नाशिक क्राईम

Rain Update महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती,मुसळधार पावसाचा इशारा


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

नाशिकः डिसेंबर 1, 2023 | राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनपेक्षित पावसाचे संकट कायम आहे. हवामान अंदाजानुसार राज्यात 1 आणि 2 डिसेंबर रोजी पाऊस पडेल. Rain Update Cyclone situation over Maharashtra, heavy rain warning

exit poll एक्झिट पोल म्हणजे नक्की काय? तो कसा घेतला जातो घ्या जाणून

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

काही जिल्ह्यांना पावसासाठी पिवळा  Lo अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काहींना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलायं. विशेषत: अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांना 1 डिसेंबर रोजी पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुणे हवामान खात्याने या भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा पिवळा (यलो) इशारा आहे, सरींच्या सोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती हे पावसामागील कारण आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या महाराष्ट्रातील पावसाला कारणीभूत आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, उत्तर महाराष्ट्रावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, पुणे हवामान खात्याने येत्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली असून, आज पुणे शहरात पावसाची शक्यता आहे.

नाशिकः दमदार पावसाची हजेरी

26 ते 28 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत 22 जिल्ह्यांची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात कुठलेही नुकसान झाले नाही आणि त्यामुळे प्राथमिक आकडेवारीत त्याचा समावेश नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, अमरावतीमध्ये कापूस, तुरी आणि संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही अमरावती जिल्ह्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या परिस्थितीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button