rain Update पाऊस काय म्हणतोय…

वेगवान
सोमवारपासून पावसानं राज्यात पुन्हा जोर धरला आणि कोकणापासून विदर्भापर्यंत तो अधूनमधून बरसत राहिला. मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीही असंच चित्र पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुढचे काही दिवसही राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संतताधर सुरुच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.What is the rain saying…
आजचे राशी भविष्यः या राशीचे लोक प्रेमात पडतील त्यांनी जरा सांभाळून
हवामान विभागानं थेट या पावसाचा मुक्काम आता वाढल्याचीच माहिती दिली. . हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काळात परतीच्या पावसाचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरु होईल. तोपर्यंत राज्यात कमी दास्त प्रमाणत विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे.
मराठवाड्यावर मात्र सध्या पावसाची वक्रदृष्टी झाल्याची चिन्हं आहेत. कारण, इथं नांदेड, लातूर आणि हिंगोली वगळता उर्वरित भागामध्ये खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाऊस नाहीचं असे चित्र आहे.
“बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम कमी दाबाच्या पट्ट्याच्या निर्मितीमध्ये होत आहे. ज्यामुळं 22 ते 24 सप्टेंबर या दिवसांत राज्यात विदर्भ आणि कोकणावर पावसाची कृपा होऊ शकते. 22- 23 सप्टेंबरला जालन्यापासून बीडपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल.