नाशिक क्राईम

Manoj Jarange मनोज जरांगेंनी तोडले जागतीक रेकार्ड

Manoj Jarange Patil broke many records


वेगवान नाशिक / Wegwan Nashk

साहेबराव ठाकरे 

नाशिकः 2 डिसेंबर 23 – मनोज  जरागे पाटील यांची सध्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासह जगात चर्चा सुरु आहे. त्याचे कारण मराठा समाजाचे आरक्षणाचा मुद्यामुळे, एका रात्रीतून प्रत्येकाच्या ओठावर या अवलियाचे नाव आले. जीवनात करण्याचे धेय असेल आणि जिदद् कायम असेल तर कोणाता दिवस तुमच्यासाठी स्टार असेल याचे हे उदांहरण,  कुठलही पार्श्वभूमी नसतांना सर्व मिडीला लक्ष केंद्रीत करायला लावणा-या तसेच नेत्यांना, आमदार, खासदरांना व  राजकीय लोकांना घाम फोडणा-यांना तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्यावर लक्ष केंद्रीत करायला लावलेले मनोज जंगारे हे नाव आज घरा घरात पोहचलयं सध्या सोशल मिडीयावर मनोज जंरागे यांच्या पोस्टचे रान उठलयं. मनोज जंरागे यांनी जागतिक रेकार्ड मोडलयं हे आपण खालील वाचल्या नंतर लक्षात येईल. 

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

मोठा भाऊ उपसरपंच झाला.. अन…लहान भावाने असं काही केलं की…

१) जगात सर्वात मोठी दीड कोटी लोकांची सभा शेतात घेण्याचा रेकॉर्ड

२) एकामागे एक अशा एका दिवसात ३० सभा घेण्याचा रेकॉर्ड

३) जगात एका दिवसात सर्वाधिक लोकांना संबोधन करण्याचा रेकॉर्ड

४) इच्छित स्थळी जाताना प्रत्येक चौकात, ठिकठिकाणी गाडीतून खाली उतरून आपल्यावर

प्रेम करणाऱ्या सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्ड

५) फुटबॉल वर्ल्डकप नंतर YouTube ला सर्वाधिक लोकांनी लाईव्ह पाहिलेला इव्हेंट म्हणजे

सराटी अंतरवलीतील सभा

६) मंत्रीपद सोडाच, साधे ग्रामपंचायत सदस्य नसताना सुद्धा मागेपुढे पोलिसांचा ताफा

असलेला एकमेव व्यक्ती होण्याचा रेकॉर्ड

७) १७+९ दिवस उपोषण करूनदेखील वजन वाढलेली एकमेव व्यक्ती

८) तुमच्याकडे शिक्षण, दिसणे, पैसा नसेल तरी तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठू

शकता अशी सर्वाधिक लोकांना प्रेरणा देण्याचा रेकॉर्ड.

९) स्वतःची दुचाकी नसताना चाहत्यांच्या वाहनातून सर्वाधिक प्रवास केलेली व्यक्ती

१०) पैसा शून्य पण सर्वाधिक विश्वास आणि प्रेम कमावण्याचा रेकॉर्ड

११) पदर खर्चाने सर्वाधिक लोक भाषण ऐकण्यासाठी एकत्रित आले

१२) ज्यांच्या एका हाकेवर लाखो लोक जमतात. असे असताना थोडाही अहंकार किंवा

डोक्यात हवा न गेलेला व्यक्ती

१३) उपोषण हे लोकशाहीतील सर्वात प्रभावी अस्त्र आहे यावर विश्वास ठेऊन ते सत्यात

उतरवण्याचा रेकॉर्ड

 

१४) उपोषण सोडण्यासाठी पद आणि पैशाची ऑफर असताना, मागणीवर ठाम राहून

समाजाप्रती आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा रेकॉर्ड

१५) रात्री ९ ची सभा पहाटे ४ वाजता झाली तरी एकही श्रोता जाग्यावरून हलला नाही.

१६) आंदोलन काळात लक्ष विचलित होऊ नये म्हणून घराचा उंबरा न शिवण्याचा रेकॉर्ड

१७) “आधी कुटुंब.. मग समाज” अशी रीत प्रचलित असताना “आधी समाज..मग कुटुंब”

असे सांगणारा एकमेव व्यक्ती.

१८) भारतातील इतर राज्यात सर्वाधिक लोकांना पडलेला प्रश्न.. कौन है जरांगे?

हाही रेकॉर्ड

 

( सदर पोस्ट सोशल मिडीयावर फिरत आहे. याची वेगवान पृष्टी करत नाही )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button