नाशिक क्राईम

मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार की नाही ?

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या कळण्यासाठी आपण आमच्या व्हॅाटस्अप ग्रुप सोबत कनेक्ट रहा व जगातील अपडेट मिळवत रहा


वेगवान नाशिक / WEGwAN Nashik

मुंबईः 6 डिसेंबर 23 –

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा कार्यक्रम, 172 धावांमध्ये पॅकअप

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

Bangladesh vs New Zealand 2nd Test | न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर आणि धारदार बॉलिंगसमोर बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडने बांगलादेशला 172 धावांवर गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग केली.

प्रत्येक शनिवारी, रविवार असेल सुट्टीचा वार, बँका राहतील बंद?

शभरातील बँक कर्मचाऱ्यांची लवकरच चांदी होऊ शकते. कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. पगार वाढीसह कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी हवी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे.

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतांनाचा व्हिडीओ समोर

अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत मुंबईतल्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याची ही अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सनी देओल अशा अवस्थेत रस्त्यावर का फिरतोय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सोनं घसरलं एवढ्या रुपयांनी 

जळगावच्या सुवर्ण नगरीत एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घसरण झाली. चांदीचा भावदेखील दोन हजारांनी घसरला. सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. लग्न सराईत भाव घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. दिवाळीपासून दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला होता.

धक्कादायक विधानानामुळे ? अजितदादा गटाचे सर्वच आमदार अडचणीत?;

हे. मागच्या अधिवेशनावेळी अजितदादा गटाचे आमदार कामकाजात सहभागी झाले नाहीत. केवळ लॉबीत फिरत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्यात रस आहे हे स्पष्ट होते. पुढच्या काळात या सर्वांची घर वापसी बघायला मिळेल, असं सांगतानाच या अधिवेशनात व्हीप काढायचीच वेळ आली तर तो नक्की काढू. काही अडचण नाही, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे.

आमच्याकडे काळ कुत्र सुध्दा नाहीये

‘झिम्मा 2 हा चित्रपट हाऊसफुल झाल्याच्या पोस्टवर एकाने अशी कमेंट केली की कुठ चित्रपट झाला हाऊसफुल, आमच्याकडे तर काळं कुत्र सुध्दा नाहिये चित्रपट बघण्यासाठी त्यावर दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या भन्नाट उत्तर दिलं आहे. चित्रपट माणसांसाठी बनविलायं. तुम्ही समजून घ्या..

मनोज जरांगे Manoj Jarang पाटील राजकारणात येणार की नाही, त्यांनी स्पष्टचं सांगितले

‘मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हे गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात फिरून सभा घेत जनजागृती करत आहेत. सगळ्या समाजाचं नेतृत्व करणार का? असं मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, मी मुलगा म्हणून काम करतोय. नेता बनण्याची हवाच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? ते (छगन भुजबळ) आम्हाला आरक्षण मिळू देत नाही, असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी त्यांना? नुसतं विरोध करायचा म्हणून करू नये, असा टोला त्यांनी लगावला

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button