमुदत काळासाठी बंद ठेवू असा सावध पवित्रा घेतांना दिसतात.  व्यापारी  वर्ग आपल्या बाजूने सेफ्टी राहावा म्हणून कांद्याचे लिलाव बेमुदत काळासाठी बंद करतात आणि आपल्याकडील माल संपल्यानंतर कांदा मार्केट ज्या भावाने निघेल त्या भावाने जेंव्हा मार्केट सुरु होईल तेंव्हा खरेदी करतात.

शेतक-यांचा असा होतो तोटा

कांद्याची लिलाव बेमुदत काळासाठी बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा  मोठ्या प्रमाणात साठवला जातो. शेतकऱ्यांकडे साठवलेला कांद्यामुळे बाजार समितीमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक होते आणि ही आवक झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची चांगल्याच पद्धतीने उचल बांगडी केल्या जाते, कारण या दरम्यान शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाला कमी भाव मिळतो कारण आवक वाढते आणि आवक वाढल्याचे कारण दिल्यामुळे तो कांदा अजून कमी भावाने खरेदी केला जातो सांगण्याचं तात्पर्य असं यामध्ये काहीही असो बंदूक ही मात्र शेतकऱ्यांच्याच खांद्यावर आहे हे मात्र निश्चित.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button