नाशिक क्राईम

नाशिकः दमदार पावसाची हजेरी


वेगवान नाशिक

नाशिकः 30 नोव्हेंबर 23 –  नाशिक जिल्ह्यातील चांदड तालुक्यात आज पावसाने पुन्हा हजेरी लावली. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील काही भागामध्ये गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आज पुन्हा चांदवड तालुक्यातील अनेक गावांना बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

चांदवड तालुक्यात सध्या दृष्काळी स्थिती आहे. मात्र थोड्या फार शेतक-यांनी कसेबसे कांदे जगवून ठेवले आहे त्याला या पावसाचा फायदा होणार आहे. पुढे येणा-या ज्वारी, हरभरा, या पिकासाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे.

चांदवड तालुक्यात सध्या कांदे काढणीस आले आहे. तर अनेक कांद्याचे पीक पाणी नसल्यामुळे करपून चालले आहे. त्यामुळे या पावसाचा शेतक-यांना फायदा झाला. मात्र दोन दिवसापूर्वी जी गारपीट झाली तिचा फटका मात्र शेतक-यांना  बसलायं

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button