नाशिक क्राईम

onion collapsed कांद्याचे भाव कोसळले, फक्त 1200 रुपये मिळाला कांद्याला भाव व्हिडीओ

The price of onion collapsed, the price of onion was only 1200 rupees


वेगवान नाशिक / अमोल मसरुप 

चांदवड, ता. 8 डिसेंबर 23 The price of onion collapsed, the price of onion was only 1200 rupees महाराष्ट्रातील कांद्याचे भाव कोसळल्यामुळे ठीक ठिकाणी  कांद्याचे लिलाव बंद करून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेलं आहेत .

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड उमराणे पिंपळगाव बसवंत लासलगाव विंचूर या ठिकाणी कांद्याला अवघा बाराशे 1200 रुपये कांद्याला भाव मिळाला,यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग  रोखून धरलेला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड येथे शेतकऱ्यांनी मुंबई महामार्ग रोखला आहेत.  तसेच उमराणा येथे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी एक तासापासून  मुंबई आग्रा महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहेत.  कांद्याला 4000  ते  3500 रुपये दर मिळत होता. अचानक भाव पडल्यायामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.

30 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी करण्यात आली आहे.  त्यामुळे कांद्याचे भाव वेगवाने खाली आले आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.  शेतकरी यातून कसा बाहेर येणार हा एक मोठा  प्रश्न आहे. कांद्याचे भाव प डल्यामुळे शेतक-यांनी मोदी सरकार टार्गेट केले आहे. पाच राज्यातील निवडणूका होताचं निर्य़ात बंदी करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button