नाशिक क्राईम

दिंडीत भरधाव कंटेनर घुसला; 4 वारकर्‍यांचा मृत्यू


वेगवान नाशिक / वेगवान

शिर्डीः 4 डिसेंबर 23 – साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती पुणे-नाशिक महामार्गावर या दिंडीत कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार वारकर्‍यांचा करूण अंत झाला तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे काल रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.

बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), बबन पाटिलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (वय 50, रा. कनकोरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्‍हाळे, ता. राहाता) या चार वारकर्‍यांचा गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय 60, रा. वाकळी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय 50, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय 50, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय 17, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय 60, रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापटे (वय 17, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय 35, रा. शिर्डी), मिराबाई मारुती ढमाले (वय 60, रा. वावी, ता. सिन्नर) हे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button